महाराष्ट्रातील पुरातत्व खात्याकडे असलेल्या वास्तूंची तसेच पानिपत येथील स्मारकाच्या देखभाल दुरुस्तीबाबत मुंबईत मे मध्ये बैठक…

Date:

महाराष्ट्र विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिल्लीमध्ये घेतली पुरातत्व महासंचालक समवेत बैठक

न्यू दिल्ली, ता.६: पानिपत येथील मराठा योद्ध्यांच्या स्मारकामध्ये आवश्यक सुविधा करणे, एकवीरा देवी व लेण्याद्री देवस्थान तसेच राज्यातील इतर महत्वाचे ठिकाणांना भेडसावत असलेले प्रश्न सोडविण्याबाबत विधानपरिषद उपसभापती ना.डॉ.नीलम गोऱ्हे यांनी काल लोकसभा अध्यक्ष मा.ओम बिर्ला आणि आज पुरातत्व महासंचालक व्ही. विद्यावती यांना निवेदन दिले. याबाबत आज दि.०६ एप्रिल, २०२२ रोजी व्ही. विद्यावती यांच्यासमवेत बैठक घेतली या बैठकीत, योग्य ती सकारात्मक पावले उचलू असे प्रतिपादन यावेळी मा.श्रीमती व्ही विद्यावती यांनी केले.

डॉ.गोऱ्हे यांनी पानिपत स्मारकाची पाहणी केली होती. यात समोर आलेल्या प्रश्नाबाबत सविस्तर चर्चा याबैठकीत झाले. यात पानिपत स्मारकामध्ये ऐतिहासिक युद्धाबाबत सविस्तर माहिती पुस्तिका व माहितीपत्रके ऊपलब्ध करावी, वाचनालय चालु करावे, प्रकाश योजना व ध्वनी चित्र फीत असलेला साऊंड शो सुरु करावा, सुरक्षेसाठी होम गार्ड व्यवस्था करावी तसेच CCTV बसविणेबाबत व इतर सोयी साठी मान्यता द्यावी अशी सूचना केली याबाबत हरियाणा प्रशासनास ना हरकत प्रमाणपत्र देऊन प्रश्न मार्गी लावण्यात येईल असे श्रीम विद्यावती यांनी सांगितले.तसा प्रस्ताव हरियाणा देण्यास दि. ३ एप्रिलच्या बैठकीत हरियाणा स्थानिक अधिकारी यांना सांगितले असुन या पुर्वीचे पुरातत्व विभागाकडे दिलेले प्रस्तावही संबंधित विभाग प्रलंबित आहेत याकडेही नीलम गोर्हेंनी लक्ष वेधले. त्यांवर या कार्यवाहीस पुर्ण सहकार्य देऊ असे श्रीमती विद्यावती यांनी सांगितले .

मुंबईत विधान भवनमध्ये मे महिन्यात महाराष्ट्रातील या विषयासंदर्भात असलेल्या प्रश्नाबाबत बैठक घेऊ व त्या बैठकीस श्रीमती व्ही विद्यावती यांनी उपस्थित राहण्याबाबत विनंती केली. केंद्रीय पुरातत्व विभागाने प्रत्येक ३ महिन्याला घेतलेल्या निर्णयाबाबत आवश्यक प्रसिद्धी द्यावे असे ही सांगितले.
त्यावेळी श्रीमती विद्यावती महासंचालक पुरातत्व विभाग यांना डॉ गोऱ्हे यांच्या सूचनांचे स्वागत करून महाराष्ट्रातील पुरातत्व विभागाच्या सर्व विषयांवर सविस्तर चर्चा करण्यासाठी पूढील महिन्यात मुंबई मध्ये नक्की बैठक घेऊ व विषय सोडविण्याबाबत सकारात्मक निर्णय घेऊ असे डॉ गोऱ्हे यांना आश्वासीत केले. पानिपतच्या स्मारकामधील ज्या कामासाठी पुरातत्व विभागाच्या परवानगीची आवश्यकता आहे त्या तात्काळ देण्यासाठी सूचना देत आहे, असे सांगितले. तसेच जी कामे होणार आहेत,सुरू आहेत व पूर्ण झालीत त्यांची माहिती सविस्तर जाहीर केली जाईल, तर केंद्रिय पुरातत्व विभागात महाराष्ट्राच्या अनुषंगाने होणारे महत्त्वाचे निर्णय प्रत्येक ३ महिन्याला महाराष्ट्र विधिमंडळ ला कळविणेचे ही मान्य केले.
याबैठकीत एकवीरा व लेण्याद्री देवस्थान मधील भाविकांसाठी महत्वाच्या सोयीसुविधा यांना मान्यता व निधी उपलब्ध करून देण्याबाबत डॉ गोऱ्हे यांनी विनंती केली. त्यास श्रीमती विद्यावती यांनी तात्काळ निधी दिला जाईल असे यावेळी सांगितले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

बौद्ध धम्म हा मनःशांती ते विश्वशांती चा प्रतीक ~ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

बुद्धगया : भगवान गौतम बुद्धांनी आखिल मानवजातीच्या कल्याणासाठी...

नेपाळमध्ये बस महामार्गावरून नदीत कोसळली, 18 ठार:25 जखमी

काठमांडू:नेपाळमधील धादिंग जिल्ह्यात सोमवारी रात्री उशिरा एक बस महामार्गावरून...

हवामान विभागाचा 7 जिल्ह्यांना ‘येलो अलर्ट’,विदर्भात पावसाचा धुमाकूळ, तर कोकणात आंबा धोक्यात

मुंबई:रविवारी मध्यरात्रीपासून विदर्भातील नागपूर, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांत विजांच्या...

पाकिस्तानस्थित जैश-ए-मोहम्मदचे तीन सदस्य काश्मीर मध्ये ठार मारले..

दहशतवादी एका टेकडीच्या पायथ्याशी असलेल्या मातीच्या घरात लपलेले आढळले...