नदीवरील आक्रमणासंदर्भात मेट्रोच्या अधिकाऱ्यांचा खोटारडेपणा उघड

Date:

मनसे चा पाठपुरावा -विभागीय आयुक्त सौरभ रावांनी बोलाविली बैठक

पुणे-नदीपात्रातील भरावाबाबत मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी पाटबंधारे विभागाशी केलेला खोटारडेपणा उघड झाला असून महापालिका प्रशासन नदीपात्रातील मेट्रोच्या कामाकडे हेतुपूर्ण व  सत्ताधाऱ्यांच्या दबावपोटी दुर्लक्ष करीत आहे .असा आरोप करत निसर्गावर ,नदीवर आक्रमण करण्याचे काम त्वरित थांबवावे असा मनसे च्या वतीने शहराध्यक्ष अजय शिंदे यांनी पुन्हा इशारा दिला आहे दरम्यान मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी पाटबंधारे विभागाला दिलेल्या खोट्या माहितीबाबत चे वृत्त समजताच मनसे च्या माग्नुनुसार विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी येत्या शुक्रवारी या संदर्भात मेट्रो ,पाटबंधारे यांच्यासह एक संयुक्त बैठक बोलाविली आहे.

या प्रकरणी अजय शिंदे यांनी सांगितले कि , खडकवासला पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी मेट्रोच्या कार्यकारी संचालकांना ५ फेब्रुवारी रोजी पत्र पाठविले आहे. या पत्रात डेक्कन जिमखाना परिसरातील नदी पात्रात टाकलेले भाराव काढून घेण्याच्या मागणी नंतर पाटबंधारे विभागाने मेट्रोला हे भाराव काढून घेण्याचे आदेश दिले होते . त्यानंतर ते आम्ही काढून टाकले असे पत्र मेट्रोने पाटबंधारे विभागाला दिले मात्र त्यानंतरही मनसे ने पाठपुरावा सुरूच ठेवल्याने पाटबंधारे विभागाने प्रत्यक्षात जागेवर जाऊन पाहणी केली असता भाराव काढून टाकलेले नसून तसेच असल्याचे दिसून आले. . त्यामुळे पाटबंधारे विभागाने हा प्रकार ५ फेब्रुवारीच्या पत्राने पुन्हा एकदा मेट्रोच्या कार्यकारी संचालकांना कळवून तातडीने भाराव काढून घेण्याचे पुन्हा आदेश दिले आहेत .

हा सारा पत्रव्यवहार मनसे ने अधिकार्यांच्या निदर्शनास आणून दिल्यावर विभागीय आयुक्तांनी या संदर्भात बैठक बोलाविली आहे. कालच उत्तराखंडात घडलेल्या प्रकारानुसार  निसर्गावर केलेले अनिर्बंध आक्रमण  सर्वसामान्य जनतेचा कसा घास घेते हे लक्षात घेऊन सर्व प्रकारचे दबाव झुगारून सौरभ राव यांनी याप्रकरणी नदीपात्रावरील आक्रमण दूर करून मेट्रो वर कारवाई करावी अशी मागणी अजय शिंदे यांनी केली आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

ओसवाल बिल्डरने जागा बळकावण्याचा प्रयत्न केल्याने ज्येष्ठ नागरिकाची आत्महत्या

पुणे: येथील बाणेर भागात विकसित करण्यासाठी दिलेल्या मिळकतीच्या व्यवहारात...

पुण्यातील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमुळे आज मला मनुवादी वृत्तीच्या विरोधातील पुढचा लढा लढण्यासाठी अधिक बळ मिळाले:हर्षवर्धन सपकाळ

पुणे महानगरपालिकेच्या निवडणुका पार पडल्यानंतर प्रथमच प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धनजी...

अजित पवार विमान अपघाताचा प्राथमिक अहवाल २८ फेब्रुवारीपूर्वीच:केंद्रीय विमान वाहतूकमंत्री मुरलीधर मोहोळ

खासदार जनसंपर्क सेवा अभियानाला मोठा प्रतिसाद पुणे शहराला देशातील सर्वोत्तम...

शासकीय अधिकाऱ्यांनी चांगले वाचन करणे गरजेचे : पुलकुंडवार

दुसऱ्या राज्यस्तरीय शासकीय अधिकारी मराठी साहित्य संमेलनाचा समारोप पुणे (प्रतिनिधी)...