पुणे – मी मृत्यूला घाबरत नाही, मात्र मला मारणारे तेच असतील, ज्यांनी महात्मा गांधी व डॉ. एम. एम. कलबुर्गी यांना मारले आहे. मी धर्मांध नसून लोकशाहीला मानणारा आहे.” असे येथे ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहाद-उल मुसलीमीनचे (एमआयएम) अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी सांगितले पोलिसांच्या नोटिशीमध्ये ओवेसी यांच्या जीवितास धोका असल्याचे कारण दिले होते. त्याला ओवेसी यांनी आव्हान देवून हि सभा घेतली . “मला कुणाचीही भीती नाही, सभा संपल्यावर याच गर्दीतून मी जाईल’, असे ओवेसी यांनी सांगितले होते. सभेनंतर त्यांनी गर्दीमध्ये जात तरुणांशी हस्तांदोलन करत गेले. त्यामुळे उसळलेल्या गर्दीवर नियंत्रण मिळविताना पोलिसांची चांगलीच दमछाक झाली.
“एमआयएम’च्या उमेदवारांच्या प्रचारार्थ ओवेसी यांची भवानी पेठेत प्रचार सभा झाली. या वेळी आमदार इम्तियाज जलील, बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचे महासचिव मिलिंद अहिरे, रिपब्लिकन युवा मोर्चाचे राहुल डंबाळे, “एमआयएम’चे राज्य समिती सदस्य अंजुम इनामदार, शहराध्यक्ष व उमेदवार जुबेर शेख व सर्व उमेदवार उपस्थित होते.
“”खासदार असूनही तीन वर्षे मला पुण्यात येण्यापासून कॉंग्रेस-राष्ट्रवादी व भाजपने रोखले. वेगवेगळी कारणे दाखवत नोटीस बजावता, मग मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे, शरद पवार, अजित पवार यांनाही नोटीस द्या. पुणे काही कोणाची जहागिरी नाही,” असे स्प्श्पणे त्यांनी निक्षून सांगितले .
पोलिसांनी सभेला परवानगी नाकारली होती. त्यावर ओवेसी म्हणाले, “”इतरांच्या सभा होतात, त्यांना नोटीस दिली जात नाही, मग मलाच का? घटनेने मलाही बोलण्याचा अधिकार दिला आहे. मला रोखणारे तुम्ही कोण? मी प्रक्षोभक भाषण करतो आणि धर्मा-धर्मात तेढ निर्माण होते, अशी कारणे पोलिस देत आहेत. मी मृत्यूला घाबरत नाही, मात्र मला मारणारे तेच असतील, ज्यांनी महात्मा गांधी व डॉ. एम. एम. कलबुर्गी यांना मारले आहे. मी धर्मांध नसून लोकशाहीला मानणारा आहे.”
पंतप्रधान नरेंद्र मोदी, पवार, ठाकरेंवर ओवेसी यांनी टीका करत पुण्यातील प्रश्नांवर प्रकाश टाकला. ते म्हणाले, “”मोदींनी पुण्याची मेट्रो गायब केली; तर राष्ट्रवादीने सत्तेत असताना हज हाउस केले नाही. 55 टक्के नागरिक झोपड्यांमध्ये राहत आहेत, तर कर्बस्तानच्या जागेवर “एसआरए’ उभारल्या जात आहेत. धरणातील पाण्याबाबतचे अजित पवारांचे विधान सर्वांना माहीत आहे. भाजपला गरज पडेल तेव्हा पाठिंबा देण्याची भाषा बोलणाऱ्या पवारांना आत्ताच धर्मनिरपेक्षता कशी आठवली. शहराचा विकास करून पुणे गुंडांपासून व भ्रष्टाचारमुक्त करू.”