पुणे-
कोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरणी अटकेत असलेल्या मिलींद एकबोटे यांना पुणे कोर्टाच्या परिसरात काळे फासण्याच्या प्रयत्न करणा-या तरुणास शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली. संजय हरिदास वाघमारे (रा.अप्पर इंदिरा नगर) असे त्याचे नाव असून सरकारी कामात अडथळा निर्माण करणे आणि धक्काबुक्की केल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.

मिलींद एकबोटे यांना यापुर्वी दिलेली पोलीस कोठडी संपल्याने त्यांना आज न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने त्यांना 21 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान न्यायलयीन प्रक्रिया संपल्यानंतर त्यांना बाहेर घेऊन जात असताना संजय वाघमारे याने काळे फासण्याचा प्रयत्न केला. दरम्यान या घटनेमुळे न्यायालयात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
सुप्रिम कोर्टाने जामिन अर्ज फेटाळल्याने पुणे ग्रामिण पोलिसांनी मिलींद एकबोटेंना 14 मार्च रोजी सकाळी त्यांच्या राहत्या घरातून अटक केली होती. त्यानंतर त्यांना न्यायालयात दाखल केले असता 19 मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले होते. यापुर्वी हायकोर्टानेही त्यांचा जामिन अर्ज फेटाळला होता.
कोरेगाव – भीमा येथे 1 जानेवारी रोजी दोन गटात जातीय तणाव निर्माण होऊन कायद व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. या जातीय तणावाच्या पाठीमागे मिलिंद एकबोटे यांचा हात असल्याच्या आरोपावरून त्यांच्यावर शिक्रापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिलींद एकबोटेंविरोधात तीन गुन्हे दाखल असून त्यामध्ये एका अॅट्रॉसिटी गुन्ह्याचा समावेष आहे.