पुणे : आबूधाबी येथे आयोजित करण्यात आलेल्या जागतिक दर्जाच्या वर्ल्ड स्किल स्पर्धेत आळंदी येथील एमआयटी अॅकॅडमी ऑफ इंजिनियअरिंगच्या (एमआयटी एओई) विभोर मेश्राम व समर्थ गौदर या दोन विद्यार्थ्यांनी मोबाइल रोबोटिक्स कौशल्य स्पर्धेत ‘मेडल ऑफ एक्सलन्स’चा पुरस्कार प्राप्त करून देशाचा सन्मान वाढविला. त्यांच्या या यशाबद्दल एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ.विश्वनाथ दा. कराड यांच्या हस्ते त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
आबूधाबी येथे वर्ल्ड स्किल-2017 स्पर्धेत एमआयटी अॅकॅडमी ऑफ इंजिनियरिंगचे विद्यार्थी विभोर मेश्राम आणि समर्थ महेश गौदर याने भारताचे प्रतिनिधीत्व करतांना ‘मेडल ऑफ एक्सलन्स’चा पुरस्कार प्राप्त केला आहे. ‘प्ले ग्राउंड मानेटरिंग रोबो’ या थीमच्या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी मोबाइल रोबोटिक्सचे कौशल्य दाखवीत हे पदक प्राप्त केले. त्यांनी या रोबोचेे डिझाइन, फॅब्रिकेशन आणि प्रोग्रॅम स्वतः तयार केला होता. स्पर्धेत 59 देशातील 1300 पेक्षा अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते. यामध्ये सिंगापूर, फ्रान्स, जर्मनी, जपान, कोरिया, चीन, रशिया, नेदरलँड्स, हाँगकाँग बरोबरच अन्य देशातील विद्यार्थी सहभागी झाले होते.
या विद्यार्थ्यांना एमआयटी अॅकॅडमी ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ.योगेश भालेराव, डॉ.महेश गौदर आणि डॉ. आनंद मालेवार यांनी मार्गदर्शन केले.
कॉलेजचे प्राचार्य डॉ.भालेराव यांनी सांगितले की, या विद्यार्थ्यांना बक्षिसाच्या स्वरूपात प्रत्येकी एक एक लाख रूपये आणि नॅशनल स्किल डेव्हलमेंट ऑफ कार्पोरेशनकडून नोकरीची हमी देण्यात आली आहे.
‘वर्ल्ड स्किल स्पर्धेत’ मोबाइल रोबोटिक्समध्ये आळंदी येथील एमआयटी एओईच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश
Date:

