पुणे,दि.१ जानेवारी: “दलितांच्या सर्वागिण उद्धारासाठी महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी आपले संपूर्ण आयुष्य वेचले. त्यांनी अहिल्याश्रम व शिक्षण संस्था उभ्या करून ते दलितांना सुर्पूत केले. अशा व्यक्तींनी आपला वारसा हक्क सुद्धा दलितांना दिला.त्यांच्या या कार्यामुळे भारतरत्न या सम्मानाने त्यांचा गौरव होणे गरजचे आहे. ”असे विचार ज्येष्ठ साहित्यिक आचार्य रतनलाल सोनाग्रा यांनी व्यक्त केले.
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीतर्फे लेखक आचार्य रतनलाल सोनाग्रा लिखीत विश्वधर्म के उपासक उपेक्षित, वंचित, दलित वर्ग के उद्धारक, कर्मयोगी ‘ महर्षी विठ्ठल रामजी शिंदे’ या हिंदी ग्रंथांचे प्रकाशन विमाननगर येथे एमआयटी डब्लयूपीयूचे कुलगुरू डॉ. आर.एम.चिटणीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी लेखकांनी आपली भावना व्यक्त केली. भागलपूर विश्वविद्यालय के हिंदी विभाग प्रमुख प्रा.डॉ. लखनलाला सिंग आरोही हे उपस्थित होते.
महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांची २ जानेवारी रोजी ७८ वा स्मृती दिवस आहे. त्यानिमित्त रतनलाल सोनाग्रा लिखित ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले.
आचार्य रतनलाल सोनाग्रा म्हणालेे,“विठ्ठल रामजी शिंदे हे समाज सुधारक होते. बहुजन समाजाचे असूनही त्यांनी दलित समाजसाठी मोलाचे कार्य केले आहे. आंबेडकरांच्या अगोदर पासून शिंदे हे दलितांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करीत होते. लोकमान्य टिळक आणि महात्मा गांधीजी यांना जोडणारा महत्वाचा सेतू ते होते. शाहू, फुले, डॉ.आंबेडकर यांचा उल्लेख होतांना दिसत आहे. तसे नसून शाहु, फुले, शिंदे आणि डॉ. आंबेडकर असे झाला पाहिजे.”
डॉ. आर.एम.चिटणीस म्हणाले,“रामजी शिंदे यांचे कार्य अतुलनीय आहे. महर्षी यांना भारतरत्न देऊन सन्मान करावा अशी मागणी केली जात आहे. लेखकांनी महर्षी शिंदे यांचे जीवनातील बारकावे शोधून त्यांनी केलेल्या सर्व कार्याचा उहापोह या ग्रंथात केलेला आहे. म्हणून हा ग्रंथ समाजाला उपयुक्त ठरणार आहे.”
प्रा.डॉ. लखनलाला सिंग आरोही म्हणाले,“ हिंदी भाषेमध्ये दलित साहित्याला समृद्ध करण्यासाठी मराठी साहित्याने खूप मोठे योगदान दिले आहे. लेखक सोनाग्रा यांनी महर्षी विठ्ठल शिंदे यांच्या उपेक्षित अध्यायाला लिहून सर्वांचे ध्यान आकर्षीत केले आहे. देशातील वर्ण व्यवस्थेमुळे काही महानव्यक्ती उपेक्षित होते. अशांचा शोध घेऊन लिखान करणे खूप मोठे कार्य आहे.”
दलितांच्या उद्धारासाठी महर्षी विठ्ठल शिंदे यांचे योगदान मोलाचे ज्येष्ठ साहित्यिक आचार्य रतनलाल सोनाग्रा यांचे विचार एमआयटी डब्ल्यूपीयूतर्फे ‘ महर्षी विठ्ठल रामजी शिंदे’ ग्रंथाचे प्रकाशन
Date: