पुणे, – मिसेस महाराष्ट्र २०१६ ची अंतिम फेरी रेसिडेन्सि क्लब येथे नुकतीच पार पडली. ही स्पर्धा ‘क्लासिक’ (३५-५० वय वर्ष) आणि ‘रेग्युलर’ (२०-३५ वर्ष) या दोन गटात झाली. यासाठी वय, वजन, उंची यांचे बंधन नव्हते.
‘क्लासिक’ विभागातील विजेती शिल्पा ओझा ठरली तर स्वाती बॅनर्जी व रेश्मा अमुलानी या अनुक्रमे पहिली व दुसरी उपविजेत्या ठरल्या. ‘रेग्युलर’ विभागाची विजेती डाॅ. राधिका वाघ तर श्रद्धा रामदास व गौरी शिरोडकर या अनुक्रमे पहिली व दुसरी उपविजेत्या ठरल्या. यावेळी जवळपास सातशे प्रेक्षक उपस्थित होते.
रश्मी सचदेवा ही मिसेस युनिव्हर्स फायनलिस्ट (अॅण्ड गोल्डन हर्ट), गृहलक्ष्मीच्या कार्यकारी संपादिका वंदना वर्मा, प्रणित ग्रीवाल मिसेस इंडिया अर्थ आणि बुटिक बिलेनिअरचे मालक भरत राठोड हे परिक्षक म्हणून उपस्थित होते.
मिसेस महाराष्ट्र २०१६ हे एक महिलांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेले व्यासपीठ होते. ज्यामध्ये पुणे, मुंबई, नागपूर, अहमदनगर, कोल्हापूर आणि बारामती येथील महिला सहभागी झाल्या होत्या.
कार्ल आणि अंजना मास्क्रीनस यांच्या संकल्पनेने हा कार्यक्रम साकारला होता.


