स्वाभिमानी नाट्य व सांस्कृतिक चळवळच्या वतीने अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार बळी राजाचे कैवारी मा. खा. राजू शेट्टी यांच्या हस्ते नुकताच पुण्यातील श्रमिक पत्रकार भवन येथे करण्यात करण्यात आला. या वेळी या कार्यक्रमाची सुरवात दीपप्रज्वलन करून करण्यात आले. या प्रसंगी प्रसिद्ध वात्रटीकाकार रामदास फुटाणे, जेष्ठ अभिनेते विलास रकटे, चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, ‘सैराट’ चित्रपट फेम रिंकू राजगुरुचे वडील महादेव राजगुरू तसेच चित्रपट, नाट्य, सांस्कृतिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रातील या कार्यक्रमाला आवर्जून यावेळी उपस्थित लावली होती. या कार्यक्रमाचे अध्यक्ष कार्यक्रमाचे अध्यक्ष रामदास फुटाणे हे होते.
या वेळी चित्रपट महामंडळाचे सदस्य संजय ठुबे, संचालिका निकाता मोघे, चैत्राली डोंगरे, विजय खोचीकर, सतीश बिडकर, धनाजी यमकर, रणजीत जाधव यांचा सत्कार करण्यात आला. तसेच खाकी वर्दीतील कलाकारांचा व साहित्यिकांचा सत्कार करण्यात आला यात संजीव कोकील, विजय सावंत, पी. आय. महेश सरतापे, प्राध्यापक जालिंदर पाटील, अभिनेते सचिन सावंत, अभिनेत्री गिरीजा प्रभू, चेतन शेट्टी या मान्यवरांचा शाल व सन्मानचिन्ह देवून सत्कार करण्यात आला.
राजेभोसले म्हणाले, मी मुळचा इंदापूर जवळील ‘संसर’ गावचा शेतकरी कुटुंबात माझा जन्म झाला मी ग्रामीण भागातून पुण्यात आलो. १९९५ साली मी ‘चौफुला’ हा महिला प्रधान कार्यक्रम निर्मिती केली. तेव्हा पासूनच या क्षेत्रात काम करण्याची माझी इच्छा होती. महामंडळासाठी खूप कामे करायची आहेत. मराठी चित्रपटाचे चित्रीकरण करताना कोणताही प्राणी चित्रीकरणासाठी घ्याचा असेलतर ‘अॅनीमल फोरम’ कडून त्याचे प्रमाणपत्र चेन्नईला जावून घ्यावे लागते. मराठी निर्मात्यांना चेन्नईला जाणे – येणे त्यांच्या किशाला परवडणारे नाही म्हणून यासाठी खा. शेट्टी साहेबांनी लक्ष घालावे व ‘अॅनीमल फोरम’चे एक कार्यालय मुंबईत आम्हास करून द्यावे असे राजेभोसले म्हणाले.
अभिनेते विलास रकटे म्हणाले, महामंडळाचे आम्ही एक रोपटे लावले आहे. त्याला वेळो वेळ खत पाणी घातले पाहिजे. चित्रपट एक शिक्षणाच माध्यम आहे. या माध्यमाला नवसंजीवनी दिली पाहिजे. आम्ही महामंडळा तर्फे खासदार साहेबांना पहिली मागली केली आहे. साहेब आमचे लवकरच काम करतील असे ते म्हणाले.
खा. शेट्टी म्हणाले, चित्रपट महामंडळाची निवडूणक ही राजेभोसले व त्यांच्या साथीदारांनी यांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीत लढवली व जिंकली याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. आमच्या सारख्या चळवळीतील कार्यकर्त्याचा व चित्रपटाचा फार जवळचा संबंध आहे. आपण अहोरात्र काम करत असतो. चित्रपट महामंडळाचे दिल्लीतील कोणते ही काम असो मला सांगा. मी कात्रीशीरपणे करेन. कोणावर अन्याय झाला तर कधीही सांगा मी तुमच्या पाठीशी उभा मी राहीन. पण कोणावर अन्याय करू नका. महामंडळा एक विनंती ‘आमच्या शेतकऱ्यांच्या दुखाची, वेदनांची खरी ‘सल’ त्याच जगन कलेच्या रूपाने रुपेरी पडद्यावर साकारावे तसेच ग्रामीण भागातील कलाकारांना चित्रपट काम करण्याची संधी द्यावी.
रामदास फुटाणे या वेळी म्हणाले, कलेच्या क्षेत्रात काम करताना कला व व्यवहाराची सांगड घालता आली पाहिजे. थोड यश मिळाले की हुरळून न जाता सतत काम करत राहील पाहिजे. सध्या सैराटला मिळालेल्या अदभूत यशाबद्दल काही लोक या चित्रपटावर टीका करत आहेत. अशा लोकांचा त्यांनी चिमटा काढला ते म्हणाले ‘संधी अभावी या जगात अनेक लोक चरित्रवाण आहेत.’ मराठीमध्ये जाणिवशील कलाकारांची गरज आहे. चित्रपट महामंडळात सध्या निवडूण आलेले सर्व संचालक हे कार्यकर्ते आहेत. ते योग्य काम करतील असा माझा विश्वास आहे. माझ्या महामंडळाचा आगामी वाटचालीस शुभेच्छा असे त्यांचे मनोगत फुटाणे यांनी व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे आयोजन चित्रपट निर्माते कैलास वाणी, बापूसाहेब कारंडे, चेतन शेट्टी, रविंद्र उंडाळे यांनी केले होते. तसेच या कार्यक्रमाला चित्रपट लेखक आबा गायकवाड, सुनील वाईकर, सचिन वाघ, सुनील अग्रेसर, शशिकांत नजान, जितेंद्र वाईकर आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हरीप पटेल यांनी केले.