ही फक्त झांकी आहे…पिक्चर बाकी आहे
विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर
मुंबई, दि. २३ जानेवारी – मीरा- भाईंदरमध्ये भाजपा पूर्ण ताकदीनिशी भाजपचे जे वैभव होते ते पुनः प्राप्त करील, असा आत्मविश्वास व्यक्त करतानाच ही फक्त झांकी आहे, मीरा- भाईंदरचा पिक्चर अजून बाकी आहे असे परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी स्पष्ट केले.
मीरा-भाईंदरचे शिवसेनेचे विभागप्रमुख संजय वर्तक यांनी आज विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती दिनीच मीरारोड येथील शिवसेना विभागप्रमुख संजय वर्तक यांनी विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. यावेळी त्यांच्यासमवेत शेकडो शिवसैनिकांनीही भाजपात प्रवेश केला. त्याप्रसंगी दरेकर बोलत होते. ते पुढे म्हणाले की, समाजातील सर्व स्तरांतील लोक पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाने प्रभावित आहेत. तसेच राज्यात देवेंद्र फडणवीस साहेबांच्या कार्याने प्रभावित आहेत. महाविकास आघाडीचे हे सरकार सामान्यांसाठी काहीही करू शकत नाही म्हणून भाजपच सामान्य लोकांना न्याय देऊ शकते, असा लोकांना विश्वास आहे. म्हणून संजय वर्तक जे शिवसेनेचे विभागप्रमुख होते ते शिवसेनेची सत्ता असूनदेखील आज बाळासाहेबांच्या जयंतीच्या दिवशीच भाजपमद्धे प्रवेश करतात. असे का होते तर त्यांना असे वाटते की आता आम्ही शिवसेनेत काम नाही करू शकत. आणि त्यांचा आता शिवसेनेवर विश्वास नाही राहिला म्हणून ते आत्मविश्वास असलेल्या भाजपमध्ये येत आहेत.
महाराष्ट्रात नगरपंचायत निवडणुका झाल्या त्यामध्ये मुख्यमंत्री शिवसेनेचे, सरकार शिवसेनेचे, तरीही शिवसेना चवथ्या नंबरवर होती. त्यांचे ना पक्षावर लक्ष ना लोकांवर लक्ष आहे. म्हणून संजय वर्तक यांच्यासारखे लोक शिवसेनेबरोबर येतात असेही दरेकर यांनी सांगितले.
रवी व्यास येथील नेतृत्व करत आहेत. युवा, तरूणही भाजपबरोबर जोडले जातायत. चांगले चांगले लोक आमच्याकडे येतायत. मी स्वतः मीरा- भाईंदरमध्ये जाणार आहेत. तिथे संघटन उभे करून पुन्हा एकदा भाजपचा बालेकिल्ला मीरा-भाईंदर असेल, असा विश्वासही दरेकर यांनी व्यक्त केला.
यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष रवि व्यास, नगरसेवक अनिल भोसले, नगरसेवक जयेश भोईर, नगरसेवक सुरेश खंडेलवार, भरत मिश्रा आदी मान्यवर उपस्थित होते.

