डॉ.विश्वनाथ कराड एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीतर्फे जागतिक शांतता दिवस साजरा
पुणे, ता. 21. जागतिक शांतता दिनाचे औचित्य साधून डॉ. विश्वनाथ कराड एमआयटीवर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणेतर्फे आयोजित केलेल्या रन फॉर पीस ॲण्ड डेमॉक्रसी ने संपूर्ण जगाला शांतीचा संदेश दिला. या रॅलीमध्ये डब्ल्यूपीयूच्या सर्व स्टॉफ बरोबरच हजारो विद्यार्थी आणि पुणे निवासी उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. शहरातील वेगवेगळ्या चार ठिकाणावरून निघालेल्या रॅलीज् ऐतिहासिक वास्तू शनिवारवाडा येथे एकत्र आल्या. यावेळेस सर्वांनी विश्र्वशांतीसाठी प्रार्थना केली.
या प्रसंगी भूमाता चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष डॉ.बुधाजीराव मुळीक, एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड, एमआयटी डल्ब्यूपीयूचे कार्यकारी अध्यक्ष प्रा. राहुल विश्वनाथ कराड, महाराष्ट्र स्टेट प्रिन्सिपॉल फेडरेशनचे माजी अध्यक्ष प्रा. नंदकुमार निकम, सहयोग ट्रस्टचे अध्यक्ष ॲड.असीम सरोदे, प्रकृती पोतदार, दलित पँथर ऑफ इंडियाचे अध्यक्ष बापूसाहेब भोसले, एकोल सोलिटरयचे संस्थापक अध्यक्ष मिनोचेर पटेल, गोखले इन्स्टिटयुटचे प्रा. डॉ.नरेश बोडखे, शारदा ज्ञानपीठमचे अध्यक्ष पं. वसंतराव गाडगीळ, पुणे मनपाचे सहआयुक्त गणेश सोनवणे, पूर्णवाद युवा फोरमचे माजी अध्यक्ष लक्ष्मीकांत पारनेरकर, सत्य वेध प्रतिष्ठानचे अध्यक्ष कैलास भिंगारे, नातू विचार मंचाचे अध्यक्ष रवी नातू, ज्येष्ठ साहित्यिक प्रा. रतनलाल सोनग्रा, सोसे अर्थमूवर्स प्रा.लि.चे संचालक मिलिंद सोसे, शिव संग्रामचे अध्यक्ष महेंद्र कडू, सा वा नी सूर संगीतचे संस्थापक सुरेंद्र मोहिते, एमआयटीचे अधिष्ठाता प्रा. शरदचंद्र दराडे-पाटील, नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ.एस.एन.पठाण, आदित्य झुनझुनवाला आणि प्रा. जयश्री फडणवीस हे उपस्थित होते.
प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले,””आज जगात दहशतवाद, जातीयवाद यामुळे जगात अशांततेचे वातावरण निर्माण झालेले आहे. या पार्श्वभूमीवर रॅलीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी समाजाला शांतीचा संदेश दिला आहे. तो निश्चितच मानवकल्याणासाठी महत्वाचा आहे. ही एक ऐतिहासिक घटना आहे. भविष्यात भारत देश जगाला सुख, समाधान व शांतीचा संदेश देईल.”
प्रा. राहुल विश्वनाथ कराड म्हणाले, “”युनोने 1981 मध्ये विश्र्व शांतीचा नारा दिला होता. त्याला जागतिक शांतता दिनाच्या निमित्ताने रन फॉर पीस ॲण्ड डेमोक्रसी चे आयोजन करून डब्ल्यूपीयूने संपूर्ण विश्र्वाला शांतीचा संदेश दिला आहे. पुढील वर्षी 2 लाख विद्यार्थ्यांचा आणि जनतेचा सहभाग घेऊन शांतीसाठी सर्वात मोठ्या मॅरेथॉनचे आयोजन करणार आहोत. ”
ही रॅली शहरातील बीएमसीसी मैदान, बाबुराव सणस मैदान, साधू वासवानी मैदान आणि ॲग्री कल्चर मैदान या चार महत्वपूर्ण ठिकाणाहून सकाळी 6.00 वा. निघून 8.00 वा. शनिवारवाडा येथे पोहचली. त्यामध्ये ठिकठिकाणाहून माईर्स संस्थेचे विद्यार्थी सहभागी होत गेले. त्याच प्रमाणे डब्ल्यूपीयूच्या प्रथम वर्षाचे विद्यार्थीही सामील झाले.
सर्व लोकांमध्ये एकमेकांबद्दल आदर, शांती व प्रतिष्ठेची भावना निर्माण होण्यासाठी सर्व विद्यार्थ्यांच्या हातात शांतीचा संदेश देणारे बॅनर होते. संपूर्ण शहरात शांतीचा संदेश देत ही रॅली निघाली.
यावेळेस उपस्थित पाहुण्यांनी शांतीचे महत्व, उत्तम स्वास्थ्य, पीस म्हणजे आनंदी वृत्ती, डेमॉक्रसीसाठी शांतीचे महत्व, शांत विचारांनी आणि गोड बोलल्याने शांतीचे वातावरण आपोआपच निर्माण होते आणि जागतिकीकरणाच्या बाजारात वृक्षारोपणाचे महत्व इ. विचार प्रकट केले.
ग्रुप कॅप्टन प्रा.डी.पी आपटे यांनी प्रास्ताविक केले व आभार मानले. प्रा. गौतम बापट यांनी सूत्रसंचालन केले.कार्यक्रमाची सुरूवात विश्वशांती प्रार्थनेने होऊन राष्ट्रगीताने सांगता झाली.