पुणे, दि. १७ मार्च: त्रिमितीय तंज्ञानाच्या उपयोग वैद्यकीय शिक्षण, प्रशिक्षण आणि संशोधन या कृतिकक्षा वर एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी आणि डसॉल्ट सिस्टिम फाऊंडेशन यांच्यात संशोधन सामंजस्य करार झाला आहे. या करारावर एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कुलगुरू डॉ.एन.टी.राव व डसॉल्ट सिस्टिम फाऊंडेशनच्या डसॉल्ट सिस्टिम सोल्युशन्स लॅबचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुदर्शन मोगासले यांनी स्वाक्षर्या केल्यात. यावेळी माईर्सचे संस्थापक व सह व्यवस्थापकीय विश्वस्त प्रा. प्रकाश जोशी हे उपस्थित होते.
वैद्यकीय सेवेचा दर्जा आणि उपयोगिता वाढविण्यासाठी दिवसेंदिवस त्रिमितीय तंत्रज्ञानाचा उपयोग केला जात आहे. त्रिमितीय मुद्रणाचा उपयोग आता विविध हाडे आणि शरीराचे इतर अवयव निर्मितीसाठी होत आहे. या त्रिमितीय तंत्रज्ञानाची ओळख, प्रशिक्षण आणि त्याची वैद्यकीय विद्यार्थ्यांना लवकर अधिमुखता व्हावी हे या करारामागे ध्येय आहे. वैद्यकीय अभ्यासासाठी त्रिमितीय तंत्रज्ञानाची उपयुक्तता आणि जागरूकता आणणे हा कराराचा हेतू आहे. यातून वैद्यकीय विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार असून त्यासाठी लवकरच अर्ज मागविले जातील.
या प्रसंगी सॉल्ट सिस्टिम फाऊंडेशनचे संचालक हेमंत गाडगीळ यांनी फाऊंडेशनच्या वेगवेगळ्या प्रकल्पांची विस्तृत माहिती दिली. हा प्रकल्प यंत्र अभियांत्रिकी संकुलामार्फत राबविण्यात येणार आहे.
प्रा. प्रकाश जोशी यांनी या सामंजस्यातून राबविलेले सर्व उपक्रम समाजोपयोगी असावेत याची दक्षता घेण्याचे आवाहन केले.
प्रकल्पाचे अन्वेषक प्रा. डॉ. गणेश काकांडीकर यांनी त्रिमितीय तंत्रज्ञान, त्रिमितीय मुद्रण, वर्धितवास्तव आणि आभासी वास्तव या सगळ्यांचा समावेश असलेले प्रशिक्षण वैद्यकीय विद्यार्थ्यांना दिले जाईल अशी माहिती दिली.
विद्यापीठाच्या अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता प्रा.डॉ. प्रसाद खांडेकर यांनी विद्यापीठात राबविल्या जाणार्या विविध तांत्रिक उपक्रमांची माहिती दिली.
यावेळी डसॉल्ट सिस्टिमचे निखिल सप्रे आणि कृष्णा पिल्ले उपस्थित होते. प्रा.डॉ. दीपक हुजरे, प्रा. महेश प्रधान, प्रा. सुरभी राझदान, प्रा.डॉ. अनिल माशाळकर, प्रा.डॉ. राहुल जगताप, प्रा.धनश्री शेवडे, प्रा. समिधा जवादे, प्रा. आशिष पवार, प्रा. स्वनांद पाचपोर, प्रा. ओंकार कुलकर्णी, श्री संतोष चौधरी आणि श्री. विजय कोलते हे उपस्थित होते.
संकुल प्रमुख प्रा.डॉ. संदीप चव्हाण यांनी स्वागत केले.
प्रा. डॉ. शिवप्रकाश बर्वे यांनी आभार मानले.
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी आणि डसॉल्ट सिस्टिम फाऊंडेशन यांच्या संशोधन सामंजस्य करार त्रिमितीय तंत्रज्ञानाचा प्रसार आणि प्रचार
Date:

