डॉ.विश्वनाथ कराड एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणेतर्फे ‘रन फॉर पीस अॅण्ड डेमॉक्रसी’चे आयोजन
पुणे. : डॉ.विश्वनाथ कराड एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणेतर्फे जागतिक शांतता दिनाचे औचित्यसाधून ‘रन फॉर पीस अॅण्ड डेमॉक्रसी’ चे गुरुवार, दि. 21 सप्टेंबर 2017 रोजी आयोजन करण्यात आले आहे. इच्छुक व्यक्तींनी या रॅलीमध्ये आपला सहभाग नोंदवावा असे आवाहन एमआयटीडब्ल्यूपीयूचे कार्यकारी अध्यक्ष प्रा. राहुल विश्वनाथ कराड यांनी केले आहे.
गुरुवार दि. 21 सप्टेंबर रोजी सकाळी 6 वाजता बीएमसीसी, बाबुराव सणस, साधू वासवाणी, अॅग्री कल्चरल मैदान या चार ठिकाणांवरून रॅलीची सुरूवात होणार असून सकाळी 8 वाजता शनिवार वाडा येथे रॅलीची सांगता होईल.
या समारंभासाठी पूर्णवाद युवा फोरमचे माजी अध्यक्ष श्री. लक्ष्मीकांत पारनेरकर, शिवसेनेचे नगरसेवक व कमल प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्री. राहुल कलाटे, नगरसेविका व पुण्याच्या माजी मजपौर चंचला कोद्रे, एकोल सोलिटयरचे संस्थापक अध्यक्ष मिनोकेर पटेल, सामाजिक कार्यकर्ते असीम सरोदे, विवेक वेलणकर आदी मान्यवर उपस्थित राहतील. सद्या जगातील कलुषित झालेले वातावरण पाहता सर्व लोकांमध्ये एकमेकांसाठी आदर, शांती व प्रतिष्ठेची भावना निर्माण होणे गरजेचे आहे. हाच उद्देश डोळ्यासमोर ठेऊन या ‘रन फॉर पीस अॅण्ड डेमॉक्रसी’ चे आयोजन करण्यात आले आहे.
सदर रॅली चार विविध ठिकाणांवरून निघणार आहे. बीएमसीसी मैदानावरून निघणारी रॅली गोखले पुतळ्यापासून निघून एफ.सी.रोड, शबरी चौक, घोले रोड, बालगंधर्व, पीएमसी मार्गे शनिवार वाडयावर पोचणार आहे. एमआयटी एसओएम, एमआयटी सीएमएसआर व डीएमएसआर, एमआयटी एसओएम, एमएसीएस, एमआयटी एसओएम या महाविद्यालयाचे विद्यार्थी या मार्गावरील रॅलीत सहभागी होतील.
बाबुराव सणस मैदानावरून निघणारी रॅली वसंतदादा पाटील व लोकमान्य टिळक पुतळ्यापासून निघून अभिनव चौक, बाजीराव रोड, शनिपार-एबीसी मार्गे शनिवारवाड्यावर पोचेल. एमआयटी बीएड, डीएड व एमएड कॉलेज, एमआयटी पॉलीटेक्नीक, एमआयटी एसओटी, फार्मसी माहाविद्यालयाचे विद्यार्थी या रॅलीत सामिल होतील.
साधु वासवानी मैदानावरून निघणारी रॅली साधु वासवानी पुतळा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा व महात्मा गांधी पुतळ्यापासून निघुन बंड गार्डन पोलिस स्टेशन, आंबेडकर भवन, जुना बाजार, कुंभारवाडा, सुर्या हॉस्पिटल मार्गे शनिवारवाड्यावर पोचेल. या मार्गावरील रॅलीत एमआयटी एसओबी, एमआयटी एसओजी, डब्ल्यूपीयू प्रथम वर्ष अभियांत्रिकी महाविद्यालयाचे विद्यार्थी सहभागी होतील.
अॅग्री कल्चरल कॉलेजच्या मैदानावरून निघणारी रॅली महात्मा फुले पुतळ्यापासून निघून शिमला हाऊस, मॉडर्न कॅफे, नवा पूल मार्गे सांगता स्थळी पोचेल. एमआयटी व एमआयटी सीओई चे विद्यार्थी या मार्गावरील रॅलीत सहभागी होतील. एकुण 18 हजार विद्यार्थी व 2 हजार स्टाफ या रॅलीत सहभागी होतील. सोबतच एमआयटीचे शुभचिंतकही या रॅलीमध्ये सहभागी होऊन या उपक्रमास शुभेच्छा देतील.
या चारही ठिकाणावरून निघणार्या रॅली सकाळी 6.00 वाजता निघून 8.00 वाजताच्या दरम्यान शनिवार वाड्यावर पोचतील.