पुणे : “तुमचा संकल्प, तुमचे लक्ष्य तुम्हाला स्वत:लाच पूर्ण करावे लागते. त्यासाठी दुसरा कोणी येणार नाही. आपल्या दुखर्या बाजू आपल्याला आपल्या ध्येयापासून विचलित करतात. तसे व्हावयाचे नसेल तर त्यासाठी अधात्माचा आधार घावा. अधात्म्य आपल्याला अहिंसा शिकविते पण शेवटी अहिंसेसाठी देखील क्रांतीचीच गरज असते.” असे मत हरीद्वार येथील पतंजली योगपीठाचे सहसंस्थापक आणि पतंजली आयुर्वेद लि.चे व्यवस्थापकीय संचालक आचार्य बालकृष्ण यांनी काढले. डॉ. विश्वनाथ कराड एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी तर्फे विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या विशेष कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी डॉ. विश्वनाथ कराड एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड, विद्यापीठाचे कार्याध्यक्ष प्रा. राहुल विश्वनाथ कराड, कुलगूरू डॉ. जय गोरे, पतंजली योगपीठाचे ज्येष्ठ कार्यकारिणी सदस्य रामकुमार राठी, हरीद्वार येथील पतंजली योगपीठाच्या कार्यकारिणीचे सदस्य व औद्योगिक विषयांचे मुख्य केंद्रीय समन्वयक हरिभाई शाह, आघाडीचे स्थापत्य विशारद पद्मभूषण हाफीज कॉन्ट्रॅक्टर, प्रा.डी.पी. आपटे हे उपस्थित होते.
आचार्य बालकृष्ण म्हणाले, “आपला देश हे प्रतिभासंपन्न राष्ट्र आहे. मात्र येथे विकृती असणारेही लोक आहेत. शेवटी आपणच ठरवायचे की आपण कशाचा स्वीकार करायचा. आपले जीवन हे एका इमारतीसारखे असते. या इमारतीमध्ये अडचणरूपी किंवा विकृतीरुपी एखादी वीट असते जी तुमची संपूर्ण इमारत ढासळण्यासाठी कारणीभूत होऊ शकते. त्यामुळे आपल्या आयुष्यात अशा विटा राहणार नाहीत याची काळजी घ्या. ”
“दान करणे ही आपली संस्कृती आहे. मात्र पाश्चात्यांचे अनुकरण करून आपणही मला काय मिळणार, अशी धारणा करून घेतली आहे. स्व-सामर्थ्याच्या जोरावर आपण समाजाला काहीतरी देण्यासाठी झटले पाहिजे. जगाच्या उन्नतीसाठी आपण प्रयत्न करणे गरजेचे आहे. प्रतिकूलतेचा सामना करण्यासाठी सहनशीलता, धैर्य हे गुण आवश्यक आहेत मात्र हे गुण कोणत्याही पाठ्यपुस्तकात शिकविले जात नाहीत. त्यासाठी अध्यात्माचाच आधार घ्यावा लागतो.”
प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले, “विज्ञान आणि अध्यात्म यांच्या समन्वयानेच विश्वशांती नांदेल हे स्वामी विवेकानंदांचे वचन शिरोधार्य मानून मूल्याधिष्ठित वैश्विक शिक्षणपद्धतीची जगाला गरज आहे.”
प्रा. राहुल विश्वनाथ कराड यांनी प्रास्ताविक केले. प्रा. गौतम बापट यांनी सूत्रसंचलन केले. प्रा. डी.पी. आपटे यांनी आभार मानले.
जनसंपर्क विभाग,
माईर्स एमआयटी, पुणे.
अहिंसेसाठी देखील क्रांतीची गरज असते- आचार्य बालकृष्ण
Date:

