एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंटच्या विद्यार्थ्यांनी घेतला संसदीय कामकाजाचा प्रत्यक्ष अनुभव..!
पुणे : माईर्स एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंटच्या विद्यार्थ्यांसाठी या अभिरूप संसदेचे आयोजन करण्यात आले होते. या अभिरूप संसदेचे सभापती म्हणून जम्मू व काश्मीर विधानपरिषदेचे उपसभापती मा. श्री. जहांगीर हुसेन मीर यांनी स्थ्लृान भूषविले. तर उपसभापती म्हणून ब्रिगेडियर हरींदर सिंग यांनी कामकाज पाहिले. विधेयकावरील खडाजंगी चर्चा, निरनिराळ्या राज्यांच्या विभाजनानंतर अन्य राज्यात निर्माण झालेले प्रश्न, समितीच्या अहवालातील त्रुटी अशा देशव्यापी आणि समकालीन प्रश्नांची मांडणी करणार्या अभिरूप संसदेद्वारे माईर्स एमआयटी स्कूल ऑङ्ग गव्हर्नमेंटच्या विद्यार्थ्यांनी संसदेच्या प्रत्यक्ष कामकाजाचा अनुभव घेतला.
यावेळी माईर्स एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंटच्या संचालिका प्रा.डॉ. शैलश्री हरिदास या उपस्थ्लिृत होत्या.
या अभिरूप संसदेमध्ये पंतप्रधान म्हणून विद्य श्रीनिवासा चारी, अर्थ्लृमंत्री म्हणून राजेश गुर्जर आणि गृहमंत्री म्हणून दीक्षा महाले यांनी जबाबदारी पार पाडली. विरोधी पक्षनेतेपदी विद्यार्थ्लृी एस. हानूशंकर हे होते.
तमिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री श्रीमती जयललिता व केरळमधील केंद्रीय मंत्री पी.ई.अहमद यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहण्याच्या प्रस्तावाला सभापतींनी अनुमोदन दिले.
यावेळी सत्ताधारी पक्षाने मांडलेल्या विधेयकांवर विरोधकांनी जोरदार हल्ला चढविला. याखेरीज गृहमंत्रालय, रस्ते वाहतूक, जलसंधारण, शेती, ग्राहक संरक्षण, नैसर्गिक आपत्ती निवारण, शेतकर्यांच्या आत्महत्या, पर्यावरण, खाणी व प्रदूषण नियंत्रण इत्यादी विषयांवर साधक-बाधक चर्चा झाली. समित्यांच्या अहवालांच्या मागे शासनाने दडू नये, असे विरोधी खासदारांनी बजावले. पत्रकारांवरील राजकीय नेत्यांचा प्रभाव, विविध समित्यांचे अहवाल यासंदर्भात विरोधकांनी विचारलेल्या प्रश्नांना सत्ताधार्यांनी उत्तरे दिली. या संसदेत सत्ताधार्यांनी एकंदरीत देशाच्या विकासाचे धोरण मांडले, त्यावरही चर्चा घेण्यात आली.
प्रत्यक्ष लोकसभेप्रमाणेच प्रश्नोत्तरांचा तास व शून्य प्रहराची अंमलबजावणी झाली. या अभिरूप संसदेत महिलांवरील लैंगिक अत्याचार विरोधी ठराव मांडण्यात येऊन तो बहुमताने संमत करण्यात आला. स्वत: पंतप्रधानांनी हस्तक्षेप करून विरोधी पक्षाच्या सदस्यांच्या शंकांचे निरसन केले. येथ्लृील विद्यार्थ्यांनी जी शिस्त व संयम दाखविला, तो खर्या लोकसभेतही आचरणात आणण्यासारखा होता. या सर्व काळात मंत्र्यांनी कशा प्रकारे उत्तरे द्यावीत, याबाबत सभापती माननीय जहांगीर साहेबांनी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी लोकसभेच्या कामकाजाचा कितपत अभ्यास केला आहे, त्याचा कस लागतो असे ते म्हणाले. तसेच, विरोधकांच्या प्रश्नांना अनुसरून आपला कारभार कसा बदलावा या दृष्टीने सूचना केल्या. यामध्ये अभिरूप संसदेचे पंतप्रधानही सुटले नाहीत.
या संसदेतील अनुभव हा आम्हाला आयुष्यभर पुरेल व आमच्या राजकीय कारकीर्दीला तो निश्चितच उपयुक्त ठरेल, असे मत अभिरूप संसदेतील विद्यार्थ्लृी खासदारांनी मांडले.
प्रा. डॉ. शैलश्री हरिदास यांनी प्रास्ताविक व आभारप्रदर्शन केले.