महात्मा गांधीजींच्या नावाने जगात भारताची ओळख प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड
एमआयटीत राष्ट्रपिता महात्मा गांधीजींना श्रद्धांजली
पुणे, ३० जानेवारीः“काही वर्षांपूर्वी आम्ही जिनीव्हाला गेलो होतो. त्यावेळी रजिस्टर मध्ये नाव लिहितांना मी माझे नाव व देशाचे नाव भारत असे लिहिले. ते पाहून तेथील रिसेप्शनिस्टने म्हंटले,‘ ओह. यू आर फ्रॉम इंडिया- द कन्ट्री ऑफ गांधी अॅण्ड बुद्धा. तेव्हा मला समजले की आम्ही किती भाग्यवान आहोत. मोहनदास करमचंद गांधी नावाचा वकील काही कामा निमित्त दक्षिण आफ्रिकेमध्ये गेला होता. रात्रीची वेळ होती. तो एका रेल्वेच्या डब्यात बसला होता. तेथे एक गोरा माणूस आला व त्याने मोहनदासला गाडीतून प्लॅटफॉर्मवर ढकलून दिले. त्याच क्षणी मोहनदास करमचंदमधून महात्मा गांधी जन्माला आले. महात्मा गांधी यांच्या नावाने जगात भारताला ओळखले जाते.” असे उद्गार एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड यांनी काढले.
एमआयटी विश्वशांती विद्यापीठ आणि विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी पुणेेतर्फे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यातिथी निमित्त त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कार्याध्यक्ष प्रा. डॉ. मंगेश तु. कराड, डॉ. चंद्रकांत पांडव, प्रा. प्रकाश जोशी, डॉ. सुनिल कराड, डॉ. सुचित्रा नागरे, प्रा. स्वाती चाटे, डॉ.एल.के. क्षीरसागर, डॉ. सुभाष आवळे व डॉ. सुनिल राय, डॉ. सुधीर गव्हाणे, डॉ. माधुरी कुलकर्णी हे उपस्थित होते.
यावेळी उपस्थितांनी महात्मा गांधीजींच्या प्रतिमेला फुले वाहून व दोन मिनिटे स्तब्ध राहून श्रद्धांजली वाहिली.