पुणे : गो रक्षक म्हणून गो शाळा चालविण्यावरुन झालेल्या वादातून समस्त हिंदु आघाडीचे कार्याध्यक्ष आणि पुण्यातील भाजपचे माजी नगरसेवक मिलिंद एकबोटे व त्यांच्या साथीदारांना गो रक्षकांकडून लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली़. ही घटना पुरदंर तालुक्यातील झेंडेवाडी येथे मंगळवारी रात्री साडेदहा वाजता घडला़. याप्रकरणी सासवड पोलीस ठाण्यात मिलिंद रमाकांत एकबोटे यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पंडित मोडक व विवेक मोडक हे वडकीमध्ये हंबीरराव मोहिते गो शाळा चालवितात़. गो रक्षा संबंधी एक महिन्यापूर्वी आक्षेपार्ह पोस्ट फेसबुकवर टाकली होती़. तेव्हा मिलिंद एकबोटे यांना सबुरीने घेण्यास सांगितले होते़. त्यावरुन त्यांच्यात वाद झाला होता़.
पुूरंदर तालुक्यातील मौजे झेंडेवाडी येथील ज्वाला मंदिरात मिलिंद एकबोटे हे कार्यकर्त्यांसह देवदर्शन व प्रवचनासाठी गेले होते. तेथील कार्यक्रम संपल्यानंतर ते जवळच असलेल्या शनि मंदिरासमोर जेवणासाठी बसले असताना तेथे पंडित मोडक , विवेक मोडक , निखिल दरेकर हे ४० ते ५० लोकांचा जमावासह आले. पंडित मोडक यांनी एकबोटे यांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करत सासवड मध्ये राहायचे नाही अशी धमकी दिली. तसेच एकबोटे यांना मारहाण केली़. अभिषेक वाघमोडे याच्या हातावर चाकून चाकूने वार केला़. प्रतिक गायकवाड याला देखील जमावाने मारहाण करुन डोळ्यात मिरचीची पूड टाकण्याचा प्रयत्न केला़. आपल्यावर असलेल्या रागातून पंडित मोडक, विवेक मोडक यांच्या सांगण्यावरुन त्यांच्या साथीदारांनी मारहाण केली़.
या गुन्हयाचा तपास सासवड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ए.बी.घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली पोेलीस करत आहे.

कोण आहेत मिलिंद एकबोटे ?मिलिंद एकबोटे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित आहेत. सन 1997 ते सन 2002 दरम्यान ते पुणे महानगरपालिकेत भाजपचे नगरसेवक होते. सन 2002 मध्ये भाजपने त्यांना मनपा निवडणुकीत तिकीट नाकारले. अपक्ष निवडणूक लढवुन एकबोटे नगरसेवक म्हणुन निवडुन आले. त्यांनी सन 2007 मध्ये समस्त हिंदू आघाडी या संघटनेची स्थापना केली. सन 2014 मध्ये त्यांनी शिवसेनेकडून विधानसभा निवडणुक लढविली. मात्र, ते पराभुत झाले. मिलिंद एकबोटे यांच्यावर भीमा कोरेगाव येथे झालेल्या दंगलीचे आरोप असून त्यांच्याविरूध्द विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल आहेत.