एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीतर्फे पहिली आंतरराष्ट्रीय कायदा आणि शांतता परिषद १४ पासून

Date:

पुणे,दि.१०डिसेंबर: एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणे भारत तर्फे पहिली ‘आंतरराष्ट्रीय कायदा आणि शांतता परिषद’ मंगळवार दि.१४ डिसेंबर २०२१ ते शुक्रवार,दि.१७ डिसेंबर २०२१ या कालावधीत एमआयटी डब्ल्यूपीयू, कोथरुड, पुणे येथे ऑनलाइन आयोजन करण्यात आले आहे. ‘जगात शांतीे संस्कृतीचा प्रचार आणि प्रसारासाठी कायद्याची भूमिका’ हा या परिषदेचा मुख्य विषय आहे.
या परिषदेचा उद्घाटन समारंभ मंगळवार, दि. १४ डिसेंबर २०२१ रोजी सकाळी १०.३० वा. होणार आहे. या समारंभासाठी सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती डॉ. अरिजित पसायत, सर्वोच्च न्यायालयाचे वकील डॉ. ललीत भसीन, पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती डॉ. भारतभूषण परसोन, केरळचे कायदे मंत्री पी. राजीव आणि न्यूट्रॉन इलेक्ट्रॉनीक सिस्टीम्स्चे अध्यक्ष नानीक रुपानी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. अध्यक्षस्थानी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ. विश्‍वनाथ दा कराड हे असतील.तसेच, एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कार्याध्यक्ष राहुल विश्‍वनाथ कराड हे उपस्थित राहतील.
या परिषदेचा समारोप समारंभ शुक्रवार दि.१७ डिसेंबर २०२१ रोजी दुपारी ४.३० वा. होणार आहे. या समारंभासाठी ज्येष्ठ कायदे तज्ञ व सरकारी वकील पद्मश्री डॉ.उज्ज्वल निकम,  यूएन इंटरनॅशनल लॉ कमिशनचे डॉ. अनिरुद्ध राजपूत, राष्ट्रीय रक्षा युनिव्हर्सिटीचे कुलगुरू   डॉ. बिमल एन. पटेल, राज्य सभेचे खासदार सुजीत कुमार व सुप्रीम कोर्टाचे वकील डॉ. ललित भसीन हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील.
या परिषदेच्या उद्घाटन व समारोपा व्यतिरिक्त ८ सत्रे होणार आहेत.
पहिले सत्र  ः भविष्य ई कोर्टाचे
दुसरे सत्र   ः   डीएनए प्रोफायलींग – पुढे जाण्याचा मार्गतिसरे सत्र  ः  स्पर्धा किंवा अविश्‍वास कायद्याचे बदलते परिमाण
चौथे सत्र   ः यूथ टू यूथ कनेक्ट
पाचवे सत्र   ः  साक्षी मागील सत्यतासहावे सत्र   ः  आपीआर आणि स्पर्धा कायदाः ध्रुव वेगळेसातवे सत्र   ः  मानव अधिकार कायदा आणि कृत्रिम बुद्धिमत्ताः रोड मॅपआठवे सत्र   ः  २१ व्या शतकातील कायदयाचे शिक्षणया सत्रामध्ये पंजाब मानव अधिकार कमिशनचे प्रमुख न्यायमूर्ती इक्बाल अहमद अन्सारी, अयोध्या येथील वरिष्ठ पोलिस अधिकारी आशिष तिवारी, सर्वोच्च न्यायालयाचे नामांकित वकील मकरंद आडकर, दुबईचे डिप्लोमॅट बिझनेस क्लब, लंडनचे प्रमुख डॉ. मन्सुर मलिक, युएसए येथील केनिथ विन्कोल, हाँगकाँग येथील प्रा.डॉ.जी.एल. ग्लिन्थल, केरळ येथील उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अनु शिवरामण, सीआयआयचे सल्लागार डॉ. संजय कुमार पांडे,  डॉ. जे. के. गोस्वामी यांबरोबरच विधी, सामाजिक, अध्यात्म, पोलिस दल व सायबर क्षेत्रातील मान्यवर तज्ञ आपले विचार मांडणार आहेत.
कायद्याच्या दृष्टीकोनातून शांतता आणि सुसंवादाची घोषणा करणे हा या परिषदेचा मुख्य हेतू आहे. तसेच, न्याय, समानता आणि सद्सद्विवेकबुद्धीची तत्त्वे आत्मसात करून कमी प्रक्रिया आणि धोरणात्मक निर्णयांद्वारे समाजात शांतता आणि सौहार्दाला प्रोत्साहन देणे हे या परिषदेचे उद्दिष्ट आहे.
अशी माहिती एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कुलगुरू डॉ. आर.एम.चिटणीस, लिबरल आर्ट विभागाच्या अधिष्ठाता प्रा.डॉ.अनुराधा पराशर, पुणे जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. सतिश मुळीक, जयपूर येथील नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीचे डॉ. मनोजकुमार सिन्हा व स्कूल ऑफ लॉ च्या प्रमुख  डॉ. पोर्णिमा इनामदार यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या परिषदेच्या अधिक माहितीसाठी www.mitwpu-islp.com,www.mitwpu.edu.in संकेत स्थळाला भेट दयावी.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

सर्व धर्मीय ख्रिसमस स्नेह मेळावा संपन्न

पुणे; पुण्यातील येरवडा – शास्त्रीनगर भागातील सेक्रेड हार्ट चर्च येथे...

पुरंदर विमानतळामुळे पुणे परिसरातील औद्योगिक विकासाला प्रोत्साहन-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

• पुरंदर विमानतळाच्या भूसंपादनासाठी जास्तीत जास्त दर देण्याचा विचार•...

राज बब्बर,रमेश बागवे, मोहन जोशी,वसंत पुरकेंसह काँग्रेसच्या ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर.

मुंबई, दि. २३ डिसेंबर २०२५ राज्यातील २९ महानगरापालिकांच्या निवडणुकीसाठी काँग्रेस...

सत्तेच्या लोभी राजकारणाला आम आदमी पार्टी शह देईल..अरविंद केजरीवाल,भगवंत मान पुण्यात प्रचाराला येणार

पुणे- ' महाराष्ट्रात प्रस्थापित राजकीय पक्षांनी विचारधारा सोडून सामान्य...