पुणे-शीख यंग सर्कलच्यावतीने खालसा दुचाकी रॅली उत्साहात संपन्न झाली .पुणे कॅम्प जवळील रेसकोर्सजवळील गुरुद्वारा गुरुनानक दरबारपासून या रॅलीला गुरुद्वारा गुरुनानक दरबारचे बिल्डिंग कमिटीचे चेअरमन संतसिंग मोखा यांच्याहस्ते ध्वज उंचावून करण्यात आले. यावेळी शीख यंग सर्कलचे अध्यक्ष अमरजितसिंग परिहार , गुरुद्वारा गुरुनानक दरबारचे अध्यक्ष चरणजितसिंग सहानी , रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य दलजितसिंग रँक, शीख यंग सर्कलचे कार्याध्यक्ष चरणजितसिंग कोहली , गुरुमुखसिंग खोक्कर , उपाध्यक्ष बलजितसिंग वाढे , सहसचिव गुरुदेवसिंग वाढे , गुरुमतसिंग रत्तू , राजेंद्रसिंग वालिया , प्रितवालसिंग खंडूजा , गुरुमितसिंग कोहली ,हरजितसिंग बेदी व शीख बांधव उपस्थित होते . यावेळी शीख युवक मोठ्या संख्येने दुचाकीसह रॅलीमध्ये सहभागी झाले होते . हि रॅली गुरुद्वारा गुरुनानक दरबारपासून सुरुवात झाली पुणे कॅम्प , नाना पेठ , गणेश पेठ गुरुद्वारा , शिवाजीनगर गावठाण , ससून रुग्णालय रस्ता, अलंकार टॉकीज , बंडगार्डन , सादलबाबा चौक यामार्गे , खडकी , दापोडी , पिंपरी , आकुर्डी , निगडी मार्गे देहू रोड येथील गुरुद्वारा येथे रॅली समाप्ती झाली .रॅली मार्गावर शरबत वाटप करून ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले .
बैसाखीपासून शीख लोकांच्या नववर्षास सुरवात होते. बैसाखी शक्यतो चौदा ते पंधरा एप्रिलच्या दरम्यान येते. या महिन्यापासूनच ते पेरणीस सुरवात करतात. सन १६९९ साली याच दिवशी शीखांचे दहावे गुरू गोविंदसिंग यांनी ‘खालसा’ पंथाची स्थापना केली होती. त्यानिमित्त शीख यंग सर्कलच्यावतीने खालसा दुचाकी रॅलीचे दरवर्षी रॅलीचे आयोजन करण्यात येते अशी माहिती शीख यंग सर्कलचे अध्यक्ष अमरजितसिंग परिहार यांनी दिली .

