पुणे:
‘महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटी’च्या ‘अँग्लो उर्दू गर्ल्स हायस्कूल’च्या विद्यार्थिनींनी जिल्हा क्रीडा परिषद पुणे, च्या वतीने आयोजित हॉकी स्पर्धेमध्ये विजेतेपद पटकाविले आहे. सतरा वर्षाखालील विद्यार्थिनींसाठी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. संघातील दोन विद्यार्थिनींची राज्य पातळीवरील स्पर्धेसाठी निवड झाली आहे. तसेच या संघाने सतरा वर्षाखालील‘नेहरू कप हॉकी स्पर्धा’ आणि ‘आगाखान हॉकी स्पर्धा’ या स्पर्धांमध्ये देखील उपविजेतेपद मिळविले आहे.
‘महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटी’चे अध्यक्ष पी.ए.इनामदार, उपाध्यक्षा आबेदा इनामदार, सचिव लतीफ मगदूम, एस.ए.इनामदार, शाळेच्या मुख्याध्यापिका आयेशा शेख, आझम स्पोर्ट्स अकॅडमीचे गुलजार शेख यांनी विजेत्या संघाचे अभिनंदन केले.
तसेच जिल्हा क्रीडा परिषद पुणे, च्या वतीने आयोजित ‘रोप स्किपींग’ स्पर्धेत सय्यद नसीम अन्जुम खनीफ (इयत्ता सातवी) या विद्यार्थिनीने सुवर्णपदक पटकाविले.

