मेट्रो येतेय अंगणी..

Date:

पुणे- 2021 च्या दिवाळीत मेट्रो सुरु होण्याची चिन्ह आहेत.अर्थात अजूनही मेट्रो ला लांबचा पल्ला गाठायचा आहे, मेट्रोची ‘ट्रायल रन’ झाल्यामुळे पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील प्राधान्यक्रमाच्या मेट्रोच्या चारही स्थानकांच्या कामांना वेग आला आहे. पिंपरी चिंचवडमधील मेट्रो ऑगस्टअखेर कार्यान्वित होणार असल्याचेही महामेट्रोकडून स्पष्ट केले. संत तुकारामनगर स्थानकाचे काम ९५ टक्के पूर्ण झाले आहे.पिंपरी चिंचवड-स्वारगेट (१५ किलोमीटर) आणि वनाज-रामवाडी (१६ किलोमीटर) मार्गावरील मेट्रो प्रकल्पाचे काम सुमारे ४८ टक्के पूर्ण झाले आहे. संत तुकारामनगर ते फुगेवाडी आणि वनाज ते गरवारे महाविद्यालय दरम्यान अनुक्रमे सहा आणि पाच किलोमीटर मार्गावर या वर्षात मेट्रो धावणार असा दावा करण्यात येतो आहे.या मार्गावरील संत तुकारामनगर ते फुगेवाडी दरम्यान मेट्रो धावणार आहे. दोन्ही स्थानकांची कामे अनुक्रमे ९५ टक्के आणि ८३ टक्के पूर्ण झाली आहेत. या मार्गावर स्थानकाच्या दोन्ही बाजूंना सरकते जिने उभारण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. पुढच्या टप्प्यात तिकीट खिडकी उभारणे आणि प्रवासी केंद्रित सुविधा निर्माण करणे, यावर भर असल्याची माहिती महामेट्रोचे महाव्यवस्थापक हेमंत सोनवणे यांनी दिली. दुसऱ्या टप्प्यात वनाज ते गरवारे महाविद्यालय दरम्यान मेट्रो धावणार आहे. वनाज स्थानकाचे ३६ टक्के तर, गरवारे महाविद्यालय स्थानकाचे काम ५१ टक्के पूर्ण झाले आहे.दुसऱ्या टप्प्यातील मार्गाचे काम डिसेंबरअखेर पूर्ण होइल असा त्यांचे नियोजन। आहे.

पीएमसी, डेक्कन जिमखाना आणि छत्रपती संभाजी राजे उद्यान मेट्रो स्थानक येथे पिअर आर्म्स चे काम कॉनकोर्स स्तरासाठी प्रगतीवर आहे.
ग्राउंड लौंचिंग सिस्टिमच्या मदतीने वनाज डेपोजवळ सेगमेंट बसवायला सुरुवात.
पुणेमेट्रो च्या शिवाजीनगर ते स्वारगेट या भूमिगत मार्गासाठी कृषी महाविद्यालय मैदानापासून सिव्हील कोर्ट पर्यंत तयार केलेल्या बोगद्यात कामगार कार्यरत आहेत.
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

शरद पवार यांची प्रकृती पुन्हा खालावली:डिहायड्रेशनमुळे अशक्तपणा, पुण्याच्या रुबी हॉल रुग्णालयात दाखल

पुणे:राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर पवार...

राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्यापासून:विरोधकांचा सरकारच्या चहापानावर बहिष्कार; अजित पवारांच्या अपघाताबाबत संशय

सत्ताधारी पक्ष मस्तीमध्ये असल्याची टीका,घरगुती डिजिटल मीटरचा विरोध,सोलार...

आत्मचरित्र लिहिण्यास बंदी हि तर विचार स्वातंत्र्याची गळचेपी, स्वातंत्र्यावर गदा: अनंत गाडगीळ

मुंबई:माजी लष्कर प्रमुखांच्या पुस्तकातील एका संदर्भाचा संसदेत उल्लेख झाल्यांनतर...

रेड जायंट मूव्हीजच्या ‘KHxRK’मुळे 47 वर्षांनंतर कमल हासन आणि रजनीकांत एकत्र

रेड जायंट मूव्हीजच्या आगामी चित्रपट ‘KHxRK’ मुळे भारतीय चित्रपटसृष्टी...