Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

राज्ये मजबूत झाल्यास देशाचा विकास ज्येष्ठ विचारवंत योगेंद्र यादव यांचे मत; आदर्श युवा आमदार पुरस्कार प्रदान

Date:

पुणे : ‘‘विविधतेत एकता या संकल्पनेवर आधारित आपला देश आहे. एक धर्म, एक भाषा, एक राष्ट्र ही युरोपियन संस्कृती भारतात उपयुक्त नाही. भाषेतील विविधता, संविधान व धार्मिक विविधतेचा स्विकार आणि स्थानिक राजकारण या चार गोष्टींचा स्विकार आपण केला आहे. त्यामुळे राज्यांनी जबाबदारीने देश पुढे नेण्याची आवश्यकता आहे. राज्ये मजबूत झाली, तर देश आपोआप विकासाचे ध्येय गाठेल,’’ असे मत ज्येष्ठ राजकीय विचारवंत योगेंद्र यादव यांनी व्यक्त केले.

माईर्स एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट व भारतीय छात्र संसद फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सहाव्या भारतीय छात्र संसदेत ‘देशाच्या मजबूतीकरणात राज्यांचे योगदान’ या विषयावर ते बोलत होते. याप्रसंगी त्यांच्या हस्ते ‘आदर्श युवा आमदार पुरस्कार’ आणि ‘उच्चशिक्षीत आदर्श युवा सरपंच पुरस्कार’ही प्रदान करण्यात आले. आंध्रप्रदेशतील उंडीचे आमदार वेटूकुरी वेंकटा शिवा रामा राजू आणि राजस्थानमधील गंगानगरच्या आमदार कामिनी जिंदल यांना आदर्श युवा आमदार पुरस्कार, तर पुणे जिल्हयातील मेदनकरवाडीच्या सरपंच प्रियांका मेदनकर, वाशिमच्या सरपंच सोनाली जोगदंड, राजस्थानमधील फरोडच्या सरपंच फरोदा चौधरी, जळगाव अमळनेरच्या सरपंच अंकिता पाटील, हिमाचल प्रदेशमधील चंदना गावाचे सरपंच सुरेंदर सिंग, राजस्थानच्या लिलावली गावाच्या सरपंच वसुंधरा चौधरी यांना उच्चशिक्षीत आदर्श युवा सरपंच पुरस्काराने गौरविण्यात आले.

याप्रसंगी व्यासपीठावर दिल्ली विधानसभेचे अध्यक्ष रामनिवास गोयल, जे. के. लक्ष्मीपथ विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. रोशनलाल रैना, ज्येष्ठ वीणावादक पंडित विश्‍वमोहन भट, जमायत उल्मा-ए-हिंदचे सरचिटणीस मौलाना मेहमुद मदानी, माईर्स एमआयटीचे उपाध्यक्ष व भारतीय छात्र संसदेचे प्रमुख समन्वयक राहुल कराड यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

योगेंद्र यादव म्हणाले, ‘‘राज्ये मजबूत झाली, तर देश कमकुवत होईल, ही धारणा चुकीची आहे. प्रादेशिक राजकारणाने देशाला लोकतांत्रिक ताकद दिली आहे. त्यामुळे स्थानिक राजकीय पक्ष हे देशाला आणखी मजबूत करतील. वाढत्या राज्यांची संख्या सशक्त भारताच्या निर्मितीमध्ये महत्वाचे योगदान देतील. जम्मू-काश्मिर, मणिपूर, नागालँड यांना देखील हक्क मिळायला हवे. प्रत्येक राज्याच्या विधानसभांनी कायदे पाळून कामकरायला हवे.’’

मौलाना मेहमुद मदानी म्हणाले, ‘‘जगासमोर आतंकवादाचे मोठे आव्हान आहे. इस्लामसह कोणताही धर्म अन्याय आणि अत्याचाराची शिकवण देत नाही. देशातील मुस्लिमांसाठी राहण्यासाठी भारतासारखी इतरत्र कोणतीही चांगली जागा नाही. आतंकवादविरोधातल्या लढाईत मुस्लिमांनी सक्रीय सहभागी व्हायला हवे. अनेकदा इस्लामची बदनामी होत असून, एकमेकांना चांगल्या गोष्टींसाठी मदत करणे, हाच खरा इस्लामआहे. धर्म ही थोपविण्याची गोष्ट नसून देशवासी कोणत्याही चुकीच्या गोष्टींना थारा देणार नाहीत.’’

विश्‍वमोहन भट म्हणाले, ‘‘देशातील विविधता आणि लोकशाहीची जपणूक करुन देशाच्या विकासासाठी तरुणाईने सशक्तपणे पुढे यायला हवे. भारतातील युवाशक्ती मोठी असून, देशाला पुढे नेण्यात ती मोठा वाटा उचलणार आहे. ’’

रामनिवास गोयल म्हणाले, ‘‘युवकांनी आपण ठरविलेले ध्येय पूर्ण करण्याच्या दृष्टीने वाटचाल करायला हवी. आपल्या ध्येयावर विश्‍वास ठेऊन कामकेल्यास देश नक्कीच पुढे जाईल. राज्यांना मजबूत करायचे असेल तर गावांपासून सुरुवात करायला हवी. त्याकरीता गाव आणि राज्यांच्या अधिकारांबाबत देखील विचार करण्याची आवश्यकता आहे. ’’

डॉ. रोशनलाल रैना म्हणाले, ‘‘भारताकडे प्रगतशील नाही, तर प्रगत राष्ट्र म्हणून पाहायला हवे. एकविसावे शतक हे ज्ञानाचे युग आहे. यामध्ये भारतातील युवकांचे योगदान मोठया प्रमाणात राहणार आहे. त्यामुळे राजकारणातदेखील सहभागी होत देशाच्या विकासासाठी पुढाकार घ्यायला हवा.’’ नीलमशर्मा यांनी सूत्रसंचालन केले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

जलतरण स्पर्धेत ध्रुव ग्लोबल स्कूलचा डंका,एकूण १० कांस्य पदके जिंकली.

पुणे, ५ डिसेंबर ः नांदे येथील ध्रुव ग्लोबल स्कूलच्या...

पार्क मेदी वर्ल्ड लिमिटेडची 920 कोटी रु. ची प्राथमिक समभाग विक्री 10 डिसेंबर पासून

      प्रत्येकी 2 रु. दर्शनी मूल्याच्या प्रति इक्विटी शेअरसाठी 154  रुपये ते 162  रुपये...

पुणेकर दीपाली अमृतकर-तांदळे ठरल्या’मिसेस गोल्ड हेरिटेज इंटरनॅशनल युनिव्हर्स’

पिंपरी-चिंचवडच्या दीपाली अमृतकर-तांदळे यांना'मिसेस गोल्ड हेरिटेज इंटरनॅशनल युनिव्हर्स' किताबसमृद्ध...