पुणे- शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय पुणे व अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेचे अनंतराव पवार अभियांत्रिकी महाविद्यालय पर्वती, पुणे या महाविद्यालयामध्ये नुकताच शैक्षणिक सामंजस्य करार करण्यात आला. या करारामुळे तांत्रिकी शिक्षण प्रक्रिया अधिक समृद्ध करण्यासाठी व विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे यासाठी चर्चासत्र, कार्यशाळा आदी उपक्रम संयुक्तरीत्या आयोजित केले जाणार आहेत. विद्यार्थी व शिक्षकांना शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्राध्यापकांचे मार्गदर्शन मिळणार असुन शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्रयोगशाळेमध्ये प्रकल्प करण्यासाठी जाता येणार आहे.
नवीन संशोधनासास प्रोत्साहन व मदत, प्राध्यापकांना प्रशिक्षण, नवीन प्रयोगशाळा निर्मितीमध्ये मदत आणि प्रयोगशाळा व ग्रंथालय, माहिती तंत्रज्ञान सुविधांची देवाणघेवाण या सर्व सोईचा लाभ विद्यार्थी व प्राध्यापकांना होणार आहे. ‘सीओईपी’सोबत विविध संशोधन प्रकल्प आणि संशोधन प्रक्रियेमध्ये भाग घेता येणार असल्याने विद्यार्थ्यांना कौशल्यवाढीसाठी, नोकरी व स्टार्टअप सुरु करण्यास करारामुळे मदत होणार आहे.या करारावर अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेच्या सरचिटणीस सौ.प्रमिला गायकवाड, माजी तंत्रशिक्षण संचालक डॉ.एन.बी.पासलकर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुनिल ठाकरे व शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय पुणे चे संचालक डॉ.बि.पी.आहुजा यांनी स्वाक्षरी केल्या.
सदर करारासाठी प्रा.एम.एस.सुतावणे, प्रा.एस.एन.सपली व डॉ.एस.एस. भोसले, प्रा.अर्चना ठोसर, प्रा. गणेश कोंढाळकर डॉ. काशिनाथ मुंडे, डॉ. अभय शेलार, प्रा.शैलेश हजारे, प्रा.कमलेश जेठा,प्रा.स्नेहा साळवेकर, प्रा. स्नेहल वीर उपस्थित होते. या करारामुळे विद्यार्थी व शिक्षकांमध्ये चैतन्याचे वातावरण निर्माण झाले.

