३७० कलम हटविणे ही ऐतिहासिक घटना प्रा.डॉ. विश्‍वनाथ दा. कराड यांचे प्रतिपादन

Date:

पुणे:“ केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज ऐतिहासिक घोषणा करत जम्मू काश्मीरला स्वतंत्र दर्जा देणारं वादग्रस्त ३७० कलम अंशतः हटवण्याचा प्रस्ताव सादर केला. त्यामुळे एमआयटी संस्थेच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमित शाह यांच्या स्वागताचा ठराव पारित केला. या घोषणेमुळे विश्‍वशांतीसाठी उचलेले एक पाऊल आहे.”असे विचार माईर्स एमआयटी शिक्षण संस्था समुहाचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ.विश्‍वनाथ दा. कराड यांनी मांडले.
माईर्स एमआयटी शिक्षणसंस्था समुहातर्फे माईर्स एमआयटीचा ३७ वा स्थापना दिवस साजरा करण्यात आला. त्या प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी माईर्स एमआयटी अध्यक्ष डॉ. सुरेश घैसास, संस्थापक विश्‍वस्त प्रा. प्रकाश जोशी, अधिष्ठाता प्रा. शरदचंद्र दराडे-पाटील, विश्‍वस्त डॉ. चंद्रकांत पांडव, कोलकाता येथील चित्तरंजन नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटचे प्रा.डॉ.बी.पी. चॅटर्जी, एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कार्याध्यक्ष प्रा. डॉ. मंगेश तु. कराड, एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कार्याध्यक्ष प्रा. राहुल विश्‍वनाथ कराड, प्र कुलगुरू डॉ. मिलिंद पांडे, डॉ. आर.एम.चिटणीस व प्रा.डी.पी. आपटे आणि एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुनील राय हे उपस्थित होते.
प्रा. डॉ. विश्‍वनाथ दा. कराड म्हणाले,“ ऑगस्ट महिना हा खरच महत्वपूर्ण आहे. १ ऑगस्ट रोजी लोकमान्य टिळकांची पुण्यतिथी, ५ ऑगस्टला एमआयटीचा स्थापना दिवस व काश्मीर येथून ३७० ची धारा हटविण्यात आली, ९ ऑगस्ट क्रांती दिवस आणि १५ ऑगस्ट स्वातंत्र दिवस आहे. जे भारताच्या इतिहासाठी व विश्‍वशांतीसाठी महत्वपूर्ण आहे. २१व्या शतकात भारत विश्‍वगुरू म्हणून उदयास येणाच्या दृष्टीने आमचा काय सहयोग असेल यावर विचार करावा.”
“शिक्षकांच्या निरलस कार्यामुळे ५ खोल्यांतून सुरू केलेल्या संस्थेचा आज मोठा वटवृक्ष झाला आहे. संस्थेचे ४ विद्यापीठे आणि विश्‍वशांतीचा नारा देणारा जगातील सर्वात मोठ्या घुमटाची निर्मिती झाली.”
प्रा.पी.बी.जोशी म्हणाले,“ एमआयटीने सर्वसमावेशक दृष्टिकोन ठेवल्यामुळे या रोपाचे वटवृक्षात रूपांतर झालेले आहे. ही शिक्षकांनी चालविलेली संस्था असल्यामुळे येथील विद्यार्थी हा परिपूर्ण आहे. येथे कार्यरत प्रत्येक कर्मचार्‍यांनी आपले व्यक्तिमत्व वाढविण्यासाठी निरंतर वाचन करावे. तसेच कोणत्याही व्यसनाच्या आहारी जाऊ नये. जो मनापासून काम करेल तोच पुढे जाईल हे सूत्र लक्षात ठेवावे.”
डॉ. चंद्रकांत पांडव म्हणाले,“विश्‍वशांतीचा नारा देण्यासाठी उभारण्यात आलेला या डोम मधून सद्भवना, प्रेम, सहिष्णूता, मानवता, शांती आणि  वसुधैव कुटुंम्ब कमचा नारा दिला जाता आहे. हा संदेश पृथ्वीतलावरील सर्वांनाच आनंद देणारा आहे.”
डॉ. बी.पी. चॅटर्जी म्हणाले,“ विज्ञान आणि अध्यात्माच्या समन्वयाच्या आधारे चालणारी ही संस्था शिक्षण क्षेत्रात नवे मापदंड स्थापित करीत आहे. येथे शिक्षणाबरोबरच, संशोधन, रिसर्च या गोष्टींवर अधिक भर देत आहे. याचे मुख्य कारण म्हणजे येथील शिक्षक जे समर्पित भावनेने कार्य करीत आहेत.”
डॉ. मंगेश कराड म्हणाले,“समाजातील गरजा पूर्ण करण्याच्या दृष्टीने हे विद्यापीठ शिक्षण क्षेत्रात नव नवे बदल घडवून आणित आहे. ज्या पद्धतीने जगात मोठ्या प्रमाणात परिवर्तन होत आहेत त्या अनुसरूण आम्ही लिबरल ऑर्ट, वेगवेगळ्या विषयातील इंजिनियरींगच्या शाखा उघडल्या,जेणे करूण विद्यार्थी हा सर्व आव्हानांचा सामना करू शकेल. एमआयटीच्या विद्यार्थ्यांना तयार करून राष्ट्र निर्मितीचे कार्य केले जात आहे.”
प्रा. राहुल कराड म्हणाले,“ विज्ञान आणि अध्यात्माचा सन्मवय हा नवा विचार एमआयटीने या जगाला दिला आहे. तसेच, जगातील सर्वात मोठ्या घुमटाची निर्मिती करून विश्‍वशांतीचा नारा देणारे कदाचित हे एकमेव विद्यापीठ आहे. एमआयटीची स्थापनेनंतर आजपर्यंतचा कार्यकाळ हा वेगळा होता. परंतू आजच्या परिस्थितीत खूप मोठा फरक दिसून येतो. हा बदल काळानुरूप असल्याने प्रत्येकाने बदलत्या कार्यपध्दतीचा स्वीकार करून पुढे चालत रहावे. त्यातूनच एमआयटीचे नाव जगभरात पोहचण्यास मदत होईल. या बदलात सर्वांनी सहभागी व्हावेे.”
माईर्स एमआयटीच्या ३७ व्या स्थापनादिवसाचे औचित्य साधून संस्थेच्या वाटचालीत महत्वाचे योगदान देणार्‍या नऊ कर्मचार्‍यांचा गौरव करण्यात आला. यामध्ये एमआयटी स्कूल ऑफ मॅनेजमेंटच्या कोर्स हेड प्रा.डॉ. करुणा गोळे, एमआयटी डब्ल्यूपीयूचे उप कुलसचिव उत्तम पडवळ, एमआयटी डब्ल्यूपीच्या ग्रंथालयाचे प्रमुख नितिन जोशी, लोणी येथील विश्‍वशांती गुरूकुलाचे विजय अंभोरे, एमआयटी डब्ल्यूपीयूच्या हाऊस किपींग विभागाचे व्यवस्थापक गोकुळ पोमण, तळेगाव दाभाडे येथील मायमर मेडिकलचे कॉलेज सतिश मिटकरी, माईर्स एमआयटीचे मनोज तारू, माईर्स एमआयटीचे प्रभाकर गोर व लातूर येथील एमआयएमएसआर वैद्यकिय महाविद्यालयाचे नैय्यूम पठाण यांचा ‘माईर्स एमआयटी फाउंडेशन डे ’ पुरस्काराने सन्मान केला गेला.
यावेळी जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी एमआयटीला आपल्या संदेशतून शुभेच्छा दिल्या.
प्रा. डॉ.एल.के.क्षीरसागर यांनी प्रस्ताविक केले. प्रा. गौतम बापट यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. आर.एम.चिटणीस यांनी आभार मानले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

विकास, सेवा, सुशासनला मतदारांचा कौल – भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण

नगरपालिका, नगरपंचायत निवडणुकीत महायुतीचा दणदणीत विजयभाजपावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल मतदारांचे...

पुण्यात अजीत पवारच ‘दादा’.. मविआ चा सुपडा साफ

पुणे -आज झालेल्या मतमोजणीत जिल्ह्यातील 17 पैकी 9 पालिकांमध्ये...

चारित्र्यवान व्यक्तींची साथ-संगत अन्‌ आव्हाने स्वीकारल्याने यशाची प्राप्ती : सचिन ईटकर

रंगत-संगत प्रतिष्ठानतर्फे सचिन ईटकर यांचा जिंदादिल पुरस्काराने गौरव पुणे :...