पुणे, दिः १७ जून: माईर्स एमआयटीच्या श्री संत ज्ञानेश्वर माध्यमिक विद्यालयातील १०वींत शिक्षण घेणारी विद्यार्थीनी प्रियंका चंद्रहास गुरव हिने पेन्सिलच्या माध्यमातून राज्याचे उपमुख्यमंत्री व पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांचे स्केच रेखाटून, त्यांना भेट दिले. त्यावेळी उपमुख्यमंत्री पवार यांनी तिच्या या कलेचे कौतुक केले.
निमित्त होते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या २२ व्या वर्धापन दिनाचे. यावेळी सुप्रसिद्ध अभिनेता व खासदार डॉ.अमोल कोल्हे, आमदार सुनील (अण्णा) शेळके, आमदार अशोक (बापू) पवार, राजेंद्र थोरवे आणि श्रीहरी शिवपुरकर उपस्थित होते.
यापूर्वी ही प्रियंका गुरव हिने पेन्सिलच्या माध्यमातून विविध क्षेत्रातील अनेक नामवंत व्यक्तींचे चित्र रेखाटले. माईर्स एमआयटीच्या वतीने तिच्या या गुणांचे कौतुक केले आहे. प्रियंकाच्या या कलेला वाव मिळण्यासाठी विद्यालयाच्यावतीने शुभेच्छा दिल्या.


