पुणे-हनुमान जन्मोत्सवनिमित्त ढोलेपाटील रोडवरील तरुण विकास मंडळाच्यावतीने दरवर्षी प्रमाणे यंदाच्या वर्षी देखील हनुमान जन्मोत्सव सोहळा उत्साहात संपन्न झाला . यावेळी सकाळी रुद्राभिषेक , श्री हनुमान जन्मोत्सव झाले तर दुपारी वीस हजार भक्तानी महाप्रसादाचा लाभ घेतला . यावेळी मंडळाचे प्रमुख विश्वस्त उल्हास ढोलेपाटील , अध्यक्ष अनिल ढोलेपाटील , माजी आमदार कमल ढोलेपाटील , सागर ढोलेपाटील , राहुल ढोलेपाटील , बिंदू ढोलेपाटील , मृणाल ढोलेपाटील , अभिजित जैन व नितीन रोकडे आदींनी केले होते .
यावेळी प्रमुख मान्यवरांनी मंडळास भेटी दिल्या .
हनुमान जन्मोत्सवनिमित्त रास्ता पेठ येथील शिवरकर मळा येथील श्री सूर्यमुखी मारुती मंदिर येतेच विविध धार्मिक कार्यक्रमांनी जन्मोत्सव सोहळा पार पडला . यावेळी होमहवन , महाप्रसाद झाला . कार्यक्रमाचे आयोजन मनोज दळवी , मंजिरी धाडगे , किरण शिवरकर , संभाजी शिवरकर , नरेश शिवरकर , निलेश थोपटे , शारदा शिवरकर , सनी शिवरकर व प्रताप तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले .
हनुमान जन्मोत्सवनिमित्त सदाशिव पेठमधील विजय कॉलनीमधील उत्तरमुखी विजय मारूती मंदिर मध्ये विविध धार्मिक कार्यक्रमानी हनुमान जन्मोत्सव सोहळा पार पडला . यावेळी होमहवन , महाप्रसाद झाला . कार्यक्रमाचे आयोजन केले होते . यावेळी समीर धाडगे , सागर धाडगे , मंजिरी धाडगे , तुकाराम तोडकर ,दादा पातणकर आदीनी केले .
हनुमान जन्मोत्सवनिमित्त पुणे लष्कर भागातील इस्ट स्ट्रीटवरील खाण्या मारुती मंदीरात हनुमान जन्मोत्सव सोहळा पार पडला . यावेळी सकाळी होमहवन , मारुती जन्मोत्सव ,भजनी मंडळाचा भजनाचा कार्यक्रम झाला . तसेच महाप्रसादाचे वाटप करण्यात आले . यावेळी प्रवीणकुमार शर्मा महाराज , बाळकृष्ण प्रभू महाराज , विद्याधर कानेटकर महाराज , सरिता सावंत आदींनी विशेष परिश्रम घेतले .
हनुमान जन्मोत्सवनिमित्त मनजितसिंग विरदी फाऊंडेशनच्यावतीने पुणे लष्कर भागातील विविध हनुमान मंदिरात मनजितसिंग विरदी यांच्याहस्ते बाळगोपाळांना प्रसाद वाटप करण्यात आले . यावेळी पूजा करण्यात आली . यावेळी यावेळी मनप्रित विरदी , सहेर विरदी , हरभजनकौर विरदी , मनमित विरदी , रिदीमाँविरदी , सायली रणधीर , सूरज आगरवाल सलमान शेख , रफिक सय्यद व विशाल रॉय आदी उपस्थित होते .
हनुमान जन्मोत्सवनिमित्त नाना पेठ मधील भोर्डे आळीमधील गंजीचा मारुती मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले . यावेळी महाअभिषेक , होमहवन , महाप्रसाद , छबिना आदी धार्मिक कार्यक्रम झाले . यावेळी भास्कर जगताप , पंडित जगताप , विजय जगताप , जयेश जगताप , पृथ्वीराज जगताप , अरुण भुजबळ व चंद्रविलास कांबळे आदी उपस्थित होते .
नवा मंगळवार येथील बोल्हाई खान येथील श्री हनुमान सेवा मंडळाच्यावतीने हनुमान जयंती उत्सव पार पडला . यावेळी अभिषेक , पूजा व महाप्रसाद आला . यावेळी ह. भ. प. सोनबा दळवी राजू महाडिक , भावेश राऊत , अमर गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते .


