पुणे: नवी दिल्ली येथील युनेस्को मुख्य कार्यालय व एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणे यांच्यातर्फे भारतातील युनेस्को अध्यासन प्रमुखांची राष्ट्रीय पातळीवरील दोन दिवसीय बैठक 9 व 10 डिसेंबर रोजी होणार आहे. ही बैठक नवी दिल्ली क्लस्टर येथील युनेस्कोचे संचालक एरिक फाल्ट यांच्या अध्यक्षतेखाली विश्वराजबाग, लोणी काळभोर येथील एमआयटी आर्ट, डिझाइन अँड टेक्नॉलॉजी युनिव्हर्सिटीमध्ये होणार आहे.
ही बैठक 10 डिसेंबर रोजी सकाळी 9.30 वा. सुरू होईल. यावेळी महाराष्ट्र अॅकॅडमी ऑफ इंजीनियरिंग अँड एजुकेशन रिसर्चचे व शांतता, मानवाधिकार आणि लोकशाहीच्या युनेस्को अध्यासनाचे प्रा.डॉ. विश्वनाथ दा कराड हे बीज भाषण देतील.
या बैठकीत मणिपाल अॅकॅडमी ऑफ हायर एजुकेशनचे व शांती, संस्कृती आणि अहिंसा यांचे प्रसारक आणि युनेस्को अध्यासक एम.डी. नलपाठ, बनारस हिंदू युनिव्हर्सिटीचे व शांतता आणि आंतरसांस्कृतीक आदान-प्रदान प्रियांकर उपाध्याय, अमृता विद्यापीठाचे व स्त्री-पुरूष समता आणि महिला सबलीकरणच्या युनेस्को अध्यासक भवानी राव, राममिशन विवेकानंद विद्यापीठ व सर्वांगिण मान्यतेचे शारीरिक शिक्षण आणि योगाचे युनेस्को अध्यासक आशिष गोस्वामी, सृष्टी स्कूल ऑफ आर्ट, डिझाइन अॅण्ड टेक्नॉलॉजी व संस्कृती, सवई आणि शाश्वत विकासचे युनेस्को अध्यासक नारायण गिता, सेंट अॅन्डूस कॉलेज ऑफ ऑर्टसचे आंतरधर्मीय आणि आंतरसांस्कृतीक संवादाचे युनेस्को अध्यासक, पॉल पापार्ड प्रतिष्ठानचे धर्मगुरू डॉ. शर्मिला धोटे, सोसायटी फॉर पार्टीसिपेटरी रिसर्च इन एशिया व उच्च शिक्षणामध्ये सामाजिक बांधिलकी आणि समाजाला पायाभूत असे संशोधन करणारे युनोस्केचे अध्यासक डॉ. राजेश टंडन, सोसायटी फॉर पार्टीसिपेटरी रिसर्च इन एशियांची पुजा पांडे, वाईल्ड लाईफ इंन्स्टीट्यूट ऑफ इंडियाचे डॉ. जी.एच. रावत, इन्स्टीट्यूट ऑफ ट्रायबल स्टडीज अँड रिसर्च युनिव्हर्सिटी ऑफ कालिकत येथील स्थानीक संस्कृती आणि परंपराच्या जतनासाठी संभाव्य युनेस्को अध्यासक डॉ. पुष्पलता, युनिव्हर्सिटी ऑफ कालीकथचे सामुदायिक अपंगत्व व्यवस्थापन आणि सर्वेउपचार पद्धतीचे संभाव्य युनेस्को अध्यासक रहीमुद्दीन.पी.के. आणि युनिव्हर्सिटी ऑफ कालीकथचे मोहम्मद फवाज हे सहभागी होणार आहेत.
भारतातील 11 युनेस्को अध्यासनांचे प्रमुख 9 डिसेंबर रोजी आर. के. मेमोरियल, संगीत कला अकादमी, आश्रम, यज्ञकुंड, भगवद् गीता ज्ञान भवन आणि जगातील सर्वात मोठ्या घुमटाला भेट देतील.
अशी माहिती नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. एस.एन.पठाण यांनी दिली.