पुणे- लष्कर भागात रमजान महिन्यातील रोजा व गणेश चतुर्थीचा उपवास यानिमित्ताने पुणे मीडिया वाँच व सिध्दार्थ ग्रंथालय व वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने “मोदक-खजुर” सर्व धर्मीय रोजा इफ्तार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमातून सर्वांनी एकमेकांना मोदक व खजुर भरवून लष्कर भागात राष्ट्रीय एकात्मता राखण्याचा संकल्प केला.
यावेळी लष्कर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वसंत कुवर, मौलाना काझमी,मनजितसिंग विरदी, वाहिद बियाबाणी, इसाक जाफर, इक्राम खान , देवीप्रसाद जोशी महाराज, मेजरसिंग कलेर , विकास भांबुरे,अशोक देशमुख, अयाज बागवान, भोलासिंग अरोरा, इमाद सय्यद,अक्रम शेख , भारती अंकलेल्लू, मोना राठोड, सुनिता भगत,निलेश कणसे,विनय भगत,बलबीरसिंग कलसी,अरुणकुमार कोद्रे , अजय लोणकर , सागर शाह , नितेश व्होरा आदी मान्यवर उपस्थित होते . कार्यक्रमाचे आयोजक महेश जांभूळकर,दिलीप भिकुले आदी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व उपस्थितांचे स्वागत महेश जांभूळकर यांनी केले तर सुत्रसंचालन विकास भांबुरे यांनी केले तर आभार दिलीप भिकुले यांनी मानले .