पुणे-आमदार अनंतराव गाडगीळ यांच्या स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत डि. सी. एम. सोसायटी ऑफ इंडिया संचालित डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयास तीन लाख रुपयांचे संगणक संच व दोन लाख रुपयांचे बेंचेस प्रदान करण्यात आले .
नाना पेठमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाणिज्य महाविद्यालयाच्या सभागृहात हा कार्यक्रम संपन्न झाला . यावेळी विधानपरिषदेचे आमदार अनंतराव गाडगीळ ,कार्यक्रमाचे अध्यक्ष डि. सी. एम. सोसायटी ऑफ इंडियाचे जनरल सेक्रेटरी एम. डी. शेवाळे , खजिनदार विशाल शेवाळे , पर्यवेक्षक वसंत साळवे , समन्वयक हेमलता सांगळे , महाविद्यालयाच्या प्राचार्य शशिकला गोरे , वाल्मिक जगताप , आदी मान्यवर उपस्थित होते .
यावेळी आमदार अनंतराव गाडगीळ यांनी सांगितले कि , सध्याचे युग संगणकाचे आहे . संगणकामुळे देशाचा विकास झपाट्याने झाला . परंतु संगणकाच्या वापर चुकीचा होऊ लागल्याने अनेक समस्या निर्माण होऊ लागल्या आहेत . त्यातून सोशल मीडियाचा गैरवापर थांबविला पाहिजे . त्यासाठी संगणकाच्या ज्ञानातून विद्यार्थ्यांनी आपले करिअर घडवावे .
या कार्यक्रमाचे प्रास्तविक आणि उपस्थितांचे स्वागत वाल्मिक जगताप यांनी केले तर सूत्रसंचालन डॉ. बाळासाहेब सोनवणे यांनी केले तर आभार प्रा. जे .के. म्हस्के यांनी मानले .