पुणे–कठूआ प्रकरणात बळी पडलेल्या निरागस असीफाला मार्केटयार्ड भागातील विविध सामाजिक संघटना व पथारी व्यावसायिक यांच्यावतीने मेणबत्त्या पेटवून भावपूर्ण आदरांजली अर्पण केली. मार्केट यार्डच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ आयोजित केलेल्या श्रध्दांजलीपर कार्यक्रमात मोठ्या संख्येने पथारी व्यावसायिक सहभागी झाले होते . तसेच कठूआ व उन्नव बलात्कार प्रकरणातील क्रूरकर्म्यांना तत्काळ फाशी द्यावी . भाजपच्या आमदार व मंत्र्यानी आरोपीच्या बाजून समर्थन केले असून लोकशाहीला हि घटना कलंक आहे . त्याचा निषेध करीत आहोत , असे महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे लीगल सेलचे प्रदेशअध्यक्ष ऍड भगवानराव साळुंके यांनी सांगितले .
यावेळी दलित पॅंथर पथारी व्यवसायिक पुणे शहर अध्यक्षा बबिता खान ,गौतम शिंदे , सुषमा मंडलिक , पौर्णिमा प्रसाद , प्रेमा शेट्टी , अझहर बागवान , असिफ खान , नवनाथ चाबुकस्वार व मार्केटयार्ड मधील पथारी व्यावसायिक , हमाल मोठ्या संख्येने सहभागी झाले होते .
दलित पँथर मार्केटयार्ड पथारी विभाग , राष्ट्रवादी तिरंगा युवा प्रतिष्ठान , महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे लीगल सेल , बागवान सोशल ग्रुप , वॉरियर ग्रुप आदी सामाजिक संस्थेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते .

