लॉकडाऊनच्या काळात गरजूंना भोजन ; सुमारे २ महिने उपक्रम सुरु राहणार

Date:

पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात लॉकडाऊनमुळे अनेकांना उदरनिवार्हासाठी देखील बाहेर पडता येत नाही. यासाठी विश्व हिंदू परिषदेच्यावतीने अन्नपूर्णा रथ हा आगळावेगळा उपक्रम राबविला जात आहे. गोरगरीब, मजूर,रस्त्यावर राहून उपजीविका करणारे, तसेच हातावर पोट असणा-यांची संख्या पुण्यात मोठी आहे. त्यांना दररोज भोजनाची व्यवस्था विश्व हिंदू परिषदेच्या वतीने केली जात आहे.

विश्व हिंदू परिषदेचे पुणे विभाग मंत्री तुषार कुलकर्णी, कृष्णकांत चांडक, हर्षद नातू, अनंत शिंदे, राजेश जाधव, नाना क्षीरसागर, प्रतिक गोरे, अमित चिटणीस, संजीवनी चौधरी, कमलेश तिवारी आदी कार्यकर्ते या उपक्रमात सहकार्य करीत आहेत. मागील वषीर्देखील विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून हा उपक्रम राबविण्यात आला होते. त्यावेळी २० हजारांपेक्षा जास्त लोकांना भोजन देण्यात आले होते.

तुषार कुलकर्णी म्हणाले, लॉकडाऊनच्या काळात अनेकांना दोन वेळचे जेवण देखील मिळणे अवघड होते. अशांसाठी अन्नपूर्णा रथाच्या माध्यमातून भोजन देण्यात येत आहे. कमला नेहरू हॉस्पिटलपासून भोजन किट वाटपाची सुरुवात झाली.

ते पुढे म्हणाले, पर्वती पायथ्याच्या मागील आंबेडकर वसाहत, कोथरूडमधील गोसावीवस्ती, उत्तमनगर, रामनगर येथे सध्या भोजन वाटप सुरू आहे. यापुढे जिथे गरज आहे त्या ठिकाणी वाटप करण्यात येईल. लॉकडाऊन संपल्यानंतरही सुमारे २ महिने हे भोजन वाटप सुरू राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

किरीट सोमैयांच्या ‘अतिरेकी आरोपांवर’ नाशिक पोलीस अधिक्षक व जिल्हाधिकारी यांनी खुलासा करावा

काँग्रेसची मागणी ..सोमैयांनी ‘अतिरेक्यांची संख्येसह असणारी माहीती’ पोलीसांकडे का...

‘बाई पण भारी देवा’ स्वतःला जोडणारा, स्वतःला उभा करणारा कार्यक्रम

तनुश्री गर्भसंस्कार परिवारातर्फे१ मार्च रोजी विनामूल्य कार्यशाळेचे आयोजन पुणे, दि.२४...