पुणे-युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन सिव्हिल सर्व्हिस २०१७ अंतिम निकाल लागला . त्यात पुणे लष्कर भागातील पूजा दिनेश राणावत हिने यश मिळविले व तिला यात ऑल इंडिया रँक २५८ मिळाली .या रँक प्रमाणे तिला इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिस (IRS) मिळू शकते . पूजाने गेली चार वर्षांपासून अतिशय मेहनतीने हे यश मिळविले आहे . तिच्या यशात तिच्या आई वडिलांचा खूप मोठा वाटा असल्याचे तिने सांगितले .
तिच्या वडिलांनी तिला खूप सपोर्ट व प्रोत्सहान दिले .
सेंट अन्स शाळेतुन तिने प्राथमिक शिक्षण घेतले . त्यानंतर तिने फर्ग्युसन महाविद्यालयात कला शाखेत मानस शास्त्राची पदवी घेतली . राज्य शास्त्रामध्ये पदव्युत्तर झाली . त्यानंतर चाणक्य मंडळामध्ये तिने स्पर्धा परीक्षेसाठी प्रवेश घेतला . तत्पश्चात तिने दिल्ली येथे जाऊन सेल्फ स्टडी करून स्पर्धा परीक्षेची अधिक जोमाने तयारी केली . दिल्लीत पूजाने दीड वर्ष सेल्फ स्टडी केली . नंतर एक वर्षाची माय पार्लमेंट फेलोशिप मिळवली . या फेलोशिप मध्ये तिला लोकसभा व राज्यसभा , तसेच केंद्रसरकारची तयारी होणारी ध्येयधोरणी शिकण्यास मिळाली . सन २०१७ मध्ये तिने स्पर्धा परीक्षा दिली . यातून तिने हे यश मिळविले . जीतो मध्ये पूजा मुलाखत कशी दयावी याबद्दलचे शिक्षण घेतले. यामध्ये तिला मोलाचे मार्गदर्शन मिळाले .
पूजा आता रेव्हेन्यू सर्व्हिसेस मध्ये जाणार आहे . राजस्थान मारवाडी समाजातील पूजा हि पहिली तरुणी आहे कि जिने युनिअन पब्लिक सर्विस कमिशन मध्ये यश मिळविले असे तिचे वडील दिनेश राणावत यांनी सांगितले . समाजासाठी काहीतरी करण्याची तिला पहिलीपासून आवड होती .जिद्दीने प्रयत्न केल्याने यश हमखास मिळते असे तिने आवर्जून सांगितले . पूजाचा धाकटा भाऊ बिट्स पिलानी मध्ये इलेक्ट्रिक इलेक्ट्रॉनिक इंजिनियरमध्ये शेवटच्या वर्षात शिकत आहे .
पूजाने मिळविलेल्या यशाने पुणे लष्कर भागातील ठक्कर हाऊसमध्ये तिच्या घरी अभिनंदनाचा वर्षाव होत आहे .



