माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने 22 यू ट्यूब चॅनेल केले ब्लॉक

Date:

माहिती तंत्रज्ञान अधिनियम, 2021 अंतर्गत प्रथमच 18 भारतीय यू ट्यूब वृत्तवाहिन्या केल्या ब्लॉक

पाकिस्तानस्थित 4 यूट्यूब वृत्त वाहिन्यांनाही केले ब्लॉक

दर्शकांची दिशाभूल करण्यासाठी या यूट्यूब वाहिन्यांनी दूरदर्शन वृत्तवाहिन्यांकडून लोगो आणि लघुप्रतिमांचा केला गैरवापर

3 ट्विटर अकाऊंट, 1 फेसबुक अकाऊंट आणि 1 न्यूज वेबसाईट सुध्दा केली ब्लॉक

नवी दिल्‍ली, 5 एप्रिल 2022 

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने माहिती आणि तंत्रज्ञान अधिनियम, 2021 अंतर्गत विशेष तत्कालीन अधिकारांचा वापर करून, 04.04.2022 रोजी बावीस (22) यूट्यूब वृत्तवाहिन्या, तीन (3) ट्वीटर खाती, एक (1) फेसबुक खाते, एक (1) बातम्यांवर आधारीत संकेतस्थळ अवरोधित (ब्लॉक) करण्याचे आदेश जारी केले आहेत. ब्लॉक केलेल्या वाहिन्यांच्या दर्शकांची एकत्रित संख्या 260 कोटींहून अधिक होती, आणि त्यांचा वापर राष्ट्रीय सुरक्षा, भारताचे परराष्ट्र संबंध आणि सार्वजनिक सुव्यवस्थेच्या दृष्टीकोनातून संवेदनशील विषयांवर फेक न्यूज आणि सामाजिक माध्यमांवर समन्वितपणे चुकीची माहिती पसरवण्यासाठी केला जात होता.

भारतीय यूट्यूब वृत्तवाहिन्यांवरील कारवाई

गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये माहिती तंत्रज्ञान अधिनियम, 2021 च्या अधिसूचनेनंतर प्रथमच यूट्यूब आधारित भारतीय बातम्या प्रसारकांवर कारवाई करण्यात आली आहे. अलीकडील ब्लॉकिंग अधिसूचनेनुसार अठरा (18) भारतीय यूट्यूब आणि चार (4) पाकिस्तान आधारित बातम्यांच्या वाहिन्यांना अवरोध केला गेला आहे.

मजकूराचे विश्लेषण

भारतीय सशस्त्र दल, जम्मू आणि काश्मीर इत्यादी विविध विषयांवर फेक न्यूज करण्यासाठी अनेक यूट्यूब वाहिन्यांचा वापर केला जात होता. ब्लॉक करण्याचा आदेश देण्यात आलेल्या मजकूरामध्ये पाकिस्तानमधून समन्वित पद्धतीने चालवल्या जाणार्‍या एकाहून अधिक सामाजिक माध्यमांच्या खात्यांवरून पोस्ट केलेल्या काही भारतविरोधी मजकूराचाही समावेश आहे.

युक्रेनमधील सध्याच्या परिस्थितीशी संबंधित आणि इतर देशांसोबतचे भारताचे परराष्ट्र संबंध धोक्यात आणण्याच्या उद्देशाने या यूट्यूब आधारित भारतीय वाहिन्यांवरून मोठ्या प्रमाणात खोटी माहिती प्रसारीत केली गेल्याचे आढळून आले आहे.

कार्यपद्धती: (Modus Operandi)

ब्लॉक केलेले भारतीय यूट्यूब चॅनेल्स काही टीव्ही न्यूज चॅनेलचे लोगो खोट्या लघुप्रतिमांचा वापर करत होत्या, ज्यात त्यांच्या वृत्तनिवेदकांच्या छायाचित्रांचाही समावेश होता, जेणेकरुन दर्शकांचा बातमी खरी असण्यावर विश्वास बसावा.   आणि सामाजिक माध्यमांवरील मजकूराचा प्रसार वाढवण्यासाठी व्हिडिओचे शीर्षक आणि लघुप्रतिमा वारंवार बदलण्यात येत असत. काही प्रकरणांमध्ये तर या भारतविरोधी बनावट बातम्या पाकिस्तानमधून पद्धतशीरपणे येत होत्या असे देखील निदर्शनास आले.

या कारवाईसह, डिसेंबर 2021 पासून, मंत्रालयाने राष्ट्रीय सुरक्षा, सार्वभौमत्व आणि भारताची अखंडता, सार्वजनिक सुव्यवस्था इत्यादींशी संबंधित कारणास्तव 78 यूट्यूब आधारित वृत्त वाहिन्या आणि इतर अनेक सामाजिक माध्यम खाती ब्लॉक करण्याचे निर्देश जारी केले आहेत.

भारत सरकार प्रामाणिक, विश्वासार्ह आणि सुरक्षित ऑनलाइन वृत्त माध्यमांचे वातावरण सुनिश्चित करण्यासाठी आणि भारताचे सार्वभौमत्व आणि अखंडता, राष्ट्रीय सुरक्षा, परराष्ट्र संबंध आणि सार्वजनिक सुव्यवस्था यांना धोका पोहोचवण्याच्या प्रयत्नांना हाणून पाडण्यासाठी वचनबद्ध आहे.

Details of Social Media Accounts and Website Blocked

YouTube channels

Sl. NoYouTube Channel NameMedia Statistics
Indian YouTube channels
1. ARP NewsSubscribers: Total Views: 4,40,68,652
2.AOP NewsSubscribers: NATotal Views: 74,04,673
3.LDC NewsSubscribers:  4,72,000Total Views:6,46,96,730
4.SarkariBabuSubscribers:  2,44,000Total Views: 4,40,14,435
5.SS ZONE HindiSubscribers:  N.ATotal Views:5,28,17,274
6.Smart NewsSubscribers: NATotal Views: 13,07,34,161
7.News23HindiSubscribers: NATotal Views: 18,72,35,234
8.Online KhabarSubscribers: NATotal Views: 4,16,00,442
9.DP news Subscribers: NATotal Views: 11,99,224
10.PKB News Subscribers: NATotal Views: 2,97,71,721
11.KisanTakSubscribers:  NATotal Views: 36,54,327
12.Borana NewsSubscribers: NATotal Views: 2,46,53,931
13.Sarkari News UpdateSubscribers: NA Total Views: 2,05,05,161
14.Bharat MausamSubscribers: 2,95,000Total Views: 7,04,14,480
15.RJ ZONE 6Subscribers:  NATotal Views: 12,44,07,625
16.Exam ReportSubscribers: NATotal Views: 3,43,72,553
17.Digi GurukulSubscribers:  NATotal Views: 10,95,22,595
18.दिनभरकीखबरेंSubscribers: NATotal Views: 23,69,305
Pakistan based YouTube channels
19.DuniyaMeryAagySubscribers: 4,28,000Total Views: 11,29,96,047
20.Ghulam NabiMadniTotal Views:  37,90,109
21.HAQEEQAT TVSubscribers: 40,90,000Total Views: 1,46,84,10,797
22.HAQEEQAT TV 2.0Subscribers: 3,03,000Total Views: 37,542,059

Website

Sl .NoWebsite
 Dunya Mere Aagy

Twitter accounts (All Pakistan based)

Sl .NoTwitter AccountNo. of followers
 Ghulam NabiMadni5,553
 DunyaMeryAagy4,063
 Haqeeqat TV323,800

Facebook account

Sl .NoFacebook AccountNo. of followers
 DunyaMeryAagy2,416
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

विकास, सेवा, सुशासनला मतदारांचा कौल – भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण

नगरपालिका, नगरपंचायत निवडणुकीत महायुतीचा दणदणीत विजयभाजपावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल मतदारांचे...

पुण्यात अजीत पवारच ‘दादा’.. मविआ चा सुपडा साफ

पुणे -आज झालेल्या मतमोजणीत जिल्ह्यातील 17 पैकी 9 पालिकांमध्ये...

चारित्र्यवान व्यक्तींची साथ-संगत अन्‌ आव्हाने स्वीकारल्याने यशाची प्राप्ती : सचिन ईटकर

रंगत-संगत प्रतिष्ठानतर्फे सचिन ईटकर यांचा जिंदादिल पुरस्काराने गौरव पुणे :...