पुणे, दि.१३ जानेवारी: शाश्वत विकासाचे उद्दिष्टये लक्षात ठेवून विद्यार्थी आणि व्यावसायिकांची क्षमता विकसित करण्यासाठी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या सस्टेनेबल स्टडीज विभागतर्फे शाश्वत इकोसिस्टम तयार करण्यासाठी ६ संस्थांबरोबर सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली.
या करारावर यावेळी एमआयटी डब्ल्यूपीयूच्या फॅकल्टी ऑफ सस्टेनेबल स्टडिज प्रमुख डॉ. विलास बालगावकर आणि ट्री पब्लिक फाउंडेशनचे अध्यक्ष अभिषेक कविटकर, एएनएस इकों कन्सल्टन्सी प्रा.लि.चे संचालक अभय बाचुका, बी बास्केटचे अध्यक्ष अमित गोडसे, अर्थवाईज अॅडव्हायझरीचे सह संस्थापक इशान कामत, कानजो कन्सल्टन्टचे संचालक डॉ. यशोधन जोशी, हुमे सेंटर फॉर इकॉलॉजी अॅण्ड वाईल्ड लाईफ बॉयोलॉजीचे कार्यकारी संचालक सी.के. विष्णूदास यांनी स्वाक्षरी केली.
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड यांच्या मार्गदर्शनाखाली आणि कार्याध्यक्ष राहुल विश्वनाथ कराड यांच्या नेतृत्वाखाली हे करार करण्यात आले.
यावेळी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कुलगुरू प्रा.डॉ. आर.एम.चिटणीस, प्र कुलगुरू डॉ. मिलिंद पांडे आणि स्कूल ऑफ फार्मसीचे अधिष्ठाता डॉ. भानुदास कुचेकर हे उपस्थित होते.
डॉ. आर.एम.चिटणीस म्हणाले,“विद्यार्थ्यांमध्ये संशोधन आणि नवनर्मितीचे वातावरण निर्माण करणे हे या करारातून अपेक्षित आहे.”
डॉ. मिलिंद पांडे म्हणाले,“ नवनिर्मितीच्या संकल्पनांना उजाळा देण्यासाठी माइंड टू मार्केट या वर आधारित तसेच, स्टार्टअप नंतर ही एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी त्यांना मदत करेल. नव भारत निर्माण करण्यासाठी हे विद्यापीठ कार्य करीत आहे. याच्या माध्यमातून विद्यार्थी नोकरी मागणारे नाही तर देणारे होतील.”
डॉ. विलास बालगावकर म्हणाले, “ युनाइटेड नेशन्सने शाश्वत विकासाची १७ उद्दिष्टये जाहिर केली आहेत. ते साध्य करण्याच्या दृष्टीने भावी संशोधनाची गरज भासते. विद्यार्थ्यांना फिल्ड स्टडी व प्रात्यक्षिकतेचा अनुभव व त्यांच्या करियरच्या विविध संधी उपलब्ध होतील. यातून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संबंध स्थापित होईल. पर्यावरण, समाज आणि अर्थव्यवस्था सुधारणे हे या करारांचे मुुख्य उद्दिष्ट्य आहेत.”
अमित गोडसे म्हणाले, “शेतकरी आणि दुर्बल घटकांनी मधमाशी पालनापासून केलेल्या उत्पदानांना सध्या योग्य अशी बाजारपेठ उपलब्ध नसल्यामुळे त्यांना योग्य असा मोबदला मिळत नाही. त्यामध्ये विद्यार्थी, प्र्राध्यापकांच्या माध्यमातून शेतकर्यांना संगठीत करुन त्यांना मार्गदर्शन केले जाणार आहे. व त्यातून त्यांना त्या उत्पादनाचा योग्य तो मोबदला मिळविण्यासाठी प्रयत्न केले जातील. ”
अभिषेक कविटकर म्हणाले, “शहरी व ग्रामीण भागात होत असलेल्या पर्यावरणाचा र्हास कमी करण्यासाठी जैवविविधता टिकविणे गरजेचे आहे. त्यासाठी झाडे लावा, झाडे जगवा हा संदेश ग्रामीण भागात व शहरी भागात रुजविणे आवश्यक आहे. त्यासाठी या विद्यापीठांच्या माध्यमातून विविध क्षेत्रात संशोधन करुन लोक जागृती केली जाईल. यातून समाजाला व निर्सगाला ही फायदा होईल.”
एमआयटी डब्ल्यूपीयूचा ६ संस्थांबरोबर सामंजस्य करार
Date: