Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

वाढते वायू प्रदूषण मानवासाठी धोक्‍याची सूचना -वैज्ञानिक डॉ. गुफ्रान बेग

Date:

पुणे-आरोग्‍यपूर्ण जीवन जगण्यासाठी चांगल्‍या ऑक्‍सिजनची आवश्यकता असते. परंतू शहरातील वाढत्‍या वायू प्रदूषणाला आळा घातला नाही तर ते प्रत्‍येकासाठी धोक्‍याची सूचना आहे. चांगल्‍या वायूची गुणवत्ता ही मध्ये  (२.५ पीएम व १० पीएम) आहे. त्‍यासाठी सर्वांना वाढत जाणाऱ्या या प्रदूषणासाठी पाऊले उचलावी लागेल. त्‍यासाठी पेट्रोल व डिझेल वाहनांचा वापर कमी करणे, जनजागृती करणे व जे उपाय शोधले आहे त्‍याचे अनुकरण करावे. असे विचार  पुणे येथील आयआयटीमएम सफर चे संचालक व शास्‍त्रज्ञ  डॉ. गुफ्रान बेग यांनी मांडले.
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचा स्थापना दिवस व जागतिक पर्यावरण दिन कोथरूड येथील कॅम्‍पसमध्ये साजरा करण्यात आला. पर्यावरण दिवसाच्या निमित्ताने युनायटेड नेशन्सने संपूर्ण जगामध्ये “बीट एअर पोल्यूशन्स” ही थीम दिली होती.  त्याच धर्तीवर एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीने स्थापित केलेल्या “एअर क्वालिटी मॉनिटरिंग स्टेशन” चे उद्घाटन पाहुण्याचे करण्यात आले. त्‍याप्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्‍हणून बोलत होते.
यावेळी वाहन प्रदुषण नियंत्रण करण्यात यावे या करीता प्रा.डॉ. विश्‍वनाथ दा. कराड यांनी विकसीत केलेल्या “विश्‍वास सायलेन्सर”  टु व्हिलर, बस, ट्रक व टेम्पो इ . वाहनांना बसवून प्रात्यक्षिक दाखविण्यात  आले.
यावेळी आयसीसीआयडीडीचे अध्यक्ष डॉ. चंद्रकांत पांडव, दिल्ली येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थचे संचालक डॉ. संजय झोडपे, टेरी पॉलिसी सेंटरचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र शेंडे , चेस्ट रिसर्च फाउंडेशनचे संचालक डॉ. संदीप साळवी, चंडिगढ येथील पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूटचे प्राध्यापक व प्रमुख, डॉ. राजेश कुमार व पुण्याच्या बी.जे.मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता डॉ. एम.पी.तांबे हे सन्‍माननीय पाहुणे म्‍हणून उपस्‍थित होते.
तसेच, एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ. विश्‍वनाथ दा. कराड, एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कार्याध्यक्ष प्रा.राहुल विश्‍वनाथ कराड , कुलगुरू डॉ. एस. परशूरामण , एमआयटीचे अधिष्ठाता प्रा. शरदचंद्र दराडे -पाटील आणि एमआयटी डब्‍ल्‍यूपीयूच्‍या पीस स्‍टडी विभागाचे प्रमुख प्रा. मिलिंद पात्रे हे उपस्‍थित होते.
डॉ. गुफ्रान बेग म्‍हणाले, वाहतुकीकरण, औद्योगिकरण, व अन्‍य कारणांनी वायू प्रदूषणात वाढ होते. तसेच घराबरोबरच औद्योगिकरणामुळे हे प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. औद्योगिकरणामुळे कार्बनडाय ऑक्‍साइडच्‍या प्रमाणात मोठी वृध्दी झाली आहे. त्‍यामुळे शरिरातील फुफ्फूस खराब होतात.  देशाची राजधानी ही वायू प्रदूषणाची ही राजधानी झाली आहे. त्‍यानंतर अहमदाबादचा नंबर लागतो. तिसऱ्या नंबर पुणे येथे ६५ ते ७५ टक्‍के प्रदूषण वाढले आहे. चौथ्या नंबर मुंबईचा नंबर येतो आणि त्‍यानंतर देशातील अन्‍य मोठ्या शहराचा नंबर येतो. देशातील वायू प्रदूषण कमी करण्यासाठी अत्‍याधुनिक वाहनांची संख्या वाढवावी, तसेच या संदर्भात जनजागृती ही अत्‍यंत महत्‍वाची आहे.
डॉ. विश्वनाथ दा. कराड म्‍हणाले, आज पर्यावरणात वायू प्रदूषण आणि  जल प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. ज्‍या प्रमाणे  मनाचे प्रदूषण वाढत असून त्‍याल नियंत्रित करणे गरजेचे आहे. जागतिक तापमान वाढ हा या सृष्टीवरील सर्वात मोठा प्रश्न उभा राहिला आहे. त्‍याला कमी करण्यासाठी ठोस पाऊले उचलावी. आपल्‍या शहराचा विचार केला असता दर दिवसाला ५ हजार वाहने रस्‍त्यांवर येतात. त्‍यामुळे वायू प्रदूषण मोठ्या प्रमाणवर वाढत आहे. विश्वास सायलेन्‍सर लावण्याने वाहनांचे प्रदूषण कमी होण्यास मदत मिळेल.
डॉ. राजेंद्र शेंडे म्‍हणाले,  पर्यावरण दिवसाबरोबरच आजचा दिवस हा स्‍टॉप टॉकिंग टू द मशीनचा आहे. भविष्य काळात  ७५ बिलियन मशीन्स येतील जे जनसंख्येपेक्षा कित्‍येक पटीने मोठे असतील. त्‍यावेळी  यंत्राच्‍या वाढत्‍या आवाजाला थांबविणे खूप गरजेचे असेल. पर्यावरणाबरोबर शांतता ही गरजेची आहे.  २०१९ मध्ये साजरा केल्‍या जाणाऱ्या या पर्यावरण दिवसी संकल्‍प केला पाहिजे की पर्यावरण रक्षणासाठी योग्‍य ती पाऊले उचले गेली पाहिजेत. पृथ्वी, जल, अग्‍नी, वायू आणि आकाश या पंचमहाभूतांची रक्षा करणे गरजेचे आहे.
डॉ. एम.पी. तांबे म्‍हणाले, वायू प्रदूषणामुळे आरोग्‍याचा धोका वाढला आहे. त्‍यामुळे छातीचे व श्वासाचे आजारात दिवसेंदिवस वाढ होत आहे.
डॉ. राजेश कुमार म्‍हणाले, स्‍वताचा शोध हेच जीवन जगण्याचा उद्देश आहे. मग आपण कसे जगायचे हे आपल्‍या हातात आहे. विज्ञानाने बरीच प्रगती केल्‍यामुळे आपले जीवन सुखमय झाले आहे.
डॉ. संदीप साळवी म्‍हणाले, घरातील वायू प्रदूषणामुळे जवळपास ५० टक्‍के आजार उद्भवतात. त्‍यामुळे घरातील प्रदूषणाला थांबावे. या प्रदूषणामुळे ९० टक्‍के लोकांना योग्‍य ऑक्‍सिजन मिळत नाही. यामुळेच कित्‍येक लोक हे मृत्‍यूशी झुंज देत असतात. यावरूण हवा किती महत्‍वाची आहे हे कळते.  प्रदूषणामुळे फूफ्फूस खराब होते तसेच हदय रोग, किडनी, मधुमेह व विसराळूपणा, कॅन्‍सर यासारखे आजार निर्माण होतात.
डॉ. संजय झोडपे म्‍हणाले, मानवतेसाठी  शाश्वत विकास हा अत्‍यंत महत्‍वपूर्ण आहे. वाढत जाणाऱ्या वायू प्रदूषणावर नियंत्रण करणे गरजेचे आहे. गुणवत्तापूर्ण जागतिक आरोग्‍य सेवा देणे हे ही गरजेचे आहे. स्‍वस्‍थ्य भारत स्‍वच्‍छ भारत हा नारा समाजापर्यंत पोहचविणे गरजेचे आहे.
प्रा. राहुल विश्वनाथ कराड, एमआयटी डब्‍ल्‍यूपीयूला दोन वर्ष पूर्ण झाले आहेत. या विद्यापीठाने नेहमीच पंचमहाभूताचे रक्षण करण्यासाठी पाऊले उचली आहेत. तसेच, एमआयटीच्‍या स्‍थापनेपासून  पर्यावरण नियंत्रणासाठी वेगवेगळ्या प्रयोग राबविले जात आहेत.  डॉ. विश्वनाथ कराड यांनी तयार केलेला विश्वास सायलेन्‍सर हा त्‍यातीलच एक मुख्य भाग आहे.
डॉ. एस. परशूरामन म्‍हणाले, सृष्टीवर वाढत जाणाऱ्या सर्व स्‍तरावरील प्रदूषणाला नियंत्रित करणे काळाची गरज आहे. वर्तमानकाळात पिण्याच्‍या पाण्याची सर्वात मोठी समस्‍या उद्भवली आहे. ही समस्‍या अशीच वाढत जाईल तर भविष्यात मोठा धोका निर्माण होईल.
डॉ.पी.के.भारद्वाज म्‍हणाले, आपल्‍या जीवनाचे आपणच मॉनेटर आहात. आपला व्‍यवहाराचा परिणाम हा पर्यावरणावर होत असतो. त्‍यामुळे अध्यात्‍माच्‍या आधारे जीवन जगल्‍यामुळे पर्यावरणाचे रक्षण होऊ शकते.
डॉ. चंद्रकांत पांडव यांनी कार्यक्रमाची प्रस्‍तावना व पाहुण्याचे स्‍वागत केले.
डॉ. मिलिंद पांडे यांनी सूत्रसंचालन केले.  प्रा.डी.पी. आपटे यांनी आभार मानले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

घरातच केली हायड्रोपोनिक गांजा ची लागवड -साडेतीन कोटीचा गांजा जप्त

पुणे : ३१ डिसेंबर च्या पार्ट्यांचे आयोजने सुरु असताना...

“आयुष्यावर बोलू काही” आणि बावधन-कोथरूड भूषण पुरस्कार सोहळा गुरुवारी

पुणे: राष्ट्रसेवा प्रतिष्ठानच्या वतीने सलील कुलकर्णी, शुभंकर कुलकर्णी आणि...

‘मनसे’शी युती म्हणजे उबाठा गटाचा अस्तित्व वाचवण्याचा शेवटचा प्रयत्न

भाजपा माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांची प्रखर टीकामुंबई-उबाठा...

‘आचार संहिता, नैतिक संकेतांची युती सरकार कडून पायमल्ली- काँग्रेस’चा आरोप

‘निवडणूक आयोगा’ने सत्ताधाऱ्यांना कारवाई च्या नोटिसा पाठवून आपली स्वायत्तता...