पुणे-रिपब्लिकन संघर्ष दल महाराष्ट्र प्रदेश या सामाजिक संघटनेच्यावतीने कटुआ येथील असिफा , उनाव व साताऱ्यातील अमरावती चव्हाण या ७० वर्षीय दलित महिलेला पेट्रोल टाकून जाळून हत्या झालेल्या अन्यायाचा तसेच भारतातील लहान मुलीवर वाढत असलेले बलात्कार खुनाच्या घटनेचा निषेध करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन येथे जागर मेळावा घेऊन मालधक्का चौकात शासन सरकारचे लक्ष वेधून घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात निषेध करून निदर्शने करण्यात आली .
रिपब्लिकन संघर्ष दल महाराष्ट्र प्रदेश या सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजय भिमाले यांच्या नेर्तृत्वात जागर मेळावा व निषेध करण्यात आला . यावेळी महापालिका स्थायी समिती माजी अध्यक्ष सदानंद शेट्टी , भीमछावा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शाम गायकवाड , लष्कर ए भीमा संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस धनंजय सोनवणे , लष्कर भीमा संघटनेचे पुणे शहर अध्यक्ष विनोद साळवे , भारिपचे नागेश भोसले , विलास चौरे समाज सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाळासाहेब चौरे , , भीमछावा संघटनेचे महिलाध्यक्षा निर्मल गायकवाड , नरेश जगताप , सूरज पाटोळे , अभिषेक शिकोत्रे , अनिल कांबळे , अनिल कांबळे , रिपब्लिकन संघर्ष दलाचे पुणे शहर अध्यक्ष नितीन बालकी , पुणे शहर सरचिटणीस विनायक बंडी , किरण पारधे , पुणे महिलाध्यक्षा जाहिदा शेख , सरचिटणीस मिना साळवी , निर्मला पारधे , लता माकर , मनिषा वाघमारे , कविता जगताप आदी पदाधिकारी व मोठ्या संख्येने उपस्थित होते .

