डॉ. विश्वनाथ कराड एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणे येथे व्याख्यान
पुणे : ङ्ग धर्माबद्द्ल आस्था हा चार दिवसांचा किंवा तात्पुरता विषय नसतो. तो भावनेशी निगडित असतो आणि कायमस्वरुपी देखील. आपल्या सगळ्यांना एकाच निर्मात्याने बनविले असून एकमेकांसोबत वाद घालण्यात काहीच अर्थ नाही. इस्लाम हा नेहमीच शांतीचा, निष्ठेचा संदेश देतो, ङ्घ अशा भावना श्रीराम जन्म भूमी – बाबरी मस्जिद विवादास्पद जागेसंबधीचे प्रतिवादी व लखनौ येथील सुप्रसिद्ध कायदे पंडित, तसेच, इस्लामचे गाढे अभ्यासक अॅड. जफरयब जिलानी यांनी व्यक्त केल्या.
डॉ. विश्वनाथ कराड एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणेतर्फे विश्वशांतीचा पुरस्कार करण्यासाठी ङ्गआंतरपंथीय आणि आंतरधर्मीय सलोख्याची गरज ङ्घ या विषयावर ते बोलत होते.
यावेळी नवी दिल्ली येथील सुप्रसिद्ध विद्वान, उर्दू लेखक व पत्रकार फिरोज बख्त अहमद (मौलाना अबुल कलम आझाद यांचे नातू) हे सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित होते. न्यूट्रॉन इलेक्ट्रॉनिक सिस्टीम प्रा. लि., मुंबईचे चेअरमन नानिक रुपानी व नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू प्रा.डॉ. एस. एन. पठाण हे उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड हे होते.
अॅड. जफरयब जिलानी म्हणाले, ङ्ग गेल्या काही वर्षांमध्ये मुस्लिम समुदायासाठी फारच कमी गोष्टी केल्या गेल्या आहेत. अगदी मुस्लिम अल्पसंख्याकांसाठी देण्यात येणारा फंड देखील कमीच होता.
राम मंदीर विषयावर बोलताना ते म्हणाले की, राम जन्मभूमी-बाबरी मस्जिद हा विनाकरण उकरून काढण्यात आलेला वाद आहे. हा केवळ राजकारण्यांचा डाव आहे. दोन्ही पक्ष दोन ध्रुवांवर आहेत. त्यामुळेच ही समस्या निर्माण झाली आहे. आज एक फार मोठा समुदाय माध्यमांवर नियंत्रण ठेवून आहे. काही वर्षांपूर्वी जे लोक अत्यंत निर्भीडपणे लिखाण करायचे ते आज मूग गिळून गप्प बसले आहेत. ङ्घ
फिरोज बख्त अहमद म्हणाले, ङ्ग जो पर्यंत एखाद्या व्यक्तीला चांगले शिक्षण मिळत नाही. तो पर्यंत ती व्यक्ती कधीच शांतीचा विचार करणार नाही. सोबतच एखादी व्यक्ती कितीही उंचीवर पोचली तरी त्याचे पाय जमिनीवरच रहायला हवेत. कारण पाय जमिनीवरच असतील तरच व्यक्ती अत्यंत उंचीचे काम करु शकते. त्या काळात सर सय्यद अहमद खान यांनी जे कार्य केले, त्याच स्वरुपाचे कार्य करण्याची आज गरज आहे. ङ्घ
प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले, ङ्ग इस्लाम नेहमीच शांतीचा संदेश देतो. आज आपण कोणत्याही जातीचे- धर्माचे असू. आपणा सर्वांना येथेच जगायचे आणि येथेच मरायचे आहे. आज या दोन्ही धर्मांमध्ये विश्वास असणे नितांत गरजेचे आहे. सोबतच एकमेकांसोबत सुसंवाद होणे देखील तितकेच गरजेचे आहे. जेव्हा तुमची वृत्ती चांगली असेल तेव्हा नक्कीच तुमचा सर्वांशी सलोखा होतो. ङ्घ
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. एस. एन. पठाण यांनी केले. प्रा. गौतम बापट यांनी सूत्रसंचालन केले व आभार प्रदर्शन केले.

