दलित पँथरचा मेळावा उत्साहात संपन्न

Date:

पुणे-दलित पँथरचा प्रमुख कार्यकर्त्यांचा राज्यस्तरीय संकल्प मेळावा वडगाव शेरीमधील भैरवनाथ चौकात उत्साहात संपन्न झाला . या संकल्प मेळाव्याचे उदघाटन कामगार नेते विजय कांबळे यांच्याहस्ते छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आले . या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी दलित पँथरचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सुखदेव सोनवणे , ऐक्यवादी रिपब्लिकन पार्टीचे नेते दिलीप जगताप ,दलित पँथरचे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष मंगेश मोरे ,विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष  शुभम  सोनवणे ,वाल्मिक सरतापे विक्रम कांबळे , बाळासाहेब साळवे , नारायण गलांडे ,दलित पँथरचे पुणे शहर प्रकाश साळवे , अरुणा हरपळे , प्रविण रणदिवे , राजू गायकवाड , विकास भोसले , के. टी. जगताप आदी मान्यवर उपस्थित होते .

या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी दलित पँथरचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सुखदेव सोनवणे  यांनी सांगितले कि , भीमा कोरेगाव हल्ला मधील मिलिंद एकबोटे , व मनोहर भिडे याना सर्वोच्च न्यायालयाने अटक करण्याचे आदेश दिले असताना देखील केंद्र सरकारच्या भूमिकेमुळे हो दोघे अटक झाले नाही . त्यासाठी सरकारची मक्तेदारी मोडून काढायला हवी . त्यामध्ये रामदास आठवले यांनी जातीय वाद्यांशी युती केली आहे . त्यामुळे आंबेडकरी समाज तुम्हाला जाब विचारल्याशिवाय राहणार नाही .

यावेळी ऐक्यवादी रिपब्लिकन पार्टीचे नेते दिलीप जगताप यांनी मार्गदर्शन करताना सांगितले कि , देशात जातीयवादी धर्माध सरकार काम करीत आहे . सर्वोच्च न्यायालयाचा अटक करण्याचा आदेश असताना देखील अटक होत नाही . हे संविधानाचे राज्य आहे का ? असा सवाल त्यांनी उपस्थित केला . जाती जातीमध्ये भांडणे लावण्याचे काम चालू आहे . त्यासाठी आपल्याला यल्गार करावा लागणार आहे . पँथर हा लढायला नेहमी सज्ज असतो . त्यासाठी आपला सर्वाना संघटीत होऊन हे सर्व प्रश्न सोडवायचे आहेत . जिथे जिथे अन्याय अत्याचार होतो तिथे दलित पँथर न्याय देण्याचे काम करतो .

यावेळी  कामगार नेते विजय कांबळे  यांनी सांगितले कि , सगळ्याचे स्मारके झाली परंतु डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक नसल्याची खंत व्यक्त करून इंदू मिलच्या जागी स्मारक झालेच पाहिजे . अशी मागणी करून स्मारकाचे उभारणीचे भूमिपूजन झाले परंतु प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली नाही . त्यासाठी आपल्याला डोळे उघडे ठेवून सामना करावा लागणार आहे . त्यासाठी तरुणांनी पुढे आले पाहिजे . यापुढे कामगार राहणार नाही कारण सध्याचे सरकार ट्रेंड युनियन कायदा रद्द करण्याचे काम करीत आहे .

या संकल्प मेळाव्यात उपस्थितांचे स्वागत व कार्यक्रमाचे प्रास्तविक प्रकाश साळवे यांनी केले तर सूत्रसंचालन वाल्मिक सरतापे यांनी केले तर आभार  विक्रम कांबळे यांनी मानले .

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

मोदींनी ओमानवरील हल्ल्याचा निषेध केला:8 आखाती देशांशी चर्चा, दुबई आणि अबू धाबीहून 2000+ भारतीय परतले

नवी दिल्ली- पंतप्रधान मोदींनी सोमवारी भारतीय समुदायाच्या लोकांच्या सुरक्षेबाबत...

रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन इराणशी चर्चा करणार:मध्य पूर्वेतील देशांवरील हल्ले रोखणे हे उद्दिष्ट

रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन इराणशी चर्चा करणार आहेत. मंगळवारी...

२८ आणि २९ मार्चला महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन

चौथ्या विजेतेपदासाठी भाग्यश्री फंड उत्सुक ४२ जिल्ह्यांच्या संघांचे ४००हून अधिक...

चंद्रकांतदादा पाटील यांची सीआयएसएफच्या जवानांसोबत होळी साजरी

जवानांच्या चेहऱ्यावरचा निखळ आनंद पाहून मन समाधानाने भरुन आले-...