पुणे; सृष्टीच्या प्रत्येक जीवाची रचना दोन तत्त्वांनी सिद्ध होते. शरीर आणि मेंदू यांनी तयार होते ते वैज्ञानिक तत्व आणि ज्यामध्ये मन आणि आत्मा यांचा समावेश असतो ते अध्यात्मिक तत्व असते. या दोन्हीही तत्त्वांमधून जीवसृष्टीचे विश्वात्मक तत्व तयार होते. आज वैज्ञानिक पद्धतीने शरीरावर व शरीराच्या जैविक रचनेवर आणि बुद्धीवर अनेक प्रकारचे संशोधन झालेले आहे. परंतू मन आणि आत्मा यांच्यावर आतापर्यंत संशोधन झालेले नाही. हीच उणीव भरून काढण्यासाठी एमआयटी विश्वशांती विद्यापीठातर्फे भारतातील पहिलीच एमआयटी स्कूल ऑफ कॉन्शियसनेस -अल्टिमेट रिअॅलिटी, सुरू करण्यात आली आहे.
डॉ. विश्वनाथ दा. कराड, डॉ. विजय भटकर व राहुल कराड यांच्या मार्गदर्शनाखाली याचे कार्य चालणार आहे. नव वर्षाच्या पूर्वसंध्येला एमआयटी विश्वशांती विद्यापीठाचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड यांच्या बरोबर शास्त्रज्ञ डॉ. जयंत खंदारे, डॉ. सुमन कौल, डॉ. सुधीर कुमार, डॉ. योगेंद्र धर्माधिकारी व इतर सहकार्यांनी या संस्थेच्या कार्याचा शुभारंभ केला.
जगभरातील काही मोजक्या कॉन्शियसनेस स्कूलमध्ये रासायनिक व भौतिक शास्त्रीय पद्धतीने या विषयाची हाताळणी केली जात आहे. पण एमआयटी स्कूल ऑफ कॉन्शियसनेस-अल्टिमेट रिअॅलिटी
ही संस्था प्रथमच अध्यात्मिक अधिष्ठान देऊन म्हणजेच Spirituality Oriented Scientific Laboratory म्हणून या विषयावर काम करेल. त्याचबरोबर कॅन्सर आणि कोविड-१९ सारख्या गंभीर आजारावरही या संस्थेमध्ये संशोधन करण्यात येणार आहे.
डॉ. विश्वनाथ दा.कराड म्हणाले, आजच्या आधुनिक युगामध्ये ज्ञानाची भाषा बदलली आहे. आज कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात आर्टिफिशियल इंटेलिजन्स, माहिती तंत्रज्ञान, फेसबूक, गुगल अशा माध्यमातून माहितीचा प्रसार होत आहे. परंतु संत ज्ञानेश्ववर महाराजांच्या संजीवन समाधीच्या ७३० वर्षानंतर देखील खर्या अर्थाने ज्ञानतत्व, निसर्गतत्व याचा संदेश लोकांपर्यंत पोहोचू शकला नाही ही खेदाची बाब आहे. शास्त्रीय सिद्धांत आणि आध्यात्मिक सिद्धांत याचे एकत्रिकरण म्हणजे वैश्वक सिद्धांत होय. अशा अर्थाचे कथन संतश्री ज्ञानेश्ववर माऊलींने केले होते. त्याची प्रचिती जगासमोर येत आहे. तसेच, विज्ञानाचे चिंतन झाल्यानंतर जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉ. पेन्ड्रोज, डॉ.एर्विन श्रॉडिन्डर व अल्बर्ट आईन्स्टाईन यांच्या म्हणण्या नुसार विज्ञानाच्या युगात अध्यात्मिक वैश्विक तत्वे महत्त्वाची आहेत. या सृष्टीला चालवणारी चैतन्यमय अशी शक्ती असेही ते म्हणाले.
एमआयटी स्कूल ऑफ कॉन्शियसनेस – अल्टिमेट रिअॅलिटी संस्थेच्या कार्याचा नव वर्षाच्या पूर्वसंध्येला शुभारंभ
Date:

