बर्ड फ्लूचा संसर्ग रोखण्यासाठी वन विभागाकडून उपाययोजना जारी, संसर्गीत पक्षी निदर्शनास आल्यास तात्काळ नजिकच्या वनविभाग कार्यालयाशी संपर्क साधावा-उपवनसंरक्षक राहुल पाटील

Date:

पुणे दि.14 : राज्यातील काही जिल्हयातील कुक्कुट पक्षामध्ये बर्ड फ्लू ची लक्षणे आढळून आली आहेत. जिल्हयातील वनक्षेत्रात कावळे, पोपट, कोंबडी, बगळे या स्थलांतरीत होणारे पक्षी यांचे आकस्मिक मृत्युची घटना अथवा आजारी,संसर्गीत पक्षी निदर्शनास आल्यास तात्काळ नजिकच्या वनविभाग कार्यालयाशी संपर्क साधावा. यासाठी विभागामार्फत नियुक्त केलेले समन्वयक अधिकारी यांनी तालुकास्तरीय पशुसंवर्धन अधिकारी यांचेशी समन्वय साधून आवश्यक ती कार्यवाही करणेसाठी निर्देश देण्यात आले असल्याची माहिती वन विभागाचे उपवनसंरक्षक श्री. राहुल पाटील यांनी दिली.
बर्ड फ्लू रोगाचा प्रार्दुभाव हिमाचल प्रदेश, राजस्थान, केरळ, व मध्यप्रदेश या राज्यातील पक्षांमध्ये आढळून आला आहे. तसेच महाराष्ट्रामध्येही काही ठिकाणी तपासणीचे निष्कर्ष पॉझिटिव्ह आले आहेत. त्या संदर्भात विविध वृत्तपत्रे, दुरचित्रवाहिन्या, तसेच सोशल मिडियावरून बातम्या प्रसारित होत आहेत. बर्ड फ्लूचा संसर्ग रोखण्यासाठी वनविभागाच्या वतीने उपाययोजना राबविल्या जात आहेत.
वनविभागामार्फत ज्या ठिकाणी पाणवठे किंवा जलाशय आहेत अशा जागा शोधून काढल्या आहेत. तसेच पाणवठयाजवळ वनविभागाच्या वतीने एक- एक वनरक्षकांची नेमणूक केलेली असून त्याचा आढावा विभागामार्फत घेण्यात येत आहे. वन परिक्षेत्र अधिकारी व तालुका पशुसंवर्धन अधिकारी समन्वय साधून कार्यवाही करत असून आपल्या परिसरात जलाशय किंवा पाणवठे असतील आणि या जलाशयात आजारी किंवा स्थलांतरित पक्षी येत असतील तर यासंबंधी त्यांनी वन विभाग किंवा पशुसंवर्धन विभागाशी तात्काळ संपर्क साधावा. असे आवाहन वन विभागाकडून करण्यात आले आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

बौद्ध धम्म हा मनःशांती ते विश्वशांती चा प्रतीक ~ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

बुद्धगया : भगवान गौतम बुद्धांनी आखिल मानवजातीच्या कल्याणासाठी...

नेपाळमध्ये बस महामार्गावरून नदीत कोसळली, 18 ठार:25 जखमी

काठमांडू:नेपाळमधील धादिंग जिल्ह्यात सोमवारी रात्री उशिरा एक बस महामार्गावरून...

हवामान विभागाचा 7 जिल्ह्यांना ‘येलो अलर्ट’,विदर्भात पावसाचा धुमाकूळ, तर कोकणात आंबा धोक्यात

मुंबई:रविवारी मध्यरात्रीपासून विदर्भातील नागपूर, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांत विजांच्या...