एमआयटी सरपंच संसदेच्या ग्रामविकास कार्यास सहकार्य करा

Date:

विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांचे सदस्यांना आवाहन

पुणे, दि. ९ फेब्रुवारी : एमआयटी स्कुल ऑफ गव्हर्नमेंट अंतर्गत स्थापित सरपंच संसदेच्या ग्रामविकास उपक्रमांना सर्व विधानसभा सदस्यांनी सहकार्य करावे. असे लेखी आवाहन महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी केले आहे.
उपाध्यक्ष झिरवाळ यांनी २८८ पत्रांवर सह्या करून ते सर्व सदस्यांकडे पाठविले आहे. त्यांन पत्राच्या माध्यमातून आवाहन केले की, राजकीय क्षेत्र हे राष्ट्रनिर्माणाची सृजन प्रकिया घडवून आणण्याचे महत्वाचे साधन आहे. त्यासाठी कर्तृत्ववान युवकांनी सकारात्मक दृष्टीकोन ठेवून या क्षेत्रात यावे. त्याच प्रमाणे अभ्यासपूर्वक कार्यकर्तृत्व करणे आवश्यक आहे. या दिशेने युवकांना प्रेरित करून त्यांना प्रशिक्षित करण्याचे कार्य एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट करीत आहेत. या संस्थेच्या माध्यमातून दर वर्षी भारतीय छात्र संसद, राष्ट्रीय महिला संसद, राष्ट्रीय शिक्षक परिषद आणि राष्ट्रीय सरपंच संसद उपक्रम ही चालविले जातात.
राज्यातील ग्रामविकासाची प्रक्रिया अधिक गतिमान करण्यासाठी एमआयटी सरपंच संसदेचे अभ्यासपूर्ण व निश्चित दिशा देणारे विविध उपक्रम उपयोगाचे आहे. त्यामुळेच राज्याच्या सर्व विधानसभा सदस्यांना या संसदेला सहकार्य करण्याचे आवाहन नरहरी झिरवाळ यांनी केला आहे.
एमआयटी शिक्षण संस्थासमुहाचे कार्याध्यक्ष राहुल कराड यांच्या विचारचिंतनातून ही सरपंच संसद आकाराला आली आहे. पंचायतराज व्यवस्थेतील सर्व लोकप्रतिनिधींचे अराजकीय स्वरूपात संघटन करणे, शाश्वत ग्रामविकासासाठी त्यांचे प्रबोधन करणे व विविध उपक्रमांचे अभ्यासपुर्वक संयोजन करून त्यांना प्रत्यक्ष ग्राम विकास प्रक्रियेत मौलिक सहकार्य करून घेणे आहे. हे या संसदेचे प्रमुख उद्दिष्टे आहेत.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

बौद्ध धम्म हा मनःशांती ते विश्वशांती चा प्रतीक ~ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

बुद्धगया : भगवान गौतम बुद्धांनी आखिल मानवजातीच्या कल्याणासाठी...

नेपाळमध्ये बस महामार्गावरून नदीत कोसळली, 18 ठार:25 जखमी

काठमांडू:नेपाळमधील धादिंग जिल्ह्यात सोमवारी रात्री उशिरा एक बस महामार्गावरून...

हवामान विभागाचा 7 जिल्ह्यांना ‘येलो अलर्ट’,विदर्भात पावसाचा धुमाकूळ, तर कोकणात आंबा धोक्यात

मुंबई:रविवारी मध्यरात्रीपासून विदर्भातील नागपूर, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांत विजांच्या...

पाकिस्तानस्थित जैश-ए-मोहम्मदचे तीन सदस्य काश्मीर मध्ये ठार मारले..

दहशतवादी एका टेकडीच्या पायथ्याशी असलेल्या मातीच्या घरात लपलेले आढळले...