पुणे-राष्ट्रवादीने जरी मेट्रो भूमिपूजन प्रकरणी भाजपशी हातमिळवणी केली असली तरी , कॉंग्रेसने मात्र भाजपच्या या श्रेय लादू पाहणाऱ्या राजकारणी वृत्तीला उत्तर देण्यासाठी २३ डिसेंबरला मेट्रो चे भूमिपूजन करण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे आणि आपला पवित्रा कायम असल्याचे स्पष्ट केले आहे . मेट्रो प्रकल्पाचे भूमिपूजन 24 डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कृषी महाविद्यालयाच्या मैदानावर करण्यात येणार आहे, मात्र त्यापूर्वीच उद्या (शुक्रवार) काँग्रेस पक्षाच्या वतीने स्वारगेट येथील पीएमटीच्या डेपोजवळ सकाळी साडे दहा वाजता माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते मेट्रोचे भूमिपूजन करण्यात येणार आहे.
यामुळे एकच प्रकल्पाचे दोन वेळा भूमिपूजन केले जाणार आहे. मागील आठ वर्षापासून पुणे शहरात मेट्रो बाबत चर्चा सुरु होती. कोणत्या ना कोणत्या वादामुळे मेट्रोला विलंब होत गेला आणि अखेर या प्रकल्पाला मंजूर मिळाली, मात्र या प्रकल्पाच्या भूमिपूजनाला आमच्या नेत्याला योग्य सन्मान मिळावा , अन्यथा आम्ही कार्यक्रमाला उपस्थिती राहणार नाही. तसेच 23 तारखेला आम्ही भूमिपूजन करणार, अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस कडून मांडण्यात आली होती. त्या भूमिकेला काँग्रेसने देखील पाठिंबा देत शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम झाला पाहिजे, अशी मागणी देखील केली.
भाजपची बोलणी झाल्यावर काल दुपारी शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आणि त्यांचे भाषण होणार असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने माघार घेत कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे जाहीर केले. या त्यांच्या भूमिकेवर काँग्रेस पक्षाने तीव्र नाराजी व्यक्त करीत नियोजित 23 डिसेंबर रोजी भूमिपूजन करण्याच्या निर्णयावर ठाम असल्याचे सांगत उद्या (शुक्रवारी) कार्यक्रमाला पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, हर्षवर्धन पाटील,पतंगराव कदम ,रमेश बागवे उपस्थित राहणार आहे. तसेच या कार्यक्रमाकडे सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष लागले आहे.
मेट्रो चे राजकारण – भाजपशी राष्ट्रवादीची हातमिळवणी, मात्र कॉंग्रेस ठाम , उद्या सकाळी पृथ्वीराज चव्हाण करणार भूमिपूजन
Date:

