पुणे-मान्य खाजगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर सहकारी पतसंस्थेचा २४ वा वर्धापन नुकताच संपन्न झाला . सदाशिव पेठमधील पतसंस्थेच्या कार्यालयात झालेल्या या वर्धापन दिन सोहळ्याचे उदघाटन पतसंस्थेचे अध्यक्ष वाहिद शेख बियाबानी यांच्याहस्ते दीपप्रज्वलित करून करण्यात आले . या कार्यक्रमात सत्यनारायण पूजा व तिळगुळ समारंभ पार पडला . या कार्यक्रमात पुणे शहरातील खाजगी प्राथमिक शाळेतील ६०० हुन अधिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते . सालाबादप्रमाणे यंदाच्या वर्षी सर्व पतसंस्थेच्या सर्व सभासदांना भेटवस्तू देण्यात आली . या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष नुरुद्दीन अली सोमजी , माजी नगरसेविका शुभदा जोशी , उदय जोशी ,पिंपरी चिंचवड महापालिकेच्या नगरसेविका चंद्रकांता सोनकांबळे, शिक्षण सेवक समितीचे अध्यक्ष संतोष शिळीमकर , शिक्षक महासंघाचे अध्यक्ष नारायण शिंदे , सारंग पाटील , मुख्याध्यापक विचार मंचाचे विश्वास कोचले , पुणे जिल्हा वेतन पतकांचे सांडभोर साहेब त्याचप्रमाणे पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक , सिंहगड रोडचे एजंट श्री देशपांडे आदी मान्यवर उपस्थित होते .
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पतसंस्थेचे उपाध्यक्ष लक्ष्मण लोखंडे , सचिव विठ्ठल शेवते , खजिनदार महावीर काळे, संचालक मंडळ भानुदास कुलाळ. अनिल ढवळे ,सुधीर दाते , सुरेखा जाधव , अनुपमा रासकर , शारदा हगवणे , सुवर्णा धुमाळ , दत्तात्रय पोटे , प्रल्हाद झरांडे , काकासाहेब राजपुरे , श्रीरंग पिंगळे , महादेव शिंदे व संचालकांनी विशेष परिश्रम घेतले .