Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

एमआयटीतर्फे संत, शास्त्रज्ञ आणि तत्त्वज्ञांच्या पूर्णाकृती ५४ पुतळ्यांची स्थापना

Date:

पुणे- “एमआयटीच्या वतीने लोणी काळभोर येथे साकार होत असलेल्या जगातील सर्वात मोठ्या घुमटाच्या वास्तूमध्ये संत, शास्त्रज्ञ आणि तत्त्वज्ञांच्या पुतळ्यांची स्थापना करण्यात आली. त्यामुळे येथे विज्ञान, अध्यात्म आणि तत्त्वज्ञानाचा संगम झाला आहे. या घुमटातून सर्व जगाला मानवतेचा व शांतीचा संदेश दिला जाणार आहे.” असे मत जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी व्यक्त केले.
एमआयटी विश्‍व शांती विद्यापीठ, पुणे व विश्‍व शांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे, भारत यांच्यातर्फे ‘विश्‍वराजबाग’, लोणी काळभोर, पुणे येथे साकार होत असलेल्या, जगातील सर्वात मोठ्या व एकमेवाद्वितीय अशा घुमटाकार वास्तुमध्ये – तत्त्वज्ञ संत श्री ज्ञानेश्‍वर विश्‍वशांती प्रार्थना सभागृहात भारताच्या स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून, संत, तत्त्वज्ञ व शास्त्रज्ञांच्या भव्य व सुंदर अशा पुतळ्यांच्या स्थापनेचा समारंभ आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते.
भारताचा विश्‍वशांतीचा व मानवतेचा संदेश देणार्‍या या विशाल सभागृहामध्ये मानवकल्याणाचे महत्कार्य करणार्‍या आणि मानवी इतिहासाच्या जडणघडणीमध्ये महत्त्वपूर्ण योगदान देणार्‍या संत, शास्त्रज्ञ आणि तत्त्वज्ञांचे पूर्णाकृती पुतळे मान्यवरांच्या हस्ते बसविण्यात आले.
त्यापैकी संतश्री ज्ञानेश्‍वर महाराज, तत्त्वज्ञ संतश्री तुकाराम महाराज, बाबा बुल्लेेशाह, संत कबीर, प्लेटो, गॅलिलिओ, रामकृष्ण परमहंस, गुरू नानकदेव, भगवान महावीर, गौतम बुद्ध, येशू ख्रिस्त, सेंट पीटर, नरसी मेहता, संत तुलसीदास, आद्य शंकराचार्य, महर्षी वेदव्यास, मोझेस, अ‍ॅरिस्टॉटल, सॉके्रटिस, कांट, हेगेल, स्पिनोझा, आयझॅक न्यूटन, अल्बर्ट आइनस्टाईन, बेंजामिन फँ्रकलिन, लुई पाश्‍चर, चार्लस डार्विन, कोपर्निकस, हिप्पोक्रॅटस, मॅक्स प्लँक, गुरूदेव रवींद्रनाथ टागोर, सी.व्ही. रामन यांचे पूर्णाकृती पुतळे मान्यवरांच्या हस्ते स्थापन करण्यात आले.
यावेळी ज्येष्ठ संगणकतज्ञ पद्मभूषण डॉ. विजय भटकर, जगातील सर्वात मोठ्या रेडिओ दुर्बिणीचे जनक सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉ. गोविंद स्वरूप, ज्ञानोबा-तुकोबा पुरस्काराचे यंदाचे मानकरी ह.भ.प.किसन महाराज साखरे, भारताचे माजी केंद्रीय मंत्री आरिफ मोहम्मद खान, मौलाना अब्दुल कलाम उर्दू विद्यापीठाचे कुलपती डॉ. फिरोज बख्त अहमद, महान तपस्वी व साथक ह.भ.प. श्री. तुळशीराम दादाराव कराड, थोर मुस्लिम विचारवंत हजरत शेख बियाबानी, ज्येष्ठ पत्रकार डॉ. वेद प्रताप वैदिक, विचारवंत प्रा. रतनलाल सोनग्रा, श्रीलंकेचे बौद्ध साधक आनंद महाथेरोे, फादर डाबरे व डॉ.एडिसन सामराज यांच्या हस्ते पुतळ्यांची स्थापना करण्यात आली.
तसेच, थोर साधक श्रीकृष्ण उर्फ कर्वे गुरूजी, एमआयटी विश्‍व शांती विद्यापीठाचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ.विश्‍वनाथ दा. कराड, कार्याध्यक्ष प्रा. राहुल विश्‍वनाथ कराड, एमआयटी-एडीटी विद्यापीठाचे कार्याध्यक्ष  प्रा.डॉ. मंगेश तु. कराड, संस्कृतचे गाढे अभ्यासक पं.वसंतराव गाडगीळ, श्री.काशीराम दादाराव कराड, एमआयटी-एडीटी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुनील राय, एमआयटी विश्‍वशांती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.आय.के.भट व नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ.एस.एन.पठाण हे उपस्थित होते.
डॉ. रघुनाथ माशेलकर म्हणाले,“जगात अनेक वास्तू उभारलेल्या आहेत. परंतू डॉ. विश्‍वनाथ कराड यांनी उभारलेली ही वास्तू अनोखी आहे. यामध्ये विज्ञान आणि अध्यात्माची अनुभूती येते. विज्ञानमुळे बाह्य सुख तर अध्यात्मामुळे आंतरिक शांती मिळते. या दोन्हीचा मिलाफ येथे पहावयास मिळतो. हा घुमट केवळ भारतालाच नव्हे, तर संपूर्ण विश्‍वाला दिलेली अमूल्य देणगी आहे.”
डॉ. विजय भटकर म्हणाले,“स्वातंत्र्याच्या विशेष दिनी मानवतेचे मंदिर उभे राहिले. हे मानव कल्याणसाठी महत्वपूर्ण आहे. या सृष्टीवर आइनस्टाइन हे सर्वात थोर शास्त्रज्ञ होते. त्यांच्या सारख्या अन्य शास्त्रज्ञांचे पुतळे येथे उभे करून विज्ञान आणि अध्यात्माच्या समन्वयाने विश्‍वशांतीचा संदेश दिला गेला आहे.”
प्रा. डॉ.विश्‍वनाथ दा. कराड म्हणाले,“२००५ साली या घुमटाची मुहूर्तमेढ रोवली गेली. १२वर्षांनी ही वास्तू पूर्णत्वास आली आहे. त्यावेळी आम्हाला वाटले नव्हते की, जगातील सर्वात मोठा घुमट निर्माण होईल. अगदी अलिकडच्या काळातच आम्ही याची सत्यता पडताळून पाहिली, तेव्हा लक्षात आले की, हा जगातील सर्वात मोठा घुमट आहे. या वास्तूमध्ये संत, शास्त्रज्ञ आणि तत्त्वज्ञ यांच्या पुतळ्यांची स्थापना करण्यात आली. त्यांचा संदेश संपूर्ण मानव जातीच्या कल्याणसाठी होईल.”
डॉ. वेद प्रकाश वैदिक म्हणाले,“येथे उभारण्यात आलेला घुमट हे अध्यात्म आणि विज्ञानाच्या समन्वयाने निर्माण केलेले विश्‍वमंदिर आहे. त्यामुळे भविष्यात हे मानवतातीर्थ म्हणून जगात ओळखले जाईल. तसेच, विश्‍व यात्रा, पर्यटन आणि अध्यात्माचे केंद्र बनेल.”
आरिफ मोहम्मद खान म्हणाले,“येथील जगातील सर्वात मोठा घुमट हा तीर्थक्षेत्र म्हणून उदयास येईल. मानवजातीला समर्पित अशा या घुमटात अध्यात्म आणि विज्ञानाच्या महान अनुभूतीची प्रचीती मिळते.”
फिरोज बख्त अहमद म्हणाले,“देशासाठी समर्पित घुमटाच्या माध्यमातून मानवतेच्या कल्याणासाठी कार्य केले जाईल. तसेच जगाला सुख व शांतीचा मार्ग दाखविला जाईल.”
त्यानंतर डॉ.एन.महाथेरो, डॉ. एडिसन सामराज, पं.वसंतराव गाडगीळ,                प्रा. रतनलाला सोनग्रा यांनी आपले विचार मांडले.
प्रा.राहुल विश्‍वनाथ कराड यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन प्रा.गौतम बापट यांनी केले. प्रा.डॉ. मंगेश तु. कराड यांनी आभार मानले.
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

आज इंडिगोची ६५० हून अधिक उड्डाणे रद्द:६१० कोटी केले रिफंड,३०००प्रवाश्यांच्या बॅगा दिल्या परत …

मुंबई-आज इंडिगोच्या ६५० हून अधिक उड्डाणे रद्द करण्यात आली...

विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे व उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या नेतृत्वात हिवाळी अधिवेशन तयारीचा सविस्तर आढावा

“वीजपुरवठा, पार्किंग आणि वाहतूक व्यवस्थापनात कोणतीही त्रुटी राहणार नाही...