‘मर्सिडीज-बेंझ’ची सर्वात शक्तीशाली ‘लक्झरी हॅच’ भारतात दाखल

Date:

ü नव्याने विकसीत केलेले ‘मर्सिडीज-एएमजी ए 45 एस 4मॅटिक+’ हे 2.0 लिटर क्षमतेचे, या उत्पादन मालिकेतील जगातील सर्वात शक्तीशाली ‘टर्बोचार्ज्ड फोर-सिलिंडर इंजिन’.

ü ‘मर्सिडीज-एएमजी’कडे आता भारतात ‘एएमजी’ची 13 उत्पादने, कोणत्याही परफॉर्मन्स ब्रँडसाठी ही सर्वात मजबूत बांधणीची वाहने.

ü ‘ए-क्लास लिमोझिन’, ‘एएमजी ए35 सेडान’ आणि ‘मर्सिडीज-एएमजी ए45 एस 4एम+ हॅच’ यांचा समावेश असलेल्या ‘ए-क्लास’ उत्पादन पोर्टफोलिओमध्ये भर.

·         नवीन विकसित 2.0-लिटर टर्बोचार्ज्ड इंजिन हुडच्या खाली बसविलेले; या इंजिनमधून 421 एचपी शक्तीची निर्मिती – भारतातील कोणत्याही हॅचबॅकसाठी ही सर्वात जास्त.

·         जगभरात उपलब्ध असलेल्या सर्वात वेगवान ‘एएमजी हॅच’पैकी एक; शून्य ते शंभर ही गती केवळ 3.9 सेकंदात.

·         ‘एएमजी ए 45 एस’मधील शक्तीशाली इंजिनच्या गरजेनुसार खास ट्यून केलेले ‘एएमजी स्पीडशिफ्ट डीसीटी 8जी’ ट्रान्समिशन; कारच्या चपळ आणि गतिमान वैशिष्ट्यांमध्ये या ट्रान्समिशनचेही योगदान.

·         ‘एएमजी अॅक्टिव्ह राइड कंट्रोल’ आणि ‘एएमजी टॉर्क कंट्रोल’सह ‘फुल्ली व्हेरिएबल एएमजी परफॉर्मन्स 4मॅटिक+ ऑल-व्हील ड्राइव्ह’ यांच्या संयोजनामुळे कारमध्ये प्रभावी चपळता.

·         ‘मर्सिडीज-एएमजी ए 45 एस 4मॅटिक+’ची किंमत रु. 79.50 लाख (एक्स-शोरूम अखिल भारतात)

पुणे : मर्सिडीज-बेंझ या भारतातील सर्वात मोठ्या लक्झरी कार उत्पादक कंपनीने आज ‘मर्सिडीज-एएमजी ए 45 एस 4मॅटिक+’ ही ‘जगातील सर्वात शक्तिशाली टर्बोचार्ज्ड फोर-सिलेंडर इंजिन सिरीज प्रॉडक्शन कार’ निर्माण करून आपल्या ‘एएमजी’ गाड्यांच्या पोर्टफोलिओमध्ये मोलाची भर घातली आहे. ही भारतातील आतापर्यंतची सर्वात वेगवान हॅचबॅक ठरली आहे. ‘ड्रायव्हिंग परफॉर्मन्स’ या एएमजी ब्रँडच्या ब्रीदवाक्याला ‘मर्सिडीज-एएमजी ए 45 एस 4मॅटिक+’ या गाडीमुळे मूर्त स्वरूप मिळाले आहे. डिझाइनमधील नाविन्यतेसाठी आणि उच्च-श्रेणीच्या कामगिरीसाठी या गाडीने नवीन मानके घालून दिली आहेत. त्यामुळे या नवीन पिढीच्या कारमधून कल्पनातीत पातळीवरील वाहन गतिशीलता आणि स्पोर्टी ड्रायव्हिंगचा अनुभव मिळू शकतो. 

‘मर्सिडीज-एएमजी ए 45 एस 4मॅटिक+’ची ‘रिइन्फोर्स्ड बॉडी शेल’, शक्तिशाली इंजिन, ‘ड्रिफ्ट’ ते ‘रेस’ असे ड्रायव्हिंगच्या पद्धतीचे प्रकार, ‘रिवर्क्ड सस्पेंशन’ आणि विशिष्ट ‘स्पोर्टी लूक’ यामुळे या लक्झरी कामगिरी विभागात अतुलनीय स्वरुपाचा ड्रायव्हिंगचा अनुभव मिळतो. ‘मर्सिडीज-बेंझ इंडिया’चे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ मार्टिन श्वेंक यांनी ही बहुप्रतिक्षित नवीन ‘मर्सिडीज-एएमजी ए 45 एस 4मॅटिक+’ सादर केली. भारतातील ही सर्वात वेगवान हॅचबॅक कार ‘मर्सिडीज-बेंझ’च्या देशभरातील वितरकांकडे आणि ‘मर्सिडीज-बेंझ इंडिया’च्या ऑनलाइन स्टोअरवर उपलब्ध असेल.

‘मर्सिडीज-बेंझ इंडिया’चे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी मार्टिन श्वेंक म्हणाले, “देशातील सर्वात वेगवान हॅचबॅक असलेली नवीन ‘मर्सिडीज-एएमजी ए 45 एस 4मॅटिक+’ सादर करून आम्ही आमचा ‘ए-क्लास’चा पोर्टफोलिओ मजबूत करीत आहोत. आमच्या पोर्टफोलिओमधील सर्वात शक्तिशाली आणि सर्वात डायनॅमिक अशी नवीन पिढीतील स्पोर्ट्स कार सादर करून, आम्ही आमच्या एकूण वाढीच्या धोरणात या विभागाचे महत्त्व अधिक दृढ करीत आहोत. भारतातील ही सर्वात वेगवान हॅचबॅक कार एक उत्तम परफॉर्मन्स मशीन आहे. आमचे ‘एएमजी’चे ग्राहक आणि ‘परफॉर्मन्स प्युरिस्ट’ तिची आतुरतेने वाट पाहत आहेत. ‘ए 45 एस 4मॅटिक+’ सादर करून आम्ही भारतातील विवेकी ग्राहकांसाठी आमच्या जागतिक पोर्टफोलिओमधील सर्वात इष्ट उत्पादने सादर करण्याची कटिबद्धता अधोरेखित केली आहे.”

‘मर्सिडीज-एएमजी ए 45 एस 4मॅटिक+’ची प्रमुख वैशिष्ट्ये :

•    रिइन्फोर्स्ड बॉडी शेल : ‘एएमजी’मधील विकसकांनी या गाडीची बॉडी शेल मोठ्या प्रमाणावर मजबूत केली आहे. जास्त वेगाने गाडी चालत असताना अचूक सेल्फ-स्टीयरिंग वैशिष्ट्यांसाठी, तसेच ट्रॅक व कॅम्बर स्थिरतेसाठी अशी बॉडी विशेष आधार देते.

•    शून्य ते शंभर किमी प्रति तास ही गती 3.9 सेकंदा : चार सिलेंडर असलेली टर्बोचार्ज्ड मोटर अत्यंत चपळाईने वेग घेते आणि केवळ 3.9 सेकंदांमध्ये ताशी शून्य ते शंभर किमी हा वेग पकडते. हिचा कमाल वेग इलेक्ट्रॉनिकदृष्ट्या ताशी 270 किमी इतका मर्यादित ठेवण्यात आला आहे. उत्कृष्ट कामगिरीच्या या आकडेवारीशिवाय, नवीन इंजिन आपल्या त्वरित प्रतिसादानेदेखील प्रभावित करते.

•    नवीन इंजिनातील डिझाइनची वैशिष्ट्ये : अनेक बुद्धिमान स्वरुपाची वैशिष्ट्ये असलेले या गाडीचे इंजिन उत्कृष्ट कामगिरी करते. गाडीच्या पाठीमागून पाहिले असता, तिचा टर्बोचार्जर व एक्झॉस्ट मॅनिफोल्ड यांची जागा आता मागील बाजूस, ‘फायरवॉल’च्या बाजूला ठेवण्यात आली आहे. अर्थातच, तिची इनटेक यंत्रणा पुढील बाजूस आहे. या रचनेमुळे, गाडीची पुढील बाजू शक्य तितकी सपाट व वायुगतिकीयदृष्ट्या सर्वात फायदेशीर स्वरुपाची करता आली आहे. तसेच त्यामुळे तिच्यात मोठ्या प्रमाणात सुधारित एअर डक्टिंगही शक्य होते.

•    इंजिनच्या कमी स्पीडमध्ये जास्त टॉर्क : नवीन ‘ट्विनस्क्रोल टर्बोचार्जर’मुळे इंजिनची गती कमी असतानाही ‘अप्पर आरपीएम रेंज’मध्ये जास्त शक्ती मिळते. परिणामी, इंजिनचा स्पीड कमी असतानाही जास्त टॉर्क मिळतो आणि इंजिनचा प्रतिसाद अत्यंत चांगला मिळतो.

•    ‘नॅनोस्लाइड’ तंत्रज्ञानाचा वापर : पिस्टन आणि सिलिंडरमधील घर्षण कमी करण्यासाठी, इंजिनच्या लायनिंगवर कोटिंग करण्याकरीता पेटंट घेतलेल्या ‘नॅनोस्लाइड’ तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. यामुळे लायनिंगवर काचेसारखा पृष्ठभाग तयार होतो व त्यातून घर्षण अगदी कमीतकमी होते. तसेच या तंत्रज्ञानामुळे लायनिंग हे पारंपरिक ‘ग्रे कास्ट आयर्न’पेक्षा दुपटीहून अधिक हार्ड बनते. त्यामुळे त्याचा टिकाऊपणा वाढतो.

•    ‘एक-माणूस एक इंजिन’ : नवीन इंजिन पूर्णपणे हाताने जोडले जाते. या कारणाकरीता जर्मनीतील अफाल्टरबाच येथील एएमजी इंजिनच्या कारखान्यात नव्याने डिझाइन केलेली उत्पादन लाइन तयार करण्यात आली आहे. ‘मर्सिडीज-एएमजी’ने आपल्या कारखान्यात “एक माणूस, एक इंजिन” हे तत्त्व राबविले आहे आणि ‘इंडस्ट्री 4.0’ प्रक्रिया नाविन्यपूर्ण पातळीवर नेल्या आहेत. या पद्धतीमुळे अर्गोनॉमिक्स, सामग्रीचा प्रवाह, गुणवत्तेची हमी, टिकाऊपणा आणि कार्यक्षमता यांमधील नवीनतम निष्कर्ष प्रतिबिंबित होत आहेत. हाताने असेंब्ली करण्याच्या ‘एएमजी’च्या पद्धतीमुळे ‘इंडस्ट्री 4.0’च्या अंमलबजावणीच्या मार्गावर ‘स्मार्ट उत्पादना’चे धोरण अमलात आणणे सोयीचे झाले आहे. 

•    ‘एएमजी टॉर्क कंट्रोल’ : पूर्णपणे नवीन परिमाणांमध्ये डायनॅमिक ड्रायव्हिंग करण्याचा अनुभव हा संपूर्ण ‘व्हेरिएबल ऑल-व्हील ड्राईव्ह’मुळे मिळू शकतो आणि हा अनुभवच या गाडीमध्ये मानक म्हणून समाविष्ट करण्यात आला आहे. नवीन ‘रिअर एक्सल डिफरेंशियल’मध्ये समाविष्ट करण्यात आलेले ‘एएमजी टॉर्क कंट्रोल तंत्रज्ञान’ हे यामागील खरे रहस्य आहे. यामध्ये दोन इलेक्ट्रॉनिक नियंत्रित मल्टीडिस्क क्लचेस आहेत, त्यापैकी प्रत्येक क्लच ‘रिअर अॅक्सल’च्या ‘ड्राइव्ह शाफ्ट’ला जोडलेला आहे. अशाप्रकारे, ‘ड्राइव्ह पॉवर’ ही केवळ पुढील व मागील चाकांमध्ये पूर्णपणे वितरीत होत नाही, डाव्या आणि उजव्या मागील चाकांमध्येदेखील ती निवडकपणे वितरीत केली जाऊ शकते.

•    ‘एएमजी ड्रिफ्ट मोड’ : ‘ए 45’मध्ये ‘ड्रिफ्ट मोड’ देण्यात आला आहे. त्यामुळे ड्रायव्हिंगच्या अधिक आनंदासाठी “पॉवर स्लाइडिंग” शक्य होते.

•    ‘एएमजी सस्पेंशन’ : विशिष्ट स्प्रिंग घटकांसह नवीन ‘एएमजी सस्पेंशन’ आणि नवीन, ‘फ्रीक्वेन्सी-सिलेक्टिव्ह’ शॉक अॅबसॉर्बर्स यांच्यामुळे गाडीला उच्च दिशात्मक स्थिरता लाभते, तसेच ‘लो-बॉडी रोल’सह उच्च ‘डायनॅमिक कॉर्नरिंग’ वैशिष्ट्यांसाठी आधारही मिळतो.

•    सहा ‘एएमजी डायनॅमिक सिलेक्ट ड्रायव्हिंग मोड्स’ : स्लिपरी, कम्फर्ट, “स्पोर्ट”, “स्पोर्ट +”, “इन्डिव्हिज्युअल” आणि “रेस” या सहा ड्रायव्हिंग मोड्सच्या माध्यमातून चालकाला ही गाडी आरामदायी ते डायनॅमिक अशा पद्धतींनी चालविण्याचे विविध पर्याय मिळतात.

•    नाविन्यपूर्ण ‘रेस स्टार्ट’ : ‘रेस स्टार्ट’ या वैशिष्ट्यामुळे वाहनाला थांबलेल्या स्थितीतून इष्टतम प्रवेग घेणे शक्य होते.

•    ‘एएमजी परफॉर्मन्स पॅकेज’ : ‘एएमजी परफॉर्मन्स पॅकेज’मुळे ताशी 270 किलोमीटरपर्यंतचा टॉप स्पीड गाठून ही गाडी ‘रेस ट्रॅक’ स्वरुपाची कामगिरी करू शकते.

•    ‘एएमजी ट्रॅक पेस’ : विशेषकरून ड्रायव्हिंग क्षमतेचे विश्लेषण आणि सुधारणा करण्यासाठी या गाडीमध्ये ‘पर्सनल रेसिंग इंजिनीअर’ हे वैशिष्ट्य आहे. ते ‘एमबीयूएक्स मल्टीमीडिया’ प्रणालीमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. 

बाह्य डिझाइन :

नवीन ‘मर्सिडीज-एएमजी ए 45 एस 4मॅटिक+’ ही गाडी तिच्या अगोदरच्या मॉडेल्सपेक्षा अधिक वैशिष्ट्यपूर्ण आहे. प्रथमच एखाद्या ‘कॉम्पॅक्ट क्लास कार’मध्ये ‘एएमजी-स्पेसिफिक रेडिएटर ग्रिल’ देण्यात आले आहे. ही गाडी ‘एएमजी परफॉर्मन्स फॅमिली’ची सदस्य आहे, हे यातून स्पष्ट होते. ‘पॉवरडोम’सह ‘एअरोडायनामिक बॉनेट’, ‘मल्टी-बीम एलईडी हेडलाइट्स’ या बाबी एका आकर्षक व शक्तिशाली कारची छाप निर्माण करतात. पुढील विस्तीर्ण विंग्ज, ‘फ्लेअर्ड व्हील आर्च’ आणि ‘एएमजी अलॉय व्हील’ यांतूनदेखील गाडीची प्रभावशाली उपस्थिती लक्षात येते. या गोष्टींमधून ‘वाईडर अॅक्सल’साठी जागा तयार होते आणि गाडीचे ‘अॅथलेटिक’ स्वरूप दिसून येते. गाडीच्या मागील बाजूस दोन गोल ‘ट्विन टेलपाइप्स’ (90 मिमी व्यासाचे) आणि रुंद स्वरुपाचे ‘रीअर एप्रन’ यांचे दृष्य दिसते.

आतील वैशिष्ट्ये :

या गाडीचे स्वरूप स्पोर्टी असल्याने, तीमधील उच्च-दर्जाचे आतील भाग हे मनुष्य आणि यंत्र यांच्यात जवळचे, वैयक्तिक नाते तयार करतात. ड्रायव्हर आणि पुढचा प्रवासी हे कंटूर केलेल्या ‘एएमजी स्पोर्ट सीट्स’वर सक्रिय स्थितीत बसलेले असतात आणि त्यांना घट्ट आधार मिळालेला असतो. काळे ‘आर्टिको’ मानवनिर्मित लेदर आणि ‘डायनामिका मायक्रोफायबर’ यांचे संयोजन असलेली गाडीतील स्टॅंडर्ड अपहोल्स्ट्री कालातीत आहे आणि लाल रंगात डबल टॉपस्टिचिंग केल्यामुळे ती वैशिष्ट्यपूर्ण ‘एएमजी हायलाइट्स’ तयार करते. गाडीच्या रंगयोजनेमध्ये लाल रंगाचा वापर करण्यात आला आहे. ‘डिझाइनो सीट बेल्ट’ आणि काळ्या ‘डायनामिका मायक्रोफायबर’मध्ये लाल बॉर्डरसह असलेली ‘डॅशबोर्ड सपोर्ट ट्रिम’ ही संरचना खुलून दिसते. ‘सन यलो’, ‘पोलर व्हाइट’, ‘माउंटन ग्रे’, ‘डिझाइनो पॅटागोनिया रेड’, ‘डिझाइनो माउंटन ग्रे मॅग्नो’ आणि ‘कॉसमॉस ब्लॅक’ या रंगांमध्ये ही गाडी उपलब्ध असेल.

ड्रायव्हिंगचा अनुभव :

‘मर्सिडीज-एएमजी ए 45 एस 4मॅटिक+’ ही गाडी तंत्रज्ञान, कार्यक्षमता आणि सुरक्षितता या प्रमुख घटकांना एकत्र आणून एक अतुलनीय ड्रायव्हिंगचा अनुभव देते. स्पोर्टी ड्रायव्हिंगची मजा आणि उत्कृष्ट ड्रायव्हिंगचा अनुभव मिळावा, यासाठी ‘हेड-अप डिस्प्ले विंडस्क्री’नचे रुपांतर एका रोमांचक व्यापक ‘डिजिटल कॉकपिट’मध्ये करता येते. मनोरंजनाच्या बाबतीतही, ‘मर्सिडीज-एएमजी ए 45 एस 4मॅटिक+’ या गाडीत 12 स्पीकरची व 590 वॅट आऊटपुट देणारी ‘हाय-एंड बर्मेस्टर साउंड सिस्टीम’ बसविण्यात आली आहे.

सुरक्षिततेची वैशिष्ट्ये :

सुरक्षेच्या दृष्टीकोनातून, ‘ब्लाइंड स्पॉट असिस्ट’सारख्या वैशिष्ट्यांचा समावेश केल्याने लेन बदलण्यापूर्वी ड्रायव्हर सावधतेने कारच्या बाजूच्या आणि मागील भागांचे निरीक्षण करू शकतो. तसेच ‘अॅक्टिव्ह लेन कीपिंग असिस्ट’मुळे ड्रायव्हरला लेनमध्ये वाहन चालवण्यात मदत होते. ‘एएमजी परफॉर्मन्स ब्रेकिंग सिस्टीम’चा उपयोग फेड (तीव्र उष्णतेचा परिणाम) कमी करण्यासाठी आणि तातडीने, स्थिरपणे गाडीचा वेग मंदावण्यासाठी  केला जातो.

व्यक्तिगत स्वरुपाचे पर्याय :

ग्राहकांना संपूर्ण व्यक्तिगत अनुभव प्रदान करण्यासाठी, ‘एएमजी एक्सटिरियर सिल्व्हर क्रोम पॅकेज’ देण्यात येते. त्यातून ‘मर्सिडीज-एएमजी ए 45 एस 4मॅटिक+’ या गाडीच्या विशेष गुणधर्मांत भर पडते. यामध्ये ‘फ्रंट स्प्लिटर इन्सर्ट’, ‘एएमजी परफॉर्मन्स सीट्स’, ‘हेड-अप डिस्प्ले’ यांसह इतरही काही गोष्टींना ग्राहक व्यक्तिगत स्वरूप देऊ शकतात.

तांत्रिक माहिती एका दृष्टिक्षेपात

 मर्सिडीज-एएमजी ए 45 एस 4मॅटिक+
इंजिन2.0-लिटर 4 इन-लाईन विथ रोलर वेअरिंग ट्विनस्क्रोल टर्बोचार्जर
डिसप्लेसमेंट1991 सीसी
कमाल आउटपुट421 एचपी – 6750 आरपीएम / 310 केडब्ल्यू / 421 एचपी
पीक टॉर्क500 एनएम – 5000-5250 आरपीएम
ड्राईव्ह सिस्टीमएएमजी परफॉर्मन्स 4मॅटिक+ फुल्ली व्हेरिएबल ऑल-व्हील ड्राईव्ह विथ एएमजी टॉर्क कंट्रोल
ट्रान्समिशनएएमजी स्पीडशिफ्ट डीसीटी 8जी ड्युएल-क्लच ट्रान्समिशन
अॅक्सलरेशन 0-100 किमी/तास3.9 सेकंद
टॉप स्पीड270 किमी / तास ***
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पुन्हा एकदा पुण्यात भाजपाला क्रमांक एकचा पक्ष म्हणून स्थान मिळवून देऊ : मुरलीधर मोहोळ

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘कॅन्टोन्मेंट’मधील भाजपा पदाधिकारी-कार्यकर्त्यांचा मेळावा ! कोरेगाव...

खंडोबाच्या जेजुरीत घडलं अघटीत..

मिरवणुकीत आगीचा भडका– २ नगरसेविका गंभीर भाजल्या, १८ जण...

सरकारच्या एक वर्षाच्या कामगिरीवर राज्यातील जनता समाधानी असल्याचे या निकालांवरून स्पष्ट… अजितदादा

महायुतीमधील मित्रपक्षांनी एकमेकांच्या इच्छुक उमेदवारांना पक्षप्रवेश द्यायचे नाहीत, असे...

वसुंधरा संरक्षणासाठी हजारो नागरिकांनी घेतलेली शपथ गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये

पुणे पुस्तक महोत्सवाच्या समारोपाला विश्वविक्रम पुणे: पुणे पुस्तक महोत्सवाच्या...