पुणे- धर्म प्रांताचे प्रमुख बिशप थॉमस डाबरे यांनी त्याच्या शिष्टमंडळासमवेत शरद पवार यांच्या समवेत त्यांच्या पुणे येथील निवासस्थानी भेट घेतली . त्यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले केवळ एकाच धर्माची विचार प्रणाली संबंध देशावर लादणे अयोग्य असल्याचे सांगितले . कारण धर्म निरपेक्ष लोकशाही राज्यव्यवस्थेची भूमिका सुसंगत नाही . श्री पवार यांच्या राष्ट्रव्यापी निरंतर सेवेचे कौतुक करताना अल्पसंख्यांक आणि विशेषतः ख्रिश्चन अल्पसंख्यांक समाजाच्या काही प्रमुख अडीअडचणी आणि समस्या शरद पवार याच्या कानी घातल्या . गेली ६० वर्ष तीन कोटी ख्रिश्चन समूहाच्या वतीने ख्रिश्चन दलितांना देखील इतर दलितांप्रमाणे आरक्षण व सवलती मिळाव्यात , म्हणून राष्ट्रव्यापी लढा चालू असून देखील ख्रिश्चन दलितांना अजूनहि त्या दिल्या जात नाहीत . हे भारताच्या संविधानाशी जुळणारे नाही . या बिशप थॉमस डाबरे यांच्या विधानास शरद पवार यांनी दुजोरा दिला . दलितांच्या बाबतीत समान धोरण असावे अशी आपली भूमिका असल्याचे शरद पवार यांनी स्मरण करून दिले. त्याचप्रमाणे ख्रिश्चन समाजातील गुणवंत , सामाजिक आणि राजकीय कार्यकर्त्यांना संधी देणे हे राज्यकर्त्यांचे कर्तव्य असल्याचे बिशप थॉमस डाबरे यांनी सांगितले .
यावेळी ख्रिश्चन समाजातील युवा सामाजिक कार्यकर्ते मायकल साठे यांनी सांगितले कि , आपण आपल्या राजकीय व सामाजिक कारकिर्दीत सामान्य कार्यकर्त्यांना संधी दिल्याबद्दल आभार व्यक्त केले . जेष्ठ पत्रकार जॉन गजभिव यांनी समाजाचे प्रश्न पोटतिडकीने मांडले . या भेटीमध्ये मायकल साठे , रे फर्नाडिस , डॉ. जोशवा रत्नम , जॉन गजभिव , वसंत गजभिव , सुधीर पाटील , रॉक गोम्स आदी ख्रिश्चन समाजातील मान्यवर उपस्थित होते .