पुणे- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे आज पूणे दौऱ्यावर असताना त्यांची विमानतळावर त्यांची खासदार गिरीश बापट यांनी भेट घेऊन पुणे विमानतळ विस्तारीकरणासाठी आवश्यक असलेल्या जागा पुणे विमानतळ प्राधिकरणास तातडीने मिळणेसाठी व पुणे शहराशी निगडीत इतर प्रश्नांबाबत त्यांचे अध्यक्षतेखाली बैठक घेण्याची विनंती केली.माजी केंद्रीय मंत्री शरद पवार हे देखील यावेळी येथे उपस्थित होते .खासदार बापट यांनी यामध्ये मुख्यत्वे
1) मालवाहू पायाभूत सुविधांच्या बांधकामासाठी बीएसओ यार्ड परिसरात 2.5 एकर जमीन ताब्यात घेणे. 2) एसटीपीच्या बांधकामासाठी एचपीसीएल आणि बीपीसीएल क्षेत्राची 0.6 एकर जागेची आवश्यकता. 3) पोलीस चौकी स्थलांतरासाठी 100 चौ. जागेची आवश्यकता. 4) पुणे विमानतळापासून विमाननगर (2350 चौ.मी. क्षेत्रफळावर) जमीन (अंदाजे 0.58 एकर) पर्यंत पर्यायी रस्ता जोडणीच्या कामासाठी परवानगी. 5) पुणे विमानतळाच्या विकासासाठी IAF च्या 13.00 एकर जमिनीचे कायमचे हस्तांतरण. (बीएसओ यार्ड, सीडब्ल्यूई कार्यालय आणि ट्रान्समीटर गेट आणि बीएसओ यार्ड दरम्यान रस्त्याचा भाग. 6) वीकफिल्ड चौक ते विमानतळ पार्किंग क्र.1 रस्त्याचे बांधकाम (लांबी 400 मी.) 7) सर्व्हे क्र.237 येथील जमीन कार्गो वाहन पार्किंगच्या बांधकामासाठी सुपूर्द करणे. (अंदाजे 10 एकर) 8) सर्व्हे नं. 248 आणि 253 येथील जमीन पुणे विमानतळावर CISF आणि AAI इंस्टॉलेशन्सच्या बांधकामासाठी आवश्यक. (अंदाजे 25 एकर), 9) पुरू सोसायटी ते व्हीआयपी रोड या डीपी रोडचे विमाननगर पासून विमानतळाजवळील पार्किंग क्र.1 पर्यंत बांधकाम, (अंदाजे 900 मीटर लांबी), 10) पुणे विमानतळावरील धावपट्टीचा विस्तार करणे. (136.8 एकर)
या जागा पुणे विमानतळ प्राधिकरणास उपलब्ध होत नसल्यामुळे सदर प्रश्न गेले अनेक दिवस प्रलंबित आहे. ते तातडीने मार्गी लावण्यासाठी श्री गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक विनंती केली.सदर प्रश्नांबाबत दिल्ली येथे लवकरच बैठक घेण्याचे आश्वासन गडकरी यांनी यावेळी दिल्याचे खासदार गिरीश बापट यांनी सांगितले.

