डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन 5 हजार अल्पसंख्य विद्यार्थ्यांची अभिवादन मिरवणूक
पुणे :
भारतीय घटनेचे शिल्पकार ,दलित आणि अल्पसंख्य समाजाच्या प्रगतीचे आधार डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी पुण्यातील अल्पसंख्य समुदायातील ५ हजार विद्यार्थ्यांनी ‘अभिवादन मिरवणूक ‘ काढली . संस्थेचे अध्यक्ष डॉ .पी ए इनामदार यांनी उदघाटन केले . लतीफ मगदूम यांनी मिरवणुकीचे नेतृत्व केले .
महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटी(आझम कॅम्पस )च्या ३० शैक्षणिक आस्थापनातील ५ हजार विद्यार्थी या मिरवणुकीत सहभागी झाले . कुलभूषण जाधव यांची फाशी रद्द करण्याची मागणीही विद्यार्थ्यांनी या मिरवणुकीत फलकाद्वारे केली
दरबार ब्रास बँड ,ढोल ताशा पथक ,नागरे -तुताऱ्या ,चवदार तळ्याच्या सत्याग्रहाचा देखावा,जय भीम आणि ‘शिका आणि संघटित व्हा ‘ चा नारा हे या अभिवादन मिरवणुकीचे आकर्षण ठरले .
जुना मोटार स्टॅन्ड ,,पदमजी पोलीस चौकी ,केईम ,नरपतगिरी चौक ,जिल्हा परिषद मार्गे जिल्हाधिकारी कचेरीजवळील डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापर्यंत ही अभिवादन मिरवणूक सकाळी साडेआठ वाजता काढण्यात आली . विद्यार्थ्यांच्या वतीने डॉ आंबेडकर पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला .
डॉ एन वाय काझी ,लतीफ मगदूम ,शाहिद इनामदार ,वाहिद बियाबानी ,अब्दुल वहाब ,नासिर खान ,अस्लम बागवान ,प्रा . मुझफ्फर शेख ,डॉ . व्ही .एन . जगताप ,डॉ . भूषण पाटील ,डॉ . किरण भिसे ,हेमा जैन ,ऋषी आचार्य ,प्रा . आयेशा शेख ,प्रा . परवीन शेख ,प्राध्यापक ,विद्यार्थी वर्ग सहभागी झाले .
‘अवामी महाज ‘ या अल्पसंख्यकांच्या संघटनेतर्फे जिल्हाधिकारी कचेरीजवळ पाणपोईची व्यवस्था करण्यात आली होती . या पाणपोईचे उदघाटन लतीफ मगदूम यांनी केले . वाहिद बियाबानी यांनी स्वागत केले .