पुणे, ६ ऑक्टोबर: एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचा चौथा दीक्षांत समारंभ शनिवार, दि. ८ ऑक्टोबर २०२२ रोजी सकाळी १०.०० वाजता, विश्व सभामंडप, विश्वराजबाग, लोणीकाळभोर, पुणे येथे आयोजित करण्यात आला आहे.
या समारंभासाठी भारत सरकारचे परराष्ट्र व्यवहार व शिक्षण राज्यमंत्री डॉ. राजकुमार रंजन सिंग हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. इस्त्रोचे माजी अध्यक्ष व राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० चे अध्यक्ष पद्मविभूषण डॉ. के. कस्तुरीरंगन, जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर व नालंदा विद्यापीठाचे कुलपती व जगविख्यात संगणक तज्ञ पद्मभूषण डॉ. विजय भटकर हे सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेेत. अध्यक्षस्थानी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड हे असतील. तसेच, एमआयटी डब्ल्यूपीयूचे कार्याध्यक्ष राहुल विश्वनाथ कराड व कुलगुरु डॉ. आर.एम. चिटणीस उपस्थित राहणार आहेत.या दीक्षांत समारंभरात बीटेक मधील केवल पद्मवार याला फाउंडर प्रेसिडेंट मेडल व बॅचलर ऑफ एज्युकेशनचे मिनू कलिता यांचा एक्जीकेटीव्ह प्रेसिडेंट मेडलने गौरव करण्यात येणार आहे. तसेच विद्यार्थ्यांना सुवर्ण पदक, रौप्य आणि कास्य पदक देण्यात येणार आहे. अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान, व्यवस्थापन (यूजी व पीजी), लिबरल ऑर्टस , बीएड, फाइन ऑर्टस, मिडिया अॅण्ड पत्रकारिता, वाणिज्य, अर्थशास्त्र, विज्ञान,फॉर्मसी, सस्टेनेबल स्टडीज, डिझाइन, गर्व्हनन्स इ. शाखेत मिळून एकूण ४५७६ विद्यार्थ्यांना पदवी देण्यात येणार आहे.
अशी माहिती एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कुलसचिव डॉ. प्रशांत दवे आणि परिक्षा नियंत्रक प्रा. गणेश पोकळे यांनी दिली.
एमआयटीचा ४था दीक्षांत समारंभ:४५७६ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात येणार
Date:

