पुणे- २४ तास जनतेची तत्पर सेवा व सर्व सामान्यसाठी दिवस-रात्र पावसात सुरक्षेसाठी तैनात असलेल्यालोणी काळभोर क्षेत्रातील सर्व पोलीस व ट्रॅफिक पोलिस यांना एमआयटी विश्वराज हॉस्पिटलतर्फे रेनकोट वाटप करण्यात आले. या वेळी लोणी काळभोरचे पीएसआय बी. आर .पाटील व विश्वराज हॉस्पिटलचे डॉ. आशिषकुमार दोषी व अन्य मान्यवर उपस्थित होते.
सामाजिक कार्यात नेहमीच पुढाकार घेणारेे असा विश्वराज हॉस्पिटलचा नावलौकिक आहे. सोलापूर हायवेलगत असलेल्या विश्वराज मल्टि-स्पेशालिटी हॉस्पिटलला मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट उदयोन्मुख हॉस्पिटल या पुरस्कारानने गौरविण्यात आले आहे. या हॉस्पिटलमध्ये प्रत्येक महिन्यात सर्वांसाठी २-३ मोफत आरोग्य शिबिरे आयोजित करण्यात येतात. त्याचप्रमाणे आईला कन्यारत्न प्राप्त झाल्यास नॉर्मल व सिझेरिअर बिलावर ५० टक्के सवलत दिली जाते. तसेच सी.टी. स्कॅन, एक्स-रे, सर्व प्रकारच्या लॅब तपासण्या माफक दारात केल्या जातात.
विश्वराज मल्टि-स्पेशालिटी हॉस्पिटल हे पूर्व हवेलीतील सर्वात मोठे अत्याधुनिक ६५ बेडचे, अतिदक्षता विभाग, अत्याधुनिक १० सुसज्ज ऑपरेशन थिएटर, अत्याधुनिक कॅथलॅब, डायलिसिस विभाग, कार्डियाक, अॅम्ब्यूलन्स, औषधे, अग्रगण्य तज्ज्ञ डॉक्टर या सर्व सुविधांनी युक्त असे हे हॉस्पिटल आहे.
विश्वराज हॉस्पिटलतर्फे ट्रॅफिक पोलिसांना रेनकोट वाटप
Date:

