पुणे :
‘स्वतःच्या स्वार्थासाठी अन्नपदार्थात भेसळ करण्याच्या प्रवृत्ती एकविसाव्या शतकातही पुढे चालू राहिल्याने औषध नियंत्रणाहून अन्नातील भेसळ नियंत्रित करणे हे आव्हानात्मक आणि महत्त्वाचे सरकारी काम बनले आहे’, असे प्रतिपादन ‘अन्न आणि औषध प्रशासना’चे माजी सहसंचालक जयकुमार अजमेरा रांनी केले.
‘महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्यूकेशन सोसायटी’च्या ‘एम. ए. रंगूनवाला इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अॅण्ड रिसर्च’तर्फे आरोजित ‘अन्नपदार्थ सुरक्षा कायदा-सुधारणा आणि अंमलबजावणी’ या विषयावरील एकदिवसीय चर्चासत्रात ते बोलत होते.
व्रासपीठावर इन्स्टिट्यूटच्रा प्राचार्य अनि ता फ्रांन्स, विषयतज्ज्ञ दुर्गाप्रसाद पांडा, प्रा. डॉ. सईद अरिफुद्दीन उपस्थित होते.
श्री. अजमेरा म्हणाले, ‘अन्नभेसळ रोखण्या साठी सुरुवातीपासून अनेक कायदे करण्यात आले आहेत. त्यात वारंवार सुधारणा करण्यात येत आहे. मात्र, मानवाचा स्वार्थ वाढतच असल्याने भेसळही वाढत आहे. ‘इंडियन फूड कोड’नुसार अन्नपदार्थाची व्याख्या 24 पदार्थांना लागू होते. यामध्ये मानवी पातळीवरील भेसळ, रासायनिक, जैविक भेसळ असे अनेक प्रकारे भेसळ होते. त्या साठी सरकारी पातळीवर अनेक उपाय योजना केल्या जात असतात. मात्र, औषधनिर्मिती, भेसळीवर लक्ष ठेवणे, नियंत्रण ठेवण्याहून अधिक व्याप्ती अन्नपदार्थांतील भेसळीवर नियंत्रण ठेवण्याची आहे आणि ते महत्त्वाचे काम बनत आहे.
प्रा. सईद अरिफुद्दीन म्हणाले, ‘अन्न गुणवत्तेची मानके सांभळणे हॉटेल व्यवसायात महत्त्वाचे आहे. मात्र, आंतरराष्ट्रीय पातळीवरही तसे नियम पाळले जाताना दिसत नाहीत. अन्न सुरक्षित, विना भेसळ मिळावे, या साठी चांगल्या व्यावसायिक कार्यपद् धतीबाबत आपण भारतातही उदासीन आहोत.’
प्राचार्य अनिता फ्रांझ यांनी वक्त्याचे स्वागत आणि प्रास्ताविक केले.
आझम कॅम्पस हायटेक हॉल रेथे झालेल्या चर्चासत्राला हॉटेल व्यवसायातील व्यक्ती, विद्यार्थी, प्राध्या पक उपस्थित होेते.


